Skip to main content

विरंगुळा

अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेला आणि बेला,वैशालीने गायलेला नवीन अल्बम प्रकाशित

लेखक योगेश पितळे यांनी गुरुवार, 22/09/2011 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेला पहिले वहिले प्रेम हा अल्बम नुकताच प्रकाशित झाला आहे.बेला शेंडे आणि वैशाली सामंत या आजच्या आघाडीच्या गायिकांसह नील नाडकर्णी या अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण गायकाने या अल्बमद्वारे मराठी संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची ८ गीते आहेत असून प्रवीण दवणे, मिलींद जोशी आणि मनोज यादव यांनी ती लिहिली आहेत.

मोराची चिंचोली

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 22/09/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
a अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता.

(मालकीणोपदेश)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
(मालकीणोपदेश) संदर्भ "लिहावे की न लिहावे, उडेल की न उडेल, रुचेल की न रुचेल, संपादेल की नसंपादेल हाच मोठा प्रश्न आहे" - पाषाण भेद-फियर (करू नको) (वरील जगप्रसिद्ध वक्तव्य असणारा गहन प्रश्न आमच्याही मनात आला पण गावातील आजकालचे नवनवीन Items पाहून ती भीती कमी झाली.) काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी बृ-स्पतीवारात माझ्या क्लायंट्सना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला बृ-स्पतीवार परिसराची एक चक्कर पुरेशी असते.

प्रिय माधुरीस

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 20/09/2011 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय माधुरीस, तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते.

काही रेखाचित्रे

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 20/09/2011 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर दुसर्‍याचे लेखन प्रकाशित करायचा प्रघात नाही हे माहिती आहे. परंतु माझ्या भावानेच काढलेली असल्यामुळे त्याची काही स्केचेस इथे डकवतो आहे. यातले एकही स्केच माझे (म्हणजे मी काढलेले ;) ) नाही. सगळी चित्रे माझ्या भावाने काढलेली आहेत. बाकी फारसे काही लिहिण्यासारखे नाही आहे. त्यामुळे चित्रेच डकवतो.

आठवणी

लेखक मराठे यांनी मंगळवार, 20/09/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात काही काही आठवणी अशा असतात की कितीही प्रयत्न केला तरी त्या विसरल्या जात नाहीत. आयुष्याच्या संध्याकाळी मग कधी कधी ह्या आठवणी मनात पिंगा घालायला लागतात. जसं जसं मागं जावं तशा तशा ह्या आठवणी थोड्या विरळ होत जातात. एकाद्या धूसर चित्रांचा अल्बम बघावा तशा.... एखाद्या सुराचा, एखाद्या गंधाचा किंवा एखाद्या प्रसंगाचा संदर्भ घेउन अडगळीत पडलेल्या असतात. अडगळीप्रमाणेच.. कधी कधी तर आठवणी अगदीच असंबद्ध असतात. त्या स्मृतींची अडचण अजून का डोक्यात साठली आहे असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्मृती एखाद्या अद्भुत स्वप्नासारखी वाटते आताशा. लहानपणीच्या त्या आठवणी ..

पाठीवरले बिर्‍हाड

लेखक चित्रा यांनी रविवार, 18/09/2011 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/19173 येथून पुढे नगरीजनांचे काय झाले ते पुढच्या काही काव्यसदृश पंक्तींमध्ये. मागील शैलीशी काही संबंध नाही.