Skip to main content

विचार

स्त्रीची आजची प्रतिमा - २

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 30/04/2010 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या स्त्रीची प्रतिमा - या मालेची सुरूवात झाली तेव्हा कल्पना अशी होती की स्त्रीचं भोगवस्तू हे एकांगी चित्र आहे, व तेच बघत बसण्याऐवजी (आधुनिक व ऐतिहासिक) स्त्रीच्या रूपाचे व कर्तृत्वाचे विविध पैलू बघता यावेत. काय लिहावं असा प्रश्न होता. पण आपल्यापासून दूर असलेल्या जवळपास काल्पनिक वाटणाऱ्या कर्तबगार स्त्रियांऐवजी आपल्या रोज संपर्कात येणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, करीअरसाठी धडपडणाऱ्या मैत्रिणींविषयी लिहावंसं वाटलं. शेवटी आजच्या स्त्रीची प्रतिमा काय आहे हे आजच्याच परिस्थितीत बघायला नको का? खाली एक काल्पनिक चर्चा दिली आहे.

फुकट वेळ असला की हे असं होतं...

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 30/04/2010 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
किती दिवस झाले मुखपृष्ठावरचा डावीकडचा 'लेखन करा' टॅब खुणावत आहे! आज मात्र मी मनावर घेतलंय. आज मी काहीतरी लिहिणारच! एखादा वैचारिक लेख लिहावा लिहावा असं कधीपासून मनात होतं. मीही विचारवंत होणार! मीही काहीतरी अर्थपूर्ण लिहिणार.. माझ्याही लेखावर प्रतिसादाच्या खिरापती वाटल्या जाणार!! केवळ विचारानंच बघा कसं गारगार वाटतं! मग एका क्षणात भावी विचारवंताच्या मनाला एक विचार हलकेच स्पर्श करून जातो.. कशाला इतका तो प्रपंच? वैचारिक लेख लिहिणं म्हणजे काय विचार करण्याइतकं सोप्पंय होय? शिंप्याने कपडे शिवावे- ते त्याचं काम, धोब्याने ते धुवावे.. ('ते' म्हणजे कपडे..

पुण्यातील वाहतुकः समस्या आणि उपाय

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 28/04/2010 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील वाहतुक समस्येवर वसंत व्याखानमालेत आपले सदीप ब्याखान देण्याचा मान यावेळी पथमच वाहतुक विभागाचे पोलिस उपायुक्त श्री मनोज पाटील यांना मिळाला. पुण्यातील वाहतुक हा संवेदनशील नागरिकाचा चिडचिड करण्याचा विषय आहे. मनोज पाटलांनी ही समस्या अतिशय संयतपणे कोणावरही टीका न करता व पुणेकर नागरिकांच्या मनातील भाषेत मांडली.सांगलीतील वालचंद कॊलेज मधुन संगणक शास्त्राची पदवी घेउन सुरवातीला त्याच कॊलजे मधे लेक्चरर म्हणुन असलेले मनोज पाटील नंतर पोलिस खात्यात आले. पुण्यात त्यांना अचानकच वाहतुक उपायुक्त पद गळ्यात पडले. तेव्हा त्यांना अनेक हितचिंतकांनी सल्ला दिला उत्तम मार्ग म्हणजे काहीच न करणे.

घेतल्याशिवाय र्‍हाणार नाय!...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 28/04/2010 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी, मुंबईच्या चर्चगेट स्टेशनातून बाहेर पडून मंत्रालयाच्या दिशेने चालायला सुरुवात केली, की समोरचा रस्ता अनेकदा पोलिसांच्या बॅरिकेडसनी बंद झालेला दिसायचा. सम्राट हॉटेल हे नाव त्या वेळी उभ्या महाराष्ट्राला वर्तमानपत्रांतून दिवसाआड एकदा तरी वाचायला मिळायचं. कारण या पोलिसी बॅरिकेडसचं आणि सम्राट हॉटेलचं त्या वेळी खूपच जवळचं नातं होतं... मग शेजारच्या फूटपाथवरून वाट काढत मंत्रालयाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली, की उभा महाराष्ट्र त्या रस्त्यावर उतरलाय, असं चित्र दिसायचं...

गंधमय अस्तित्त्वाचा शोध.......

लेखक सांजसखी यांनी सोमवार, 26/04/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
होती एक जमीन.... खडकाळ, भेगाळलेली, ओसाड आणि नापीक..... अतिशय निरपेक्ष ..... जणू स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव नसलेली.... काळाच्या ओघात गोठलेल्या भावनांची आणि त्यामुळे या भावनाविश्वाशी दूर दूर जाऊ पहाणारी....... तिच्या मनात एकच सलं होता..... आपण नापीक... निरूपयोगी.... आणि म्हणूनच की काय सारं जगं आपल्याला वाळीत टाकल्यासारखं दुर्लक्ष करतं.... तिला सतत एकच भीती असायची... ती सतत बदलणार्‍या ॠतूंची.... कधी रखरखणार्‍या ऊन्हाची......तर कधी झोंबणार्‍या वार्‍याची .... कधी हुलकावणी देणार्‍या अन न बरसणार्‍या ढगांची...... असचं आयुष्य होतं तिचं .. एकाकी... निरस.. रू़क्ष... पण काळाचा महिमा खरचं अजब असतो....

आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 26/04/2010 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्‍यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा.. आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे.. मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!) "तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले. मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली.

काल्पनिक सत्यकथा: "बाबाजार!!"

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 25/04/2010 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार संध्याकाळ. कामावरुन घरी परत येत होतो. बसमध्ये भयंकर गर्दी. मला सुरुवातीपासून बसायला जागा मिळाली नव्हती. थोडा प्रवास झाल्यानंतर बसमध्ये एके ठीकाणी बसायला जागा मिळाली. सकाळी विकत घेतलेले वर्तमानपत्र तसेच घडी केलेले बॅगमध्ये होते. सकाळी उभ्या उभ्या प्रवास केल्याने ते वाचायला मिळालेच नव्हते. बसल्यावर वाचायला घेतले. पण गर्दीमुळे नीट वाचता येईना. फक्त मुखपृष्ठावरच्या बातम्यांचे मथळे वाचून झाले आणि पेपर तसाच ठेवून दिला.

आमच्या तेंडल्याचा वाढदिवस !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 23/04/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
सच्या भावड्या तुझा वाढदिवस आला..... आमच्या साठी २४ एप्रिल हा "सचिन दिवस" ! खोटं नाही सांगत - ह्या दिवशी आम्ही घरी गोडधोड करतो.... तू खेळत नसलास तर तुझ्या खेळींची चित्रफीत बघतो. आणि आम्ही गेल्या वर्षभरात काय काय बरोबर - चूक केलं त्याचा हिशोब मांडून तुझ्यासारखं काहीतरी (आमच्या लायकीनीच रे!) करायचा संकल्प करतो. ह्या वर्षी तर खूप मोठं सेलेब्रेशन होणार ! आयपीएल मध्ये ज्या पद्धतीनी मुंबईचा संघ हाताळलायस, जसा काय खेळलायस... आणि हो की रे !

मिसळपाव...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 22/04/2010 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपण सर्व मिपाकर हे जाणतो की मिसळपाव हे संकेतस्थळ श्री तात्या अभ्यंकर यांनी स्थापन केले आहे. ते या संकेतस्थळाचे मालक सुध्दा आहेत. गेल्या काही महिण्यांपासून मिपाच्या व्यवस्थापनाकडे तात्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने मी व संपादक मंडळानेच मिपा सुरू ठेवलंय. आता सुध्दा येत्या काही काळ तात्यांना मिपाकडे लक्ष देणे होणार असे दिसत नाही. त्यामुळे तात्यांनी आधी अघोषीत असलेली व्यवस्था घोषीत केलीये की मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार नीलकांत कडे असतील. यात मालकी हक्काबाबत कुठलाही उल्लेख आलेला नाहीये. त्यामुळे त्याबाबत वर केलेल्या विधानाशिवाय काहीही उल्लेख करने गैरलागू आहे.

मॅजिक किंगडम!

लेखक मीली यांनी गुरुवार, 22/04/2010 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
मॅजिक किंगडम लिबर्टी स्वेयर बोटीने आम्ही मॅजिक किंगडम च्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. बोटीतून दिसलेले डिस्ने चे रेसोर्ट. गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून थोडे पुढे गेलो आणि सिंड्रेला चा महाल दिसला.