लहानपण देगा देवा!
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।।
तुकाराम महाराजांच्या या अभांगाच्या पहिल्या दोन ओळी अनेक मोठी माणसे म्हणताना आपण बघतो. विशेषतः जेव्हा जुने मित्र-मैत्रिणी भेटतात त्यावेळी जुने दिवस; लहानपणच्या आठवणी जागवल्या जातात; तेव्हा हमखास परत एकदा लहान व्हावं असं आपल्याला वाटतं. किंवा मग कामाचा, भावनांचा खूप भार होतो तेव्हा या जवाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन परत एकदा लहानपणच निरागस आणि जवाबदारी नसणार आयुष्य जगावं असं वाटतं.
पण आपल्याला खरंच आपलं लहानपण हव असत का? की फक्त त्यावेळचा निरागसपणा आणि जवाबदारी नसणं जास्त भावत? आज आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या निर्णयासाठी कोणावरही अवलंबून नाही आहोत.
मिसळपाव