Skip to main content

विरंगुळा

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)

लेखक Anand More यांनी सोमवार, 08/02/2016 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ _________________________________________________ माझी नववी, दहावीच्या आधी आली आणि आठवीच्या नंतर. आठवीत असताना अनेक नवीन गोष्टी घडल्या. माझा अवखळ स्वभाव पाहून शाळा सुटताना सर्व विद्यार्थी रांगेत नीट जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी माझीच नेमणूक करण्यात आली. त्यामुळे मला आवरण्याचा शिक्षकांचा त्रास वाचला. आणि मला ती दिसली. छान होती. छोटीशी. तिचे कपडे कडक इस्त्रीचे असायचे. चेहऱ्यावर एक उदास हसू असायचे. जणू कुणाला तरी शोधत असावी. मी बघितले की तिची नजर खाली जायची. एकदा ती माझ्याकडे बघून हसली असे मला वाटले आणि इतके दिवस मनाचे श्लोक, मूर्खांची लक्षणे, मारुतीस्तोत्र वगैरेंच्या पाठांतरात प्रत्यक्ष कल्याण स्वामींशी स्पर्धा करणाऱ्या माझी छाटी उडाली.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)

लेखक Anand More यांनी रविवार, 07/02/2016 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ___________________________________________________ मी शाळेत असताना मैत्रीण असणे ब्रम्हह्त्येइतके महापातक होते. आणि मी पापभीरू असल्याने माझ्यातील कुमारसुलभ भावनांना मुरड घालण्यात तत्कालिन समाजपुरुषाला यश आले होते. अनेक मुली मैत्रीण होण्याची क्षमता बाळगून आहेत आणि काही तर त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत हे कळत असून देखील मी ब्रम्हहत्या न करताच शाळेतून बाहेर पडलो होतो. त्याशिवाय मला शाळेत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मित्र होते. म्हणजे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी प्रत्येक वेळी मी नवीन मित्रांच्या घोळक्यात असे. घोळका पण छोटासा, मी धरून चार मित्र. दहावीनंतर ते पण सुटले. याचा अर्थ प्रत्येक वेळी मी आधीच्या मित्रांपेक्षा जास्त वेगाने सजाण होत होतो असा काढून मी स्वतःला समजावीत असलो तरी याचा अजून एक अर्थ दर तीन वर्षात माझे मित्र मला कंटाळत असतील असाही होऊ शकतो हे सत्य मी नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे मित्रांच्या गोड आठवणींपेक्षा मित्र सुटल्याच्या हुरहुर लावणाऱ्या आठवणी जास्त असल्याने, Reunion ला जावून कुणाशी काय बोलणार? कुणाला आपल्याशी बोलण्यात रस असणार? आणि आता तर एक गांधीबाबा पण गेले, अश्या विचाराने खिन्न होऊन घरी पोहोचलो.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)

लेखक Anand More यांनी शनिवार, 06/02/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो.

बेधुंद - भाग १

लेखक अविनाश लोंढे. यांनी शुक्रवार, 05/02/2016 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
(ह्या कथेतील सर्व पात्र नाव बदल्यामुळे काल्पनिक आहेत ! २००६ मध्ये कधीतरी … ह्याचे किती भाग होतील हे आत्ता मलाही माहित नाही ! ) आयुष्य हे कधीकधी 'वेड' करणार असतं . दुपारी खूप झोपायचा प्रयत्न करूनही त्याला झोप आली नाही . डोळे फक्त झाकलेले पण मनात लाखो विचारांचं वादळ ! 'चक्रीवादळात' अडकल्या प्रमाणे त्याचे मन कितीतरी वेळा अगणित विचारांमध्ये भिरभिरत होतं अन एखाद्या विवश 'पाचोटाला' जस वाऱ फिरवून कुठेही फेकून देत अगदी तसं त्याच मन कुठल्यातरी विचारात अडकल अन घड्याळाच्या गजराच्या आवाजाबरोबर जाग झालं . डोळे उघडताच 'हर्षला' चे बोलके काळेभोर डोळे त्याला सतावू लागले .

जिलबीचं प्रमाण किती असावं ?

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 02/02/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693 नमस्कार मंडळी, मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो. पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो. अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ. आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना? जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच. ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/01/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

फेसबुकी सुंद्री आणि नवकवी

लेखक खटासि खट यांनी शनिवार, 30/01/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
मधुरा सुंद्रीकर ला फेसबुकवर जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. ती काही रोजच आपले फोटो अपलोड करत होती असे नाही. एखादे दिवस गॅप देखील घ्यायची. तिच्या फोटोंमुळे घायाळ झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ती जेव्हां जेव्हां लॉगिन करीत असे तेव्हां ९०० + फ्रेण्ड रिक्वेस्टी पेंडींग असलेल्या दिसत. त्या वेळीच क्लिअर केल्या नाहीत तर मात्र हा आकडा फुगत जऊन एक दिवस प्रोफाईलचं काही बरं वाईट होईल असं वाटून ती आपल्या कोमल बोटांनी अनेकांच्या रिक्वेस्टींवर कात्री चालवत असे. स्त्री प्रोफाईल्सकडून तिला कमीच रिक्वेस्टी येत.

सोबत

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 29/01/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
[शतशब्द कथांबद्दल एक धागा दिसला. आपणही प्रयत्न करावा असं वाटलं. अर्थात ते मला जमलं नाही पण त्या प्रयत्नात ही कथा जमेल तितकी छोटी ठेवली आहे. अधिक काट-छाट करणे ठीक वाटले नाही , तेव्हा ३३४ (मायक्रोसॉप्फ्ट वर्डनुसार) शब्दांची ही कथा खास मिपाकरांसाठी] रात्री बाराच्या सुमारास विमानतळावरुन नीता बाहेर आली. राजेश नक्की येणारच याची तिला खात्री होतीच त्यामुळे तिने पर्स मधून फोन बाहेर काढला नाही. नऊ वाजता "फ्लाईट उशिराने आहे" हे सांगायला तिने त्याला फोन केला होता तेव्हा त्याच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता , शिवाय त्याचं डोकंही दुखत होतं. आपल्या प्रिय नवर्‍याला आपण त्रास देत आहोत असं तिला वाटून गेलं.

अप-grade

लेखक सायकलस्वार यांनी शुक्रवार, 29/01/2016 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
मॅनहॅटनमधल्या 'गॅजेट गॅलरी' च्या प्रशस्त दरवाजातून ढाकचिक बंड्या आत शिरला आणि आपल्याच घराच्या दिवाणखान्यात फिरत असल्यासारखा सराईतपणे त्या प्रचंड शोरूममध्ये फिरू लागला. त्याच्यासाठी ते दुकान नवे नव्हते. दर वीकेंडला तिथे जाऊन नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पाहणे, हाताळणे आणि भरमसाठ पैसे देऊन विकत घेणे ही त्याच्यासाठी नेहमीचीच गोष्ट होती. बंड्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा भलताच शौकीन. नुसता इलेक्ट्रॉनिक आयटेम्सचाच नव्हे. आपले कपडे, बूट, ॲक्सेसरीज अगदी लेटेस्ट फॅशनचे असले पाहिजेत असा त्याचा कटाक्ष होता. त्याच्या ह्या रुबाबामुळेच त्याला अख्ख्या जालन्यात 'ढाकचिक बंड्या' म्हणून ओळखले जात असे.

एअरलिफ्ट

लेखक Anand More यांनी रविवार, 24/01/2016 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो. पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स.