Skip to main content

विरंगुळा

या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 12/12/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला बाबा आमटेंच्या 'आनंदवनात', अभय बंगाच्या 'मेळघाटात', कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात', पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत, जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे, दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये, वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे, अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात, चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे, 'स्पेन' मधल्या 'टोमाटिनो' फेस्टिवल मधे, 'ग्लेनफिडीच' चा उगम असलेल्या 'स्कॉटलैंड' मधे, साहेबाच्या देशातल्य

सुटलेल्या पोटाची कहाणी -५

लेखक Anand More यांनी बुधवार, 09/12/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ __________________________________________________________________________________ मुन्नाभाई पिक्चर मुळे आपल्या शरीरात २०६ हाडे असतात हे कळले होते पण आपल्या शरीरातील स्नायूंची संख्या माहिती नव्हती. पण तिसऱ्या दिवसा नंतरच्या रात्री असतील नसतील त्या स्नायूंनी बंड केले.

सुटलेल्या पोटाची कहाणी -४

लेखक Anand More यांनी मंगळवार, 08/12/2015 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ __________________________________________________________________________________ जिमच्या फीजमध्ये बराच खर्च झाला होता. म्हणून अनावश्यक खर्चाला काट मारायचे ठरवले होते. मनात असूनही नायके किंवा आदिदास ची झोळी, डोक्याला आणि हाताला बांधायचा पट्टा. नवीन बूट वगैरे थेरं न करता गुमान घरातली कुठल्याश्या दुकानाची प्लास्टीकची पिशवी उचलली, त्यात जुने बूट आणि मोठा रुमाल टाकला. आधी मुलाना शाळेत सोडले आणि मग वळणार इतक्यात पोरांनी हसून अंगठा दाखवला. तो शुभेच्छा दर्शक असावा, ह्या सर्वातून तुझ्या हाती मी ठेंगाच देणार आहे असे देव मुलांच्या हातून सुचवीत नसावा अशी मी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली आणि तिथून निघालो. माझा स्वभावंच तसा आहे. एकदम आशावादी.

सुटलेल्या पोटाची कहाणी -३

लेखक Anand More यांनी सोमवार, 07/12/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ __________________________________________________________________________________ निश्चय केला, मनातल्या मनात भीष्म की कायशीशी प्रतिज्ञा केली, 'पोट आत घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते आत घेणारच'. प्रतिज्ञा केल्यावर जाणवले बहुतेक हा हक्क नसून कर्तव्य असावे, पण मग शाळेत नागरिकशास्त्राच्या तासाला, 'हा मुलगा वर्गाचा नागरिक नसलेला बरा' असेच सर्व शिक्षकांचे मत असल्याने मी कायम outstanding विद्यार्थी राहिलो होतो, त्यामुळे अश्या चुका होणारंच अशी स्वतःची समजूत काढून घेतली.

मला आवडलेला विनोद

लेखक भंकस बाबा यांनी रविवार, 06/12/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट. एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले. गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली. बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले. "अरे त्या गाईला पहल्यान्दा थोपटायचे असते.

नासदीय सूक्त-शब्दांतरिताचे श्रवण.(एक उत्कट अनुभव!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 05/12/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकामधे जरी शब्दांतरिताचे श्रवण असं म्हटलेलं असलं.तरी तो नुसताच काटेकोरपणा आहे. भाषाशास्त्राच्या नियमानुसार असलेला. मुळात उपक्रम संस्थळावर येथे श्री धनंजय यांनी या सूक्ताचे जे छंद आणि वृत्ताचा नियम पाळून शब्दशः भाषांतर तसच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.. तोच ऐंशी टक्के बाजी मारून जाणारा आहे.

सुटलेल्या पोटाची कहाणी -२

लेखक Anand More यांनी शनिवार, 05/12/2015 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ क्लासला दिवाळीची सुट्टी सलग पाच दिवस दिली होती. घरी निवांत होतो. तीन चार नवीन पुस्तकं आणून ठेवली होती. त्यामुळे खुशीत होतो. दिवाळीचा फराळ करत पुस्तक वाचत बसलो होतो. ही शेजारी येउन बसली आणि अगदी हलक्या सुरात लाडीगोडीने बोलू लागली.

सुटलेल्या पोटाची कहाणी -१

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 04/12/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन. --------------- हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो.

मनाची नाती

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 04/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना आई - वडील म्हणुन प्रत्येक मुला मुलीला त्यांचे आई-वडील हे बेस्टच वाटतात. मग ते कसेही असो, दुसर्‍यांसाठी दुष्ट , वाईट वागणारे अगदी कसेही. स्वतःच्या मुलांसाठी बाबा कदाचित कठोर वागत असल्याने ते जरी बर्‍याचदा बेस्ट वाटत नसले तरीही त्यांची आई ही एक आदर्श बाईच असते. पण आपले आई-वडील सोडुन आपण आणखीही कुणाच्या जवळ असतो जसे मावशी - मावशीचे मिस्टर, मामा - मामी , काका - काकु, आत्या - आत्याचे मिस्टर.

साज़

लेखक मारवा यांनी शनिवार, 28/11/2015 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वात अगोदर एक म्हणजे मी संगीताचा कुठल्याही प्रकारचा जाणकार नाही. दुसरं सर्व लेख आठवणींवर आधारीत त्यामुळे डळमळीत. थोडी कुठे कुठे गल्ली चुकण्याचीही शक्यता आहेच.. तर आपल्या हीन्दी सिनेमांची गाणी म्हणजे अनेक प्रतिभाशाली संगीतकारांनी योगदान दिलेला आनंद खजिना आहे. कधीही जा दार उघडा दोन चार गाणी घ्या और गम भुला दो सारे संसारके. हा आपला सर्वांचाच अनुभव. तर या विवीध गाण्यांत विवीध संगीतकारांनी अत्यंत कलात्मकतेने व कुशलतेने अनेक वाद्यांचा वापर केलेला आहे. या धाग्याचा विषय हा वाद्यांचा जिथे अप्रतिम वापर झालेला आहे त्या गाण्यांविषयी बोलणं हा.