Skip to main content

विरंगुळा

<काही शंका......>

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 13/03/2014 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत. १. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? ७.

आला स्मायलीवाला...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/03/2014 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
ढीशुम ढिशुम क्लेमरः- सदर लेखन मि.सूडोकू यांनी आमच्या नामा'चा उप योग-करून लिहिलेल्या एका लेखावरून http://misalpav.com/node/27052 सुचलेले आहे. त्यामुळे हा लेख त्याची प्रतिक्रीया...विडंबन ..इत्यादी काहिही नसून त्या निमितानी काहि धमाल लेखन करावं..अश्याच अनुषंगानी लिहिलेला आहे. ======================================================== प्रातःकाळची प्रसन्न स्मायलीमय वेळ.

टाईमपास

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 10/03/2014 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
"ए गित्या, अजुन वर वढ ना फ़्लेक्स तिच्या आयला ..." कांच्या माझ्यावर खालून वराडला. आयला या कांच्याच्या! याच्या वाढ्दिवसाचा फ़्लेक्स यानी बनवुन आणलाय आन आम्हाला लावलेय धक्क्याला. याचा वाढ्दिवस आहे का तेरावा याचं पब्लिक्ला काय घेणं हाय का ? पण याला चमकायची हौस दांड्गी . चौकात मोठा फ़्लेक्स लावलाय, " आपले लोकप्रिय युवा नेते कांच्या आरकुले यांना वाढ्दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा". शुभेच्छूक म्हणुन स्थानिक नगरसेवक पोपटरावचा फ़ोटो साइडला, मधे याचा पिवळे दात दाखवणारा आणि गांजा मारल्यागत दिसणारा फ़ोटो आणि खाली आम्हा पोराटोरांची नावे !

*** Light डान्स ***

लेखक मदनबाण यांनी रविवार, 09/03/2014 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
डान्सचा हा प्रकार मी या आधी पाहिला होता, पण मला वाटतं... त्यात फ्लुरोसंट कलर्सचा वापर केला जायचा, पण आता पूर्णपणे डिजीटल कंट्रोल्ड एलइडी लाईट्स्चा वापर करुन एक नवा प्रकारच पहायला,अनुभवायला मिळतो... तो म्हणजे लाईट डान्स. तुम्हाला अमिताभ बच्चन चे सारा जमाना हसीनो का दिवाना... हे गाणे ठावुक असेलच, त्यात सुद्धा असाच पण जरासा वेगळा प्रकार करण्यात आला होता. आता मी पाहिलेले काही निवडक डान्स पर्फोर्मन्स इथे देतो,यात निवडलेला साउंड ट्रॅक,थीम,डान्स आणि लाईट यांचे परफेक्ट सींक,आणि अर्थातच टायमिंग या सर्वांचा सुरेख ताळमेळ पाहता येइल. एन्जॉय...

लळा

लेखक समान्तर यांनी शनिवार, 08/03/2014 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
"ती, सपरा कडची माझी." - बहिरा बापू एका फांदी कडे बोट दाखवत म्हणाला. "हा, अन ती आमच्या घरावरची हाय का, ती माझी"- शिरपा आबा एका फांदीला दाखवत म्हणाला. "पण , आबा ती तर लैच बारीक है, निट न्हाय जळायचा तू?"- बापूने (माझे आजोबा) आबाला विचारलं. "आबा तरी कुठं लय जाड है तवा"- काकू (माझी आजी) आबाच्या काटकुळ्या शरीरावर टोमणा मारीत म्हणाली. हे सगळे आमच्या घराच्या ओसरीवर बसून समोरच्या लींबाच्या फांद्यांची आपसात वाटप करून घ्यायचे. दर उरुसाला हे असेच जमायचे अन त्यांच्या इतक्याच जुन्या असलेल्या त्या लिंबाकडे बघत ह्या असल्या गप्पा रंगवायचे.

मधुबाले सारखी ? छे छे, काहीतरीच काय?

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 05/03/2014 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
. “डोळे हे जुल्मि गडे… रोखुनी मज पाहू नका ”… च्यामारी, आज पहाटे स्वप्नात पुन्हा मधुबाला, आणि तीही चक्क डोळे हे जुल्मि गडे म्हणणारी ? … अगदी पूर्वी स्वप्नात शिवाजी महाराज, टारझन, वज्रहनुमानमारूती वगैरे यायचे… … आणि आता चक्क मधुबाला ? मजा आहे बेट्या तुझी. चल चहा कर आता. “पाणी-दूध मिसळलं? मिसळलं. साखर टाकली ? टाकली. उकळी आली? आली. चहापत्ती टाकली? टाकली. आलं किसून टाकलं? टाकलं. झाकण ठेऊन ग्यास बंद ? बंद”.

स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 03/03/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
तो मेरे मि.पा.करों... अब हम देखने जा रहे है... मि.पा. के जाने आउर माने सदश्यों का एक ऐसा रंगीन कट्टा.. एक ऐसा रंगीन नजारा ..जिसमे, "ड्रामा है..ट्रॅssssजिड्डी है... कॉमेडी है" https://lh4.googleusercontent.com/evonK-xthiHvDPFJh6vh8je0XcYWeTcdaO6eWYaJO00=w140-h54-p (ढिश्श..क्लेमरः- धागा आध्यात्मिक असल्यामुळे स्मायल्या भरपूर असणार आहेत! त्यामुळे ऐहिकां'न्नी फिल्टर-लाऊण धागा पहावा..म्हणजे मणा'स त्रास होणार णाही!!! =)) ...

मकरतोरण आणि कमलवेल

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 03/03/2014 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, दै. 'लोकमत' च्या दर बुधवारच्या 'युरेका' या पुरवणीत डॉ. साने मॅडमचे वृक्षपरिचयाचे लेख येत आहेत. दि. ११/०९/२०१३ च्या पुरवणीत कमळाबद्दल मस्त लेख आलाय तो इथे मुद्दाम देत आहे.... 'पद्मपुराण'.......... 'इचिरो ओहगा (Ichiro Ohga) एक जपानी तज्ञ. गोष्ट १९५० ची. त्यांना कोळशाच्या दलदलीत काही बिया सापडल्या. 'कार्बन १४' या कालमापन पद्धतीनं ओहगा यांनी त्या बियांचं वय आजमावलं. ते निघालं अंदाजे दोन हजार वर्षे. ओहगा महाशयांनी नंतर या बियांवर काही संस्कार करून, त्या रुजवल्या. बिया रुजल्या. रोपं उगवली. ओहगांनी ती दलदलीत लावली. आश्चर्य म्हणजे, या रोपांच्या छान वेली वाढल्या.