लिफ्ट करा दे
लिफ्ट करा दे
दिवसभर ऑफीसमध्ये एकामागोमाग एक मिटींग्समुळे पुरती दमणूक झालेली. संध्याकाळी उशीरा एकदाची कामं संपली. आता घरी जाऊन मस्तपैकी अंघोळ करायची आणि मग टीव्हीवर 'चला हवा येऊ द्या' बघत जेवायचं ह्या विचारात घराजवळ कधी पोचलो समजलंच नाही. तळमजल्यावर लिफ्ट जणू काही माझीच वाट बघत थांबली होती. लिफ्ट मध्ये मी एकटाच होतो. पाचव्या मजल्याचं बटण दाबलं. आता काही सेकंदातच घरी पोचणार ह्या विचाराने आनंद झाला. काही सेकंदातच लिफ्टचं दार उघडलं. मी बाहेर पडणार तेवढ्यात लक्षात आलं कि (च्यायला!) हा तर तिसरा मजला आहे.
मिसळपाव