Skip to main content

विचार

खट खट, खट खट, खटक!!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 12/04/2010 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक बातमी वाचली. मुंबापुरीची. एका मध्यमवर्गीय वस्तीत घडलेली. झाल काय; एका घरा समोर पत्रे येऊन पडू लागली. मजकूर घरच्या स्त्री चा चारित्र्य हनन करणारा. जोडप पहिला थोड अस्वस्थ, मग मात्र तिसरया पत्रानंतर त्यांनी कॅमेरा बसवला.

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

ऑर्कुटिंग

लेखक सुचेल तसं यांनी गुरुवार, 08/04/2010 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
ऑर्कुट ही एक मजेदार सोशल नेटवर्किंग साईट आहे. फेसबुक वगैरे आत्ता आत्ता भारतात जोर धरत आहे. पण ऑर्कुट आपल्या पब्लिक मध्ये जाम लोकप्रिय आहे. मला नेहेमी काही प्रश्न पडतात. १. समजा अमुक अमुक माणूस पुण्यात रहात असेल आणि तो १ - २ दिवसासाठी दुसऱ्या गावाला जाणार असेल तर लगेच स्टेटस मध्ये " गोइंग टु नगर/कोल्हापूर/नाशिक" तत्सम गोष्टी लोक का बर अपडेट करतात? २. लग्नाला २ महिने राहिले असतील तर "काउंट-डाऊन बिगीन्स, ६० डेज टु गो", दुसऱ्या दिवशी परत "५९ डेज टु गो" हे असं लग्नाच्या दिवसापर्यंत लोक का बर टाकत बसतात? ह्या उत्साहाच नेमकं उगमस्थान काय असावं? ३.

मिपा अस का झाल?

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 07/04/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा अस का झाल? हो आज खुप दीवसांनी मिपावर आलो आणि काय मजा नाही आली!!शप्पथ वैतागायला झाल.......हे पहील अस नाही व्हायच.हा व्ययक्तिक अनुभव असु शकतो पण काहीजण सहमत असतील अस वाट्त. हे लिहण्यात उद्देश वगैरे काही नाही.सहज लिहतोय,जे जानवल ते.पहील प्रतिसाद वाचायला पण मजा यायची.आज ते लेख काय आणि काय त्या प्रतिक्रिया!!सर्वच पचपचीत वाटल. आणि ते युयुत्सु असे लेख कोणत्या उद्देशाने लिहतात ते काय कळत नाही.आज 'नवे लेख' मधली दोन पाने वाचली व हे लिहावसे वाटले. आपल्याला मंगे..पाव...

माझे जग

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/04/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझे जग
काही दिवसांपुर्वी एखाद्या वर्षापुर्वी मी एकटी होते. नाही म्हणायला माझ्या इतर दोन भगिनी होत्या घरात. तसं आम्ही तिघेही समोरासमोरच होतो. दररोज सकाळी जाग आल्यावर आमचे बोलणी व्ह्यायची व्ह्यायची. आमच्या काही चुलत बहिणी पण वरच्या मजल्यावर होत्या. त्या आता काही दिसत नव्हत्या. आम्हाला येथे आणण्याच्यावेळी एका गाडीत आम्ही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून आलेलो होतो तेव्हांचेच काय ते बोलणे त्यांच्याशी. आता फक्त खालच्या मजल्यावरील आम्ही तीन भगीनीच एकमेकांशी बोलू शकतो, पाहू शकतो. नव्याचे नउ दिवस असतात तसे आमचे रंग नविन होते.

तुमचे उदगारवाचक वाक्य कोणते?

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 03/04/2010 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
'तुमचे प्रेरणावाक्य कोणते?' ह्या लेखावरुन ठापली आयडीया.......शुध्द भाषेत अनुकरण वगैरे..केले. खुप माणसांचे रागात्,आश्चर्य झाल्यावर्,हसल्यावर काही न काही बोलयची सवय असते.त्याला उदगार्वचक शब्द म्हणतात असा माझा समज. मग एखादा व्यक्ती काय बोलतो त्यावर त्याच level,विचारसरणी,संस्क्रुती,family background वगैरेचा अंदाज काढला जातो.जस समजा एखाद्याच रस्त्यावर चालताना पच्कन घानीत पाय गेला की........"च्याय्चा *****" हे असे अपशब्द चालु होतात,काहीजण."अरेरे........श्यी" असे काय तरी बोलतात. चला उदाहरण चांगल भेटलय.अस तुमच्याबरोबर झाल तर किंवा होते तेव्हा तुम्ही काय बोलता........? सहाजिकच कोणी खर लिहण्याच

ओंकाराची नाडीपरिक्षा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 03/04/2010 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर सध्या नाडीचे प्रस्थ वाढत आहे. वेळोवेळी त्याचा प्रतिवाद केला आहे. वाद प्रतिवाद चालुच असतात. आम्ही ज्या ओंकार पाटील यांचा संदर्भ दिला होता तो लेख संपुर्णपणे टंकणे शक्य नसल्याने तो पीडीएफ स्वरुपातील आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या डिजिटल ग्रंथालयातील प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या पुस्तकात आहे .तेवढ्याच लेखाचा संदर्भ खाली देत आहे. श्री. ओंकार पाटील हे एक बीएसएनएल मधील अधिकारी आहेत.