Skip to main content

विचार

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दरार में ,,,,,,,, भाग १

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 09/04/2019 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
१८५७ साली हिंदुस्थानांत इंग्रजांच्या विरुद्ध घडलेल्या घटनांना नक्की काय नांव द्यावे याबद्दलची मतें त्यानंतर १०० वर्षे तरी पक्की होऊ शकली नव्हती. हिंदुस्थानचे त्याकाळातले सर्वेसर्वा "कंपनी सरकार" किंवा "कंपनी बहादूर" आणि नंतरचे "राजे" असलेल्या इंग्रजाना ते अर्थातच हिंदुस्थान शिपायांचे बंड वाटत राहिले. जरी त्यानंतर बऱ्याच स्वातंत्र्यवीरांना ते वर्ष "स्वातंत्र्यसमराची सुरवात" असे वाटले तरी बराच काळ स्वतंत्र भारतांतील शासकीय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांत १९४७ नंतर सुद्धा - इंग्रजांनी घालून दिलेल्या आराखड्याना अनुसरून- १८५७ मध्ये भारतांत घडलेल्या घटनांचा उल्लेख अंमळ संदिग्ध आणि संक्षिप्तच राहिला.

मी अनुभवलेलं गणपती मंदिर

लेखक मधुरा कुलकर्णी यांनी रविवार, 07/04/2019 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे ... आशा आहे तुम्हाला आवडेल... चुका असल्यास नक्की सांगा ... मी अनुभवलेले गणपती मंदिर           विश्वास होता तिला...

भेटीगाठी पण समाजातील रंगांच्या

लेखक chittmanthan.OOO यांनी रविवार, 31/03/2019 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आपला देश आपली संस्कृती, आपला समाज याबद्दल आपल्याला इतक्यांदा अभिमानाचे डोस पाजलेले असतात किंवा ते आपल्या अंगात इतके भिनवलेले असतात की आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला त्याबद्दलचा अभिमान दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतोच. खर तर आपला देश म्हणजे एक "खुली किताब" आहे ज्याबद्दल सर्वच व्यक्तींना सर्व काही माहीत आहे. असाच विचार करून मी newspaper वाचायला घेतला. त्याच त्याच टिपिकल राजकारणाच्या बातम्या...!!

दुरून डोंगर साजरे (लघुकथा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 29/03/2019 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल. "Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?" "No!

दुरून डोंगर साजरे (लघुकथा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 29/03/2019 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल. "Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?" "No!

तेव्हाच की आजच

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 29/03/2019 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
जसं जस वय वाढत जात तसा शरीरावर मनाचा अंकुश वाढत जातो. मन शारीरिक क्रियांच दमन करू लागलंय.विशीतलं हस्तमैथुन आता मात्र उगाचंच अपराधी भाव मनात निर्माण करत.निव्वळ शारीरिक असलेली कामप्रेरणा नैतिकतेच्या बाता मारू लागते तेव्हा स्वतःलाच आश्चर्य वाटू लागतं स्वतःचच...एफ टीव्ही वरच्या मॉडेल बघण्याचा काळ होता एक...मॉडेलशी दूर दूरवर संबंध नसताना देखील काम प्रेरणा चाळवत होत्या. तिथून सुरू झालेला तो मनाचा खेळ आज इथवर येऊन ठेपलाय... आज मैथुन झाल्यावर कळतो त्यातला विफलपणा....

सामाजिक उपक्रम -२०१९

लेखक निशदे यांनी सोमवार, 18/03/2019 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. मित्रपरिवाराच्या आणि साथीने गेली ९ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. उपक्रमाविषयी थोडेसे: माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे.

मरणाचं अर्थशास्त्र

लेखक अबोलघेवडा यांनी शुक्रवार, 15/03/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
काल बातमी आली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघणारा फूट ओव्हर ब्रिज कोसळला. काही माणसं मेली. कसंही मरण येऊ शकतं आपल्या देशात. कोणी उघड्या गटारात पडून मरतं, कोणी रस्त्यावरच्या सुट्या विजेच्या तारेला धक्का लागून मरतं, कोणी झाड पडून मरतं. कोणी भिंत पडून मरतं तर कोणी इमारत कोसळून मरतं. कोणी सरकारी दवाखान्यात योग्य उपचार न मिळाल्याने मरतं तर कोणी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून मरतं. कुठेना कुठेतरी या सगळ्याची मुळं भ्रष्ट सामाजिक व्यवस्थेत आणि मानसिकतेत असतात. आपण तरी धुतल्या तांदळासारखे पवित्र कुठे असतो? काही जणं 70% भ्रष्ट असतील तर कदाचित आपण 30% च असू.

Women 's Day - 2019

लेखक माउ यांनी शनिवार, 09/03/2019 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळीनो ! काल ' जागतिक महिला दिन' (International Women 's Day ) झाला. सगळ्या महिलांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. ज्या working आहेत, त्यांनी छान Day Out त्यांचा enjoy केला. बऱ्याच पुरुषांनी त्यांच्या मुलीना,आई ला, बायकोला, मैत्रिणी ना, girlfriend ला वेगवेगळ्या पद्धतीने wish केले. Such a kind gesture! परत Men - Women Equality, women and their rights ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाल्या ofcourse on different platforms .. मी स्वतः एक स्त्री आहे पण मुळात मला ह्या Women 's Day celebration वर थोडासा आक्षेप आहे.

अर्थव्यवस्थेच्या दिशेचा अंदाज

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 24/02/2019 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते. सामान्य गुंतवणुकदार "अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.