Skip to main content

विचार

करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 01/02/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..?

मी ?? म्हातारा ???

लेखक गवि यांनी मंगळवार, 31/01/2012 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली. का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्‍याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे.. "मी.. ?? म्हातारा ???" ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे.. ........................ मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध.. जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो.

एक बहारदार जुने गाणे

लेखक प्रदीप यांनी रविवार, 29/01/2012 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी पूर्वी ऐकलेले एखादे गाणे मनात पुन्हा अचानक उतरते. मग ते काही दिवस मनात घर करून बसते. तसे मला अलिकडे मालती पांडेंच्या 'कशी रे तुला भेटू' ने वेढले आहे. http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Re_Tula_Bhetu सुमारे १९४५ नंतर मराठीत भावगीतांचा नवा जमाना आला. ह्याची सुरूवात गजानराव वाटवे ब बबनराव नावाडीकर ह्यांनी केली. नंतर इतर अनेक कवि/ कवयित्रींच्या रचना घेऊन, अनेक नवनव्या गायिकांसह इतर संगीतकार त्यात उतरले. त्या गायिकांतील एक अग्रगण्या नाव म्हणजे मालती पांडे.

!! श्रद्धांजली !!

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 25/01/2012 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुण्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली..... संतोष माने नावाच्या एका माथेफिरू S.T महामंडळाच्या कर्मचाऱ्याने बिचाऱ्या ९ माणसांना कारण नसताना चिरडले आणि कित्येक लोकांना जखमी केले.. याच्यावर काय लिहावे तेच कळत नाही....डोके बधीर आणि सुन्न झाले आहे. या घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांना !! श्रद्धांजली !!

हस्ताक्षरातील अक्षर...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/01/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

घृतं पिबेत

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 20/01/2012 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
असेही दिवस होते की सांजवात तिळाच्या तेलात भिजायची तर निरांजनातल्या फुलवाती साजुक तूपात भिजायच्या. अंबाडीच्या भाजीवरची लसणाची फोडणी तेलात व्हायची तर कढीला चुर्रकार फोडणी तूपातली मिळायची.

स्फुट: रचना!

लेखक राघव यांनी गुरुवार, 19/01/2012 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही सुंदर रचना कशी घडत असेल? बर्‍याच दिवसांपासून उगाच हा प्रश्न मला पिडतोय. :) तसं तर रचना = पदार्थ, शिल्प, रेखाचित्र, छायाचित्र, गद्य-पद्य लेखन, संगीत.. पण सोबतच एखादे सुंदर घर, एखादी आठवण, एखादं मैत्रीचं अतूट नातं, एखादी अप्रतीम - संपूच नये असं वाटणारी संध्याकाळ.. असंही बरंच काही म्हणता येईल.. नाही? मग विचार केला, कोणतीही रचना सुंदर केव्हा नसते? सहज उत्तर येतं.. जेव्हा ती आवडत नाही! का आवडत नाही? हृदयाला भिडत नाही म्हणून. म्हणजे कोणतीही रचना सुंदर तेव्हा होते जेव्हा ती हृदयाला भिडते.