विरंगुळा
पाऊसगोष्ट तुझी माझी
तू मजसोबत येशील अशी शक्यता वाटत नव्हती. पण तू पटकन गाडीवर माझ्यामागे सावरून बसलीस. तेव्हा खरे तर माझ्या मनात कल्लोळ उठला होता. तुझं तसं मजसमीप असणं जगावेगळं वाटत होतं. त्यात मौसम ‘घन उतरू आलं...’ अशा झिम्मड पावसाचा. तुला कुठे सोडायचं हे ठरलं नव्हतं. मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो...
रस्ते म्हणजे खड्डेच की. तू माझ्यावर मागून आदळली नाहीस असं होणार नव्हतं. तरीपण तुझाही तोल सावरीत मी बेताने गाडी घेतली आणि माझं ते संयत वागणं पाहून त्या वरच्या मसीहाला माझी दया आलीच.
संपादकाचे घासूगुर्जीस पत्र..
प्रिय राजेश घासू आण्णा यांसी,
जय मिपाराष्ट्र!
एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. मिपाकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या संपादकांबद्दल असूया व कवितेच्या पाककृती विषयक लेखाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.
सध्या आपण मिपाच्या मर्कटलीला मैदानावर एकूणच पिडीत लोकांसाठी स्लटवॉक नामक जबरदस्त युद्ध पुकारले आहे.
मिपावर उठवळ मोर्चा (स्लटवॉक)
तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू...
आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात.
सौंदर्यनगरीतील कलावैभव: शिल्पकला
(या धाग्याचे स्वरूप शिल्पकलेविषयी माहितीपूर्ण, तौलनिक, समिक्षात्मक लेखनप्रपंच असे नसून निखळ रसग्रहणात्मक आहे).
पॅरिसमध्ये भ्रमण करताना ठायी ठायी सौदर्यदेवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रसिकांना दर्शन देतच असते...
'ईगल्स' भरारी
१९७० च्या दशकात लॉस एंजलीस मध्ये तयार झालेला, अमेरिकेतील चार्टस मध्ये ५ पहिल्या क्रमांकाची गाणी देणारा, ६ ग्रॅमी अॅवॉर्ड्स जिंकणारा, ६ पहिल्या क्रमांकाचे अल्बम असणारा म्युझिक ग्रूप म्हणजे 'ईगल्स'.
ग्लेन फ्रे, डॉन हॅनली, बर्नी लीडन आणि रँडी मीस्नर यांच्या या 'ईगल्स'ची गोष्टच जरा वेगळी आहे. मुळात यांच्यातील एकही म्युझीशियन कलिफ़ोर्निअन नाही. हे चौघे १९७१ साली प्रसिद्ध अमेरिकन गायिका 'लिंडा रॉनस्टेट' हिचे टूर-मेम्बर्स म्हणून लॉस एंजलीस, कॅलिफोर्नियाला एकत्र आले. एकत्र काम करता करता त्यांचा एक छान गट बनला.
इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस्स माईण्ड
मागल्या आठवड्यात मित्र घरी आला होता. मस्त मालवणी जेवण आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. आम्हा मित्रांच्या टोळक्यात क्रिकेट आणि राजकारणाविषयी बोल्लो नाही तर आम्ही सगळे ते डिस्कशन फाऊल धरतो. पण नुकताच आपला क्रिकेटविषयक स्वाभिमान इंग्रजीविषयाच्या "टेस्ट" मध्ये नापास झाला असल्याने आणि राजकारणात "अण्णा"नी दिल्लीच्या धुरंधरांची पुरती वाट लावलेली असल्याने त्या विषयांत त्या पलिकडे बोलायला जीभ धजवत नाही. म्हणून एकदम वेगळ्याच विषयाकडे वळलो.
"लग्नाचं काय?"
"ठरलंय." मित्र म्हणाला.
"छान! म्हणजे हे विचारल्यावरच सांगायचं का?"
"सांगणारच होतो. त्यासाठीच तुझा सल्ला घ्यायचा होता."
"सल्ला?
एका भारतीय पुरुषाची डायरी
दिनांकः २० ऑगस्ट ४०११
कंटाळा आलाय! का काय विचारता? ऑफीसमधल्या राजकारणाने कंटाळा आला होता. माझी बॉस म्हणाली शनिवारी यावं लागेल. अस्सं डोकं फिरलं आणि लवकर निघालो. तसं डोकंही दुखत होतं. म्हटलं बाबांकडे चार घटका जावं, बाबांच्या हातच्या चहाने डोकंदुखीच काय पण जगातले सारे रोग दुर होऊ शकतात. पुन्हा एकदा आपल्या घरी गेलं की रोजचं जेवण करणं, पोरांचा अभ्यास, सासर्यांची काहि कामं वगैरे रोजची कामं आहेतच. तर बाबांकडे गेलो होतो. नेमकं मला राजनने बघितलं. आता हा सासर्यांना नक्की सांगणार. याला काय नोकर्या करायच्या नाहीत. बायको मोठ्या हुद्द्यावर आहे. घरी सिरीयल बघितल्या, मुलांना झोपवलं की झालं.
मिसळपाव