Skip to main content

विरंगुळा

पर्सनल स्टाईल ब्लॉग

लेखक रसिकामहाबळ यांनी मंगळवार, 12/01/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून कपाटातील कपड्यांकडे 'आज काय घालाव' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी चढवून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी अस बऱ्याच वेळा केल आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे. पर्सनल स्टाईल ब्लॉग काय असतो? लोक त्यांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या वस्तू कुठून घेतल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात.

सोशल नेटवर्किंग (भाग ६)

लेखक लाडू. यांनी मंगळवार, 12/01/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
'sorry पण सध्या मी इथे नसणार आहे दोन महिने. एका कामासाठी जर्मनीला जातोय परवा. परत आल्यावर बोलूच. see you.'मल्हारचा हा असा मेसेज सिद्धांतला अनपेक्षित होता. त्याने फक्त दोन शक्यता गृहीत धरल्या होत्या. एकतर हो किवा नाही. पण आता मल्हारला भेटण्यासाठी दोन महिने वाट पहावी लागणार होती. या एकूण प्रकरणातच काहीतरी प्रोब्लेम आहे असे सिद्धांतला वाटत होते. इथे मयंकही गाल फुगवून बसला होता. त्याचे चित्त थाऱ्यावर आणणे गरजेचे होते. त्याने कॉम्पुटर लावला. आणि मयंकला हल्लीच store केलेले नवनवीन wallpaper दाखून लागला. हा सिद्धांताचा छंद होता.

सोशल नेटवर्किंग (भाग ५)

लेखक लाडू. यांनी सोमवार, 11/01/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मयंक poptates मध्ये बराच वेळ बसून होता. अनघा अजूनही आली नव्हती. तो तिची वाट पाहत होता असही नाही. त्याला खर तर शांतता हवी होती. पण अनघा काय सांगते याचीही उत्सुकता होती. अनघा आली तीच मोठ्या उत्साहात. ती नेहमीप्रमाणे आल्याआल्याच चालू झाली असती पण मयंकच्या रडवेल्या चेहऱ्यावरूनच कळत होत कि काहीतरी बिनसलंय. मयंक शून्यात हरवला होता. ती त्याच्यासमोर खुर्ची ओढून बसली तरी मयंकला कळलेच नाही. शेवटी तिने मयंकला हलवून विचारले कि काय झालंय. काही नाही असे म्हणत मयंक मेनू कार्ड मध्ये बघू लागला. अनघाला आता स्वतःच्या आणि मल्हारच्या प्रकरणापेक्षा मयंकला काय झालंय हे कळून घेण्यात जास्त इंटरेस्ट वाटू लागला.

अन् मी झाडावर न चढण्याचा संकल्प सोडला.

लेखक धुरंधर यांनी सोमवार, 11/01/2016 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
तसं मला झाडावर चढायला लय आवडतं. म्हणजे कसं समजा कालेजात जातांन्ना सोबत्या बोल्ला की, ती पोट्टी बघ तुह्याकडे पायतीय तरं मी लगेच पटकण झाडावर.... मग पायणारचं ना भाऊ मी दिसतोच तसा ह्यँन्डसम, पाय तु तिला दोनच दिवसात पटावतो का नाही ते! आणि तिसरा दिवस उजाडता-उजाडता मी झाडाच्या खाली आणि तो सोबत्या मला खिजावण्याच्या नादांत झाडावर पायतो तव्हा पण लगेच आपलं उत्तर तय्यार आसतं. आरे ती आपल्याला परवडणार आहे का.. तिचा किती खर्च रायतो दिवसाचा ... (मग हळूच खिशात हात घालून चिल्लर आहे का नाही ते पाहत) ते बी करू रे आपून पण ती लयच लफडेखोर आहे असं म्हणत्या.

लेटराचं लव्ह

लेखक धुरंधर यांनी रविवार, 10/01/2016 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय...... आजपर्यंत तुझ्यावर भरपूर लिहलयं..... पण आज फक्त तुझ्यासाठी लिहतो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अस वळण येतं जेव्हा माणूस सारी शुद्ध हरवून, दुनियेचं भान विसरून प्रेमात पडतो, तसच माझ्याही आयुष्यातील एका वळणावर एका सुंदर क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या प्रत्येक कृतीन मनाला वेडचं लावलं आणि माझ्या जिवनातील सारे क्षण सुवर्णमय होउन गेले.तुला फक्त एकदा पाहता यावं म्हणून तासन् - तास तुझी वाट पाहत त्या निर्जिव बसस्टॉपवर घालवलेत. वेडेपणाच्या कित्येक हद्दी मी या प्रेमात ओलांडल्या...मला माझं जग तुझ्यात दिसू लागलं .

खुशबू (एकत्रित कथा, पुनःप्रकाशित)

लेखक पगला गजोधर यांनी रविवार, 10/01/2016 03:06 या दिवशी प्रकाशित केले.
उपोद्घात आज: १७ फेब्रुवरी २०१५ 'पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना जिंकणं म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं आहे. माझा मुलगा पाकिस्तानविरुद्धच्या 'या' युद्धात शूर सैनिकासारखा लढला. त्यानं दाखवून दिलं की भारतीय मुसलमान हा आधी भारतीय असतो, मग मुस्लिम असतो!' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याचे अब्बाजान मोहम्मद तौसिफ यांचे.

सोशल नेटवर्किंग (भाग ४)

लेखक लाडू. यांनी शनिवार, 09/01/2016 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी facebook लावताच श्रावणीचं दर्शन. अगदी छोटा काळा मायक्रो स्कर्ट आणि त्यावर फिकट गुलाबी रंगाचा आणि स्कर्टच्या मानाने बऱ्यापैकी मोठा म्हणता येईल असा टी-शर्ट. अगदी वर खोचून बांधलेले केस. आणि गवतावर एका कुशीवर झोपून हातात धरलेली गुलाबाची कळी. बाकी आजूबाजूला काहीच नाही. फक्त हिरवंगार गवत. अप्रतिम एकदम. मयंकला जितक्या वेळा श्रावणी आठवून छान वाटत असे, तितक्या वेळा मल्हार आठवून कमालीचा संताप येत असे. नेहमीप्रमाणे हा ही फोटो त्यानेच काढला असणार. आपल्यावरची लाईम लाईट कमी होत चाललीय हा एक राग तर होताच मल्हारबद्दल. शिवाय श्रावणी-मल्हार काय प्रकरण आहे हेपण नीट कळत नव्हत.

कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 07/01/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक- 27/02/2050 वार- रविवार! वेळ- सकाळी चार! मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता! "सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत! त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?" विक्रम म्हणाला, "मला नेमकी माहिती मिळायला मेहेनत करावी लागली रे. पण शेवटी मिळाली.

पुणे मुंबई पुणे

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/01/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याचा एक खेडवळ म्हातारा रात्री उशीरा कसाबसा सीएसटीला उतरला. प्रवासानं दमलेला, कपडेही मळलेले. फलाटावर उतरताच त्यानं कपडे हातानं नीट केले. मुंडासं डोक्यावर घट्ट बसवलं आणि आ करून इकडेतिकडे पाहात, हातातली पिशवी सावरत तो चालू लागला. मुंबईत मुरलेल्या टीसीच्या चाणाक्ष नजरेनं त्याला बरोबर हेरलं, आणि जवळ येताच हात आडवा करून त्या खेडुताला रोखलं. तिकीट दिखाओ'... टीसी म्हणाला आणि म्हातारा बावचळला. खिसे चाचपून झाले, पिशवीही उलटीपालथी केली. तिकीट सापडलंच नाही. टीसी खुश झाला. निकालो पैसे. फाईन भरना पडेगा'... टीसी म्हणाला आणि म्हातारा रडकुंडीला आला. 'बाबा रे, पैसे नही है माझ्याकडे'...

सोशल नेटवर्किंग (भाग ३)

लेखक लाडू. यांनी बुधवार, 06/01/2016 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मयंकच्या hi ला आज अखेर श्रावणीने उत्तर दिले होते सकाळी सकाळीच. मयंक खूप खुश झाला. ताबडतोब डोळ्यावरची झोप उडवत तिच्याशी बोलू लागला. पण तसे करताना आपल्याला ती आवडते याची पुसटशी शंकाही तिला येऊ नये याची खबरदारी तो घेत होता. हि त्याच्या नेहमीच्या ट्रिक्स मधली एक ट्रिक होती. आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याला हे माहित होते, मुलींना जास्त भाव दिला कि मग त्या गृहीत धरतात आपल्याला.