Skip to main content

विरंगुळा

काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 14/02/2014 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.

काळा घोडा महोत्सव कट्टा - वृत्तांत (२)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 11/02/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :) तर मंडळी, आम्ही पुढे सरकलो आणि लगोलग स्टेट बँकेच्या इमारतीला अडकलो. बॅलार्ड पिअर, फोर्ट वगैरे ठिकाणी दिसणार्‍या दगडी इमारती मला अतिशय आवडतात. स्टेट बँक म्हणजे पूर्वीची ईंपिरियल बँक. ही बहुधा भारतातील सर्वात जुनी वाणीज्य बँक. स्टेट बॅंकेची स्थापना १९२१ सालची असली तरी तिचा उगम आहे तो १८०६ सालच्या बँक ऑफ कलकत्ता मध्ये. १९५५ साली राष्ट्रियीकरणात इंपिरियल बँक ऑफ ईंडिया चे नाव भारतिय स्टेट बँक - स्टेट बँक ऑफ ईंडिया असे झाले.

काळा घोडा फेस्टिवल कट्टा - वृत्तांत (१)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 11/02/2014 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
या कट्ट्याची घोषणा झाली आणि कट्टा गाठायचाच असे ठरविले. एक तर मी काळा घोडा महोत्सवाला अजुन कधीच गेलो नाही. त्याही पलिकडे मिपा गाजवणारे मुवी आणि माहितीचा खजिना असणारे रामदास यांच्या भेटीची ओढ. चार हौशी भटक्यांनी एकत्र यावं, उनाडावं, मुंबईच्या जुन्या आठवणी काढाव्यात, अनेकदा पाहिलेल्या, आपल्या नसूनही आपल्या वाटणार्‍या वास्तू पाहाव्यात यासारखा आनंद नाही. अशा कार्यक्रमाला रुपरेषा नसते. तो आपोआप पुढे सरकत असतो. शनिवार ८ तारखेला सी एस टी च्या आसपास भेटायचे ठरले होते. मी थोडा आळस केला आणि आम्हाला म्हणजे माझ्यामुळे रामदासनाही जरा उशीर झाला. आम्ही घाटकोपर गाठतोय तो मुविंचा फोन!

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ३

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 10/02/2014 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 ३) मै जानता हू के तू गैर है मगर यूही आठव्या इयत्तेत तुकड्यांची सरमिसळ होवून नवीन तुकड्या बनल्यावर अपर्णा आणि अजित एका वर्गात आलेत. वर्गातील अनेक मुली अजितसाठी नवीन होत्या. मुलींबद्दल खूप आकर्षण वाटावं असंच ते वय होतं. अजितला सुध्दा काही सुंदर मुली आवडू लागल्या. पण हळूहळू इतर मुलींचा विसर पडून फक्त अपर्णाच आवडू लागली. ती सर्वात सुंदर नक्कीच नव्हती. पण आकर्षक होती.

अकबराचा मोबाईल हरवतो

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/02/2014 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
अकबराचा मोबाईल हरवतो नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती. बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते.

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग २

लेखक मराठी कथालेखक यांनी गुरुवार, 06/02/2014 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://misalpav.com/node/26930 २) रघूवीर आणि मी सहकारी आणि मित्र होतो. त्याची कुणाशीही सहज ओळख, मैत्री होत असे. अनेक वरिष्ठ अधिका-यांशी त्याचे आपुलकीचे बंध निर्माण होत. त्यावेळी कार्यालयात स्त्री कर्मचारी फारशा नव्हत्त्या. पण बाहेर रघुवीर च्या अनेक मित्र-मैत्रिणी होत्या. त्याच्या कंपुतल्या (मी या कंपूत नव्हतो) एका मित्राने कॉम्प्युटर चा कसलासा क्लास लावला होता. रघूवीर कधी त्याला क्लासजवळ भेटायला जाई. त्यातून क्लास मध्ये शिकवणा-या प्रणिता मॅडमशी त्याचा परिचय झाला. प्रणिता हळूहळू त्याच्या कंपूत सामील झाली.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/02/2014 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- ७) http://misalpav.com/node/26846...पुढे चालू "यजमान खूsssssष..आणी आपलीही शेंडी ताsssssठ! ========================================== याद्यांचं उत्तर रामायण संपलं. पण याद्या द्यायच्या म्हणजे गुरुजि लोकांनाच बहुशः त्यातल्या आज्ञार्थी अर्थानुसार वागावं लागतं. यजमान (हल्लीच्या भाषेत क्लायंटं.. ) याद्या न्यायला येण्याऐवजी फास्ट लाइफ स्टाइलच्या तडाख्यामुळे आंम्हासच विनवितात.. "गुरुजि यादी तुंम्हीच आणून देता का? प्ली...ज! " प्लीज या शब्दाचा आतला अर्थ नो एस्क्यूज,असा असल्यामुळे आंम्हीही त्या नेऊन देतोच!

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 05/02/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
"दिल से निकलने वाली रस्ते का शुक्रिया... दिल तक पहुचने वाली हर डगर को सलाम" लता च्या आवाजातल्या या ओळी , "बाली उमरको सलाम" हे गाणं ऐकलं की मन वेगळ्याच विश्वात जातं. अनेक आध्या-अधू-या प्रेमकथा आठवू लागतातं. अनेकदा मनात आलं की या कथा एकदा लिहून काढाव्यात पण ते प्रत्यक्षात उतरलं नाही. आता ते करावसं वाटतंय. अर्थात कितपत जमेल ते माहीत नाही. पण प्रयत्न करणार आहे. या सगळ्या मी जवळून पाहिलेल्या गोष्टी आहेत. (काही माझ्याही आहेत). सगळ्या अधू-या प्रेमाच्या. यात माझी कल्पनाशक्ती फक्त नावे बदलण्यापुरतीच वापरणार आहे.

एक नविन कॉकटेल बनवले, त्या कॉकटेलला नांव सुचवा....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/02/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच दिवाळीच्या सुमारास आपला मंगळ कट्टा (http://www.misalpav.com/node/25976) छान पार पडला.तिकडून परत येतांना मला पण काही कॉकटेल्स सुचली.(मंगळाचा गूण...दुसरे काय?)सुदैवाने परतीच्या प्रवासात मी आणि सोत्री एकत्रच बसलो होतो.मला सुचलेले कॉ़कटेल मी सोत्रींना सांगीतले.त्यांनी पण ही संकल्पना उचलून धरली. ऑक्टोबर हीट चालू झाली.आणि मला काही तरी थंड पेय प्यावे असे वाटायला लागले.आणि अशा कडाक्यात आंबा नसेल तर काय अर्थ तरी आहे का? असो. नमनाला थेंबभर तेल खूप झाले. आता जिन्नस.... १. आपल्याला जितकी पचते तितकी व्होडका. २. माझाचा मेंगो ज्युस ३.