Skip to main content

विरंगुळा

कोठे जाशी भोगा...!!

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 11/10/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा.... ''ताई, हे तर आमच्या भागातले प्रसिद्ध राजकारणी आहेत हो मोठे! खूप वट आहे हां त्यांचा.... इथं बऱ्याच जमिनी, इमारती, शॉपिंग मॉल्स त्यांच्याच मालकीची आहेत. सगळीकडे होल्ड आहे म्हणे त्यांचा! कोणीही त्यांच्याकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा.... दिलेला शब्द पडू देत नाहीत म्हणून रुबाब आहे बरं का त्यांचा...

फिल्म दि मेसेज

लेखक यकु यांनी रविवार, 09/10/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते.

पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली

लेखक सोत्रि यांनी रविवार, 09/10/2011 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याचे मी स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले होते तो माझा गुरु, आद्य आर्किटेक्ट, स्टीव्ह जॉब्स अकाली हे जग सोडुन गेला. संगणक विश्वात स्वतःचे अढळपद निर्माण करूनच. सोशल आणि व्हर्चुअल जगात त्याच्याविषयी बरीच नविन नविन माहिती ह्या निमीत्ताने कळत होती. बरेच ब्लॉग्स आणि लेख वाचता वाचता कुठेतरी स्टीव्ह विषयी असलेल्या काही चित्रपटांची माहिती मिळाली. त्यात सापडला 'पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली'.

अनिल कुंबळे - एक जंबो गोलंदाज

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 07/10/2011 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
अनिल कुंबळे संडास तुंबले हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असताना लै म्हणजे लै च फेमस होता. वास्तविक अनिल कुंबळेचा आणि संडास तुंबण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण कुंबळे आणि तुंबले याचे यमक जुळते म्हणून बिचार्‍या कुंबळेवर विनोद व्हायचे. असाच एक इथे विषद न करतायेण्याजोगा विनोद त्याच्या फिरकी गोलंदाज असण्यावर पण व्हायचा. तो ही होण्यासारखे काही पाप के एन कृष्णास्वामी कुंबळ्यांच्या या पोराने केलेले नाही पण भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी.