गुणी बाळ
आज जरा उशिराच जाग आली. अरे बापरे ! ८ वाजले. मी कधीच इतक्या उशिरापर्यन्त झोपून रहात नाही. कारण मी गुणी बाळ आहे. आजकाल मी स्वतः आपल्या हातने ब्रश करतो, स्वतःचं सगळं आवरतो. आईला किती कौतुक वाटतं माझं! माझी खोली आवरणं, कपाट आवरणं, बाहेर जाताना माझ्या सगळ्या गोष्टी घेणं हे आता खरं तर स्वतःचं स्वतः करण्याइतका मोठा झालोय मी. पण आईला ते पटतच नाही. खरच मोठा झालोय मी आता. असो.
पटापट आवरुन खाली नाश्त्याला जावं; नाहीतर तो भरवायला कोणीतरी वरती माझ्या खोलीत यायचं. आमचा गोतावळा खूप मोठा. घरात माणसंच माणसं. आई, काकू, काका, मावशी, आत्या अगदी सगळेच्या सगळे. पण कोणालाच मी मोठा झालोय हे पटत नाही.
मिसळपाव