भाषा - फ्रेन्चचा ढासळता बुरुज
लेखनप्रकार
गेल्या महिन्यात एक घटना घडली. जगाच्या दृष्टीने म्हटले तर अगदीच क्षुल्लक वाटणारी. भारतातील वृत्तपत्रात तर शेवटच्या पानावरदेखिल तिला स्थान मिळाले नसावे. पण फ्रान्समध्ये मात्र त्या घटनेने मोठा गदारोळ उठला.
अशी काय होती ती घटना?
रवांडा हा अफ्रिकेतील एक टिनपाट देश. अधिकृत भाषा फ्रेन्च. पण गेल्याच महिन्यात रवांडा सरकारने इंग्लीश ही अधिकृत भाषा करण्याचे संकेत दिले. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांत फ्रेन्चऐवजी इंग्लीश शिकविण्याचे ठरविले. आणि फ्रान्समध्ये हलकल्लोळ माजला!
आपल्या भाषेविष्यी, जगातील तिच्या स्थानाविषयी फ्रान्स अतिशय हळवा आहे. आपल्या भाषेच्या जपणूकीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायचीही त्याची तयारी असते. मात्र वारे आता इंग्लीशच्या दिशेने वाहताहेत, जागतिक स्पर्धेत इंग्लीशबरोबरची लढाई आपण दोन शतकांपूर्वीच हरलो आहोत हे कळूनही न वळण्याची त्याची वृत्ती मात्र अनाकलनीय आहे.
मानवी इतिहासात असे कालखंड येऊन गेले की, त्या त्या कालखंडात एखादी भाग्यवान भाषा आपल्या मूलस्थानापेक्षाही अधिक मोठ्या भूभागावर प्रभाव गाजवून गेली.
एक काळ संस्कृतचा होता. पार मलेशिया-इंडोनेशिया पर्यंत तिचा प्रभाव गेला होता. तेथिल स्थानिक भाषांवर आजही संस्कृतचा प्रभाव जाणवून येतो.
अलेक्झांडरच्या स्वारीनंतर शेकडॉ वर्षे - ज्याला बायझेंटाइन काळ म्हणतात - तेव्हा ग्रीक भाषेने हे वैभव भोगले.
मध्ययुगीन काळात फ्रेन्चचा दबदबा होता. रशियापासून ते इंग्लंड पर्यंतचे राजेरजवाडे (हॅनोवर घराण्यातील पहिला जॉर्ज हा अपवाद) तर फ्रेन्चमध्ये बोलीतच पण युरोपातील इतरही धनिक्-वणिक उच्चभ्रू हे देखिल फ्रेन्चमध्ये बोलणे हे अधिक प्रतिष्ठेचे मानीत.
मात्र ह्या सर्वांपेक्षाही इंग्लीशचे भाग्य अधिक थोर आहे! वरील भाषांचे प्रभाव क्षेत्र हे त्या त्या भाषेच्या मूळस्थानापेक्षा मोठे असले तरी तसे मर्यादितच होते. शिवाय प्रभावकाळही काही शतकांचाच होता/असावा. इंग्लीशच्या प्रभावक्षेत्रात संपूर्ण जग तर आले आहेच पण तिचा प्रभावही दीर्घकाळ टिकेल असे दिसते आहे.
इंग्लीशला तीन दाने अतिशय अनुकुल अशी पडली.
पहिले, वसाहतवादाच्या स्पर्धेत इंग्लंडला मिळालेले यश. स्पेन आणि पोर्तुगालच्या नंतर उतरूनही इंग्लंडने मारलेली मजल लक्षणीय होती. खेरीज, तिच्या पूर्वीच्या वसाहतींतून इंग्लीश भाषा केवळ टिकलीच नाही तर, चक्क फोफावली.
दुसरे दान औद्योगिक क्रांतीचे. ह्या क्रांतीची मुहुर्तमेढ इंग्लंडमध्ये रोवली गेली. त्यातून अनेक नवीन शब्द इंग्लीशमध्ये घडवले गेले - उदा रेल्वे - हे शब्द जगभरच्या भाषांत झिरपले गेले.
आणि तिसरे दान - खरेतर त्सुनामीच म्हणायले हवे - ते म्हणजे संगणक आणि इंटरनेट यांचा अमेरिकेत लागलेला शोध. जगातील एकही भाषा ह्या झंझावातातून सुटली नाही.
दिवसागणिक इंग्लीशचा प्रभाव वाढतो आहे. फ्रेन्चमात्र आपल्या गतवैभवाच्या नॉस्टेलजियातून बाहेर पडायला तयार नाहीत. रवांडाच्या निर्णयाने त्याच्या ढासळत्या बुरुजाचा एक दगड कोसळला इतकेच.
वाचने
7616
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुनील
In reply to सुनील by सहज
टिनपाट..
In reply to सुनील by सहज
चुकून....
In reply to सुनील by सहज
असेच म्हणतो.
भाषांच्या
धन्यवाद!
धावता आढावा
दिवसागणिक
सुंदर लेख
चांगला लेख
दोघा भाषेतील नेमका फरक काय आहे?
In reply to दोघा भाषेतील नेमका फरक काय आहे? by कलंत्री
काही उत्तरे ..
In reply to काही उत्तरे .. by सुनील
अजून काही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
युरोपीयन
In reply to युरोपीयन by विजुभाऊ
फ्रेंच -
भाषा..
भाषा..
फ्रेंच - मराठी
In reply to फ्रेंच - मराठी by अभिरत भिरभि-या
इंग्रज आणि डच
In reply to इंग्रज आणि डच by सुनील
इतर ?
In reply to इतर ? by अभिरत भिरभि-या
पोर्तुगीज
In reply to पोर्तुगीज by सुनील
आले होते.
In reply to आले होते. by कलंत्री
मी तर समजत
In reply to इतर ? by अभिरत भिरभि-या
( गेस आणि