मी आणि लालबागच्या राजाचे दर्शन
आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावर्षीसाठी. टीव्ही वरूनच घेतलं. परंतु टीव्ही वरून जेंव्हा त्याचं लोभस आणि गोजिरं रूप पाहिलं तेंव्हा मात्र नकळत का होईना मनातून नमस्कार केला. मुद्दामचं प्रत्यक्ष नाही गेलो. शेवटी गणपती हे परब्रह्माचच रूप. ते सर्वंकडे आहेच. अगदी आपल्याला सर्वात जवळ अश्या आपल्या शरीरात आणि मनातदेखील. अगदीच मनाचं समाधान होण्यासाठी शरीराने देवाचं दर्शन घ्यावे असं वाटलं मग कोणत्याही सध्या गणपतीच्या मंदिरात जिथे खरी मानसिक आणि आत्मिक शांतता लाभेल तिकडे जावे कि अत्यंत गर्दीमध्ये धक्काबुक्कीत राजाकडे जावे असा प्रश्न जेंव्हा मनात येतो तेंव्हा मन साहजिकच पहिल्या पर्यायाकडं झुकतं.
मिसळपाव