नशीबाचा खेळ!
म्हणतात ना, वेळ खराब असेल तर उंटावर बसलेल्यालादेखील कुत्रं चावतं. तसंच काहीसं झालं होतं त्या तीन दिवसांत डरहम कौंटीच्या क्रिकेट संघासोबत. जून १९९४ मधली गोष्ट. एजबॅस्टनला वॉरिकशायर संघासोबतचा त्यांचा चार दिवसांचा सामना गुरूवारी सुरू झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत डरहमने जॉन मॉरीसच्या नाबाद २०४ धावा नि त्याला कर्णधार फिल बेनब्रिजने ६७ धावा काढून दिलेली साथ यांच्या जोरावर ३ बाद ३६५ धावा जमवल्या!
दुसर्या दिवशी मॉरिस झटपट बाद झाला मात्र डरहमची टांकसाळ चालूच होती.
मिसळपाव