Skip to main content

विरंगुळा

एका भारतीय पुरुषाची डायरी

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 20/08/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांकः २० ऑगस्ट ४०११ कंटाळा आलाय! का काय विचारता? ऑफीसमधल्या राजकारणाने कंटाळा आला होता. माझी बॉस म्हणाली शनिवारी यावं लागेल. अस्सं डोकं फिरलं आणि लवकर निघालो. तसं डोकंही दुखत होतं. म्हटलं बाबांकडे चार घटका जावं, बाबांच्या हातच्या चहाने डोकंदुखीच काय पण जगातले सारे रोग दुर होऊ शकतात. पुन्हा एकदा आपल्या घरी गेलं की रोजचं जेवण करणं, पोरांचा अभ्यास, सासर्‍यांची काहि कामं वगैरे रोजची कामं आहेतच. तर बाबांकडे गेलो होतो. नेमकं मला राजनने बघितलं. आता हा सासर्‍यांना नक्की सांगणार. याला काय नोकर्‍या करायच्या नाहीत. बायको मोठ्या हुद्द्यावर आहे. घरी सिरीयल बघितल्या, मुलांना झोपवलं की झालं.

गुर्जिएफचा छोटासा किस्सा

लेखक यकु यांनी शुक्रवार, 19/08/2011 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
खरं म्हणजे एवढं छोटं लिहायला नको. मी खूप किस्से टाकणार होतो - पण चपखल आढळले नाहीत. तुमच्याकडेही अशा झक्की लोकांचे किस्से असतील तर या धाग्यावर टाका. अनेक लेख वाचून जे हाती पडेल ते कदाचित एखाद्या छोट्याशा प्रसंगातुनही चमकू शकतं.

क्रांती -- काही असे काही तसे ,,, पुन्हा पुन्हा जगावेसे

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 18/08/2011 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला). मा.