Skip to main content

विरंगुळा

काही रेखाचित्रे

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 30/09/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी आगाशीला (विरारला) रहायचो, आमच्या शाळेजवळ. शाळेत दिवाळीत 'रंगायन' ह्या एका ग्रुपकडुन रांगोळी प्रदर्शन भरवले जायचे. रंगायनची सगळी मंडळी माझ्या आजुबाजुलाच रहाणारी. त्यांच्यात चालणार्‍या चावट गप्पागोष्टींमुळे आणि वात्रटपणाच्या बालसुलभ आकर्षणामुळे बर्‍याचवेळा रात्री रात्रभर त्यांच्यात बसायचो. नकळत त्यांची कला बघायची संधी मिळायची. एके दिवशी काय वाटले काय माहित त्यांच्याप्रमाणे एका चित्रावर ग्रिड काढुन पेन्सिल स्केच बनवले. मग झपाटल्याप्रमाणे 1-2 महिने कहीबाही रेखाटत गेलो.

‘फोर लायन्स’ – बावळट जिहादींची आचरट ब्रिटिश कॉमेडी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 29/09/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
Four Lions - Poster कोणतीही गोष्ट पवित्र न मानता कशाचीही यथेच्छ चेष्टा करण्यात ब्रिटिश लोक पारंगत आहेत. मग जिहादी दहशतवाद याला अपवाद कसा ठरेल? दहशतवाद्यांची आणि त्याला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांचीही खिल्ली उडवणारा ‘फोर लायन्स’ हा ब्रिटिश चित्रपट Channel 4वर नुकताच ११ सप्टेंबरच्या दशकपूर्तीनिमित्त दाखवण्यात आला. असला नमुना चित्रपट अशा वेळी दाखवून ब्रिटिशांनी आपली विनोदबुद्धी आजही शाबूत आहे याचाच निर्वाळा दिला.

एक किस्सा नरकातला

लेखक सोना-शार्वील यांनी बुधवार, 28/09/2011 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात भरपुर पापे वाढली,आणी ........................ लोक मेल्यावर यम आपल्या रेडयावर येवुन सगळयाना चित्रगुप्ताकड नेत होता.चित्रगुप्त आत्माला एकेक करुन बोलवायचा पापाची बेरीज करुन हिशोब करुन, मग त्याप्रमाणॅ स्वर्ग अथवा नरकात पाठवायचा.या जगात भरपुर पापे वाढली,आणी स्वर्ग ओस पडू लागला आणी नरकात खुप गर्दी झाली.स्वर्गात अप्सरा,बागा,मदीरा आणी भरपुर मजा होत्या,तर नरकात होते चाबकाचे फटके,उकळलेले तेल.स्वर्ग आणी या मधे होती एक भिन्त,पापी आत्मे खुप बदमाश.त्याना स्वर्गात काय चालले आहे हे पाहायचे होते, त्या सर्वानी भिन्तीला छीद्र पाडायला सुरवात केली.त्याना स्वर्ग खुप आवडायला लागला ,पण तीकड जाणार कसे?

बालपणीचे निसर्ग सवंगडी

लेखक जागु यांनी बुधवार, 28/09/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल. चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्‍याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता.

७) एका खेळियाने - "युनायटेड" वुई स्टॅन्ड

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 27/09/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच आमच्या पराचं "भन्नाट" वाचत होतो... सु.शि. म्हणजे आधीच आपला वीक पॉईंट. त्यात पराच्या कन्सेप्टनीच डोक्याला शॉट दिला. दारा, मंदार, फिरोज आणि अमर विश्वास एकत्र?? एकेकाच्या "परा"क्रमाच्या कथा वाचताना सुद्धा भान हरपायला होतं. आणि हिथंतर पराभाऊ काय सांगून राहिले? दाराची अमानवी ताकद, अमरचं अफाट डोकं, मंदारचा स्मार्टनेस आणि फिरोजचं बैदुल एकत्र?? "अब्ब आयेगा मजा"। हे म्हणजे एका बाजूनी मॅक्ग्रा, दुसर्‍या बाजूनी वॉर्न, मागे गिलख्रिस्ट आणि स्लिप्समध्ये पाँटिंग झालं की राव ! च्यायला....

(आपणच आता भान ठेवायला हवं)

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/09/2011 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची टिलु(माझी कजाग शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " शुचि मी आज माझ्या नवर्‍याचे लाड केले" आता ही टिलु कजाग आहे.मी तिला म्हटलं "टिल्या संसारात आक्रस्ताळेपणा करायचा असतो? प्रेम, तडजोड नाही करायची .." तर ती म्हणाली "शुचि माझा नवरा माला म्हटला माझ्याशी (१५ वर्षानी )आतातरी म्य्त्री क्र्र्न्र क???????" आता मात्र मला शॉक बसला.

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 23/09/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्