Skip to main content

विचार

बळी [शतशब्दकथा]

लेखक निओ यांनी रविवार, 08/10/2017 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.

पोस्टरबाजी - ऐक दिखाऊपणाची गरज

लेखक ओरायन यांनी गुरुवार, 05/10/2017 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही शहराबाहेर, गावाबाहेर बाईकने, कारने, अथवा अन्य वाहनाने जात असतांना ,बाहेर रस्त्याच्या कडेला हास्यमुद्रेत असलेले ४,५ किंवा जास्त जणांचे टोळकं दिसतच. अर्थात हे टोळकं असत पोस्टरवर..कोणाचा वाढदिवस, किंवा कोणाची कुठेतरी लागलेली वर्णी ह्या साठी हे सर्वजण पोस्टरवर, शुभेच्छा देण्यासाठी किंवा अभिनंदन करण्यासाठी , विराजमान झालेले असतात. हे तुम्हांला तुमच्या शहरात, गावात पण मोक्याच्या ठिकाणी पण हास्यवदन करीत असतात. बर ,नाही बघायचे ठरवले तरी ते अशाप्रकारे लावलेले असतात की त्यांचे मुखदर्शन ओझरते का होईना होतेच.

आज ब्ल्यू हैं पानी पानी...

लेखक सरनौबत यांनी मंगळवार, 03/10/2017 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज ब्ल्यू हैं पानी पानी परवा कपाटाची आवरा-आवर करताना माझा आवडता Arrow चा पांढरा शर्ट दिसला. पांढरा शर्ट घालणे म्हणजे माझ्यासाठी 'पांढरा हत्ती' पोसण्याइतके अवघड काम आहे. पांढराशुभ्र शर्ट मी माझ्या अब्रु इतका जपतो. सर्फ एक्सेल कंपनीसाठी भले 'दाग अच्छे' असतील, पण पांढऱ्या शर्टसाठी अजिबात नाही. छोटासा डाग देखील पांढऱ्या रंगावर ठळकपणे दिसतो. म्हणून चुकूनही डाग पडू नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते. कधीनव्हे तो पांढरा शर्ट घालावा आणि नेमकी त्याच दिवशी घरी आवडती उडदाची आमटी असते. आमटीचे मनसोक्त भुरके मारताना शर्टवर एखादा शिंतोडा उडण्याची भीती.

परेल-एलफिंस्टनच्या निमित्ताने ....

लेखक औरंगजेब यांनी शुक्रवार, 29/09/2017 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळची बातमी आपल्या सगळ्यांनाच हलवून गेली आहे. २२ बळी! आणी अनेक जखमी. परेल-एलफिंस्टनचा ब्रिज म्हणजे साक्षात यमाने टाकलेला फासच होता आज. मुळात ही दोन्ही स्टेशन्स ब्रिटिशकालीन आहेत. सदर पूल हा सुद्धा खूप जुना आहे. या दोन्ही स्टेशनचा फलाट आपण बघितला तर तो आयलंड प्लॕटफाॕर्म आहे. ( परेल ला तर आहेच आहे) अशा परिस्थितीत दोन्ही फलाटांवर गाड्या आल्या तर पुलावर खूपच गर्दी होते. त्यात आज पाऊस होता. त्यामूळे लोकं पुलावरुन हललेच नाहीत. पुलाचा पत्रा तुटला. त्याचा मोठ्ठा आवाज झाला. आणी मग पळापळी सुरु झाली. त्यात लोकांचा चेंगरुन जीव गेला. रेल्वेचा हा गलथानपणा आहेच.

बुलेट ट्रेन (भाग ६)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/09/2017 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागील पाच भागात आपण भारतातला ताजमहाल, अमेरिकेतील हूवर धरण, जपानची शिन्कान्सेन, तैवानची बुलेट ट्रेन, श्रीलंकेचा मटाला राजपक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉंगकॉंगचा हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आर्थिक बाजूंचा विचार केला. यातील हूवर धरण, शिन्कान्सेन आणि हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडल्यास इतर प्रकल्प आर्थिक दृष्ट्या आतबट्ट्याचा व्यवहार ठरले आहेत हे देखील पाहिले. याशिवाय, विरळ लोकवस्ती असलेल्या अमेरिकेत अजूनही बुलेट ट्रेन नाहीत. तुलनेने घनदाट वस्ती असलेल्या स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी मधील जलद गती रेल्वे तोट्यात आहेत आणि त्यांचा सुरक्षिततेचा रेकॉर्ड फार उल्लेखनीय नाही.

बुलेट ट्रेन (भाग ५) : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/09/2017 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात मुक्त व्यापाराचे वारे वाहात होते. अॅडम स्मिथने सांगितलेल्या अर्थविषयक अनेक तत्वांपैकी काही काही तत्वे युरोपातील देशांनी स्वीकारायला सुरुवात केली होती. 'देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा' हे तत्व मान्य झालेले होते. सरकारने बाजारात पडू नये, केवळ कायदे करावेत आणि राजनैतिक संबंध सांभाळावेत हे तत्व अर्धेमुर्धे पटलेले होते. अर्धेमुर्धे म्हटलं कारण सरकारने बाजारात उतरू नये हे तत्व युरोपातील बहुतेक सरकारे पळत होती पण अॅडम स्मिथचा ज्याला तीव्र विरोध होता टी मक्तेदारी मात्र सरकारी आशीर्वादाने फोफावत होती.

बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका

लेखक Anand More यांनी बुधवार, 27/09/2017 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर देशांनी आपल्याला फसवले आहे का? की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे? जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी वाहतुकीसंबंधीच्या तीन महाकाय प्रकल्पांबद्दल मी काय वाचले आहे ते चौथ्या आणि पाचव्या भागात प्रथम सांगतो आणि मग सहाव्या भागात वरील प्रश्नांची उत्तरे देऊन ही लेखमाला संपवतो. पहिला प्रकल्प आहे तो तैवान बुलेट ट्रेनचा. तैवान हा एक छोटासा देश आहे. श्रीलंकेच्या बेटाची रुंदी जर कमी केली तर ते बेट जसं दिसेल साधारणपणे तसाच तैवानचा आकार आहे.

बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉड गेज

लेखक Anand More यांनी मंगळवार, 26/09/2017 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ ज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं? आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का?

बुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी

लेखक Anand More यांनी सोमवार, 25/09/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
बुलेट ट्रेनवरच्या लेखमालेच्या पहिल्या भागात ताजमहाल आणि हूवर धरण याची तुलना करून बुलेट ट्रेन प्रकल्पापुढील आव्हाने मांडायचा प्रयत्न केला होता. मुख्य मुद्दा एकंच होता. ताजमहाल संपूर्ण सल्तनतीच्या गोळा करून ठेवलेल्या करातून बनला आणि जेव्हा त्यामुळे सल्तनतीचा खजिन्यात ठणठणाट झाला तेव्हा पुढील सम्राट औरंगझेबाला संपूर्ण सल्तनतीकडून नवीन जाचक कर वसूल करावे लागले.