पु लं , तुम्ही परत या. आम्हाला येवून हसवा. खूप खूप हसवा. तुम्हाला जावून आज १२ वर्ष झाली. आम्ही पोरके झालो.
१२ वर्षात आमच्या आयुष्यात बरेच बदल झाले.
अहो, 'भाई' या शब्दाचा अर्थही बदललाय. विनोदाची व्याख्याही बदललीय. तुमच्या सारखा निर्भेळ विनोद आज नाही. आज पोपट पंचीला प्रतिष्ठा मिळाली आहे.
निराश झालो कि तुमचे टेप केलेले कार्यक्रम बघतो; मनाला उभारी येते.
आजही नारायण आहे, आजचा नारायण जीन्स घालतो, रंगीबेरंगी टीशर्ट घालतो. मनगटावर किमती घड्याळ, डोळ्यावर ray -ban चा गॉगल घालतो. पायात reebok चे बूट घालतो. हातात आयफोन असतो. तो बाईक चालवतो. पण तो तेवढाच जुन्या वळणाचा आहे . खिशात पाकिटात कुठल्या तरी महाराजांचा फोटो असतो, त्यांच्यावर त्याची श्रद्धा आहे . तो मधून मधून महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाला जातो. त्याची स्वतःची पत्रिका पण पाकिटात असते. दिसेल त्या जोतीशाला पत्रिका दाखवण्याची त्याची हौस आहे.
आजही चितळे मास्तर आहेत. पण ते शिक्षण सम्राटाच्या शाळेत शिकवतात. शिकवण्या घेतात. त्यांची फी भरपूर आहे. काळाप्रमाणे त्यांच्याही गरजा वाढल्यात. शिकवण्यापेक्षा पैश्यात जास्त रस आहे. ते तरी काय करणार. शिक्षणसम्राट विद्येच्या माहेर घरी येवून विद्येलाच विकून खावू लागलेत.
आजही नाथा कामत आहे. तो शादी डॉट कॉम वर असतो. त्याला इंटरनेट वर कविता मिळतात, त्याच चिकटवून मुलीना पाठवतो. आय टी मध्ये आहे, त्याचा बराच वेळ फेस बुक वर च्या मुली बघण्यात जातो. रात्री बेरात्री इंटरनेट वर काय बघत असतो त्याच त्यालाच माहित.
आजही नंदा प्रधान आहे. अमेरिकेत new york मध्ये एका मोठ्या कंपनीत गुंतवणूक सल्लागार आहे. गोर्या पोरी त्याच्या मागे आहेत. त्यांच्या बरोबर तो फिरत असतो. पण त्याची एक इराणी मैत्रीण होती, तिचं लग्न झालं आणि त्याला पोरका करून गेली. तो मधून मधून महाराष्ट्र मंडळात कार्यक्रमाला जातो.
आजही पेस्तन काका आहेत. मुंबईत त्यांच्या जुन्या घरा शेजारी उंच उंच इमारती आहेत. त्या अंधार्या घरात अजूनच अंधार झालाय. त्यांना बिल्डरांचे धमकीवजा फोन येत असतात. त्यांच्या शेजारच मराठी कुटुंब कधीच डोंबवलीला गेल. पेस्तन काकांच्या जिभेवर अजूनही मालती काकूने केलेल्या अळूवड्याची चव आहे.
बटाट्याची चाळ इकडे होती ते आज सांगून सुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही. तिथे आता मोठ्ठी स्कीम झाली आहे. नावाला एक दोन मराठी कुटुंब आहेत. पण त्यांचे ब्लॉक्स बंद आहेत. कारण ते सर्व जण अमेरिकेत आहेत. माणसांपेक्षा गाड्याच जास्त आहेत. त्या सांभाळता सांभाळता बिचार्या यु पी तून आलेल्या गुराख्याची त्रेधा तीरपिट उडते.
आमच्या आयुष्यात इंटरनेट आलं आणि आमचा, मध्यम वर्गीयांचा कणाच मोडला. पोर पोरी शिकून आय टी मध्ये जावून ऐटीत फिरायला लागली, आई बापापासून दूर गेली. कुटुंब दुरावली. आता आम्ही इंटरनेटवरच आम्ही सगळे भेटतो. आज आजी आजोबा TV वर मराठी मालिका बघण्यात दंग. मुलं इंटरनेट वर दंग. आई क्लब मध्ये दंग. बाबा कामात दंग.
आम्हा मध्यम वर्गीयांचा तुम्ही मध्यबिंदू होतात. तुम्ही परत या आणि आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणा.
-भूषण
वाचने
7355
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
१२ वर्षं झालीत हे खरं वाटत नाही!
योग्य वेळी प्रकाशित.
In reply to १२ वर्षं झालीत हे खरं वाटत नाही! by बहुगुणी
+1
In reply to १२ वर्षं झालीत हे खरं वाटत नाही! by बहुगुणी
हे पहा सब कुछ पियेल
In reply to १२ वर्षं झालीत हे खरं वाटत नाही! by बहुगुणी
आवडले
आमच्या आयुष्यात इंटरनेट आलं
त्या जगन्नाथाच्या रिष्टवाचात एखादाच सेकंद काटा पुढे सरकेलेला
In reply to आमच्या आयुष्यात इंटरनेट आलं by जेनी...
मनापासुन लिहिलय. चांगलच
लेखन छान केलंय पण तुमच्या
एक प्रयत्न पुलंच्या स्टाइल
In reply to लेखन छान केलंय पण तुमच्या by किसन शिंदे
अगदि योग्य भावना व्यक्त
आठवण म्हणुन ठिक पण एक
तुम्ही परत या!
In reply to आठवण म्हणुन ठिक पण एक by ५० फक्त
:-)
In reply to तुम्ही परत या! by कापूसकोन्ड्या
५० रावांशी बव्हंशी सहमत..
In reply to आठवण म्हणुन ठिक पण एक by ५० फक्त
चांगला लेख!
आजही नारायण आहे, आजही चितळे
ते गेले नाहीत .....
भावना पोचल्या...
पण पु.लं आपल्यात नाहि असं का
In reply to भावना पोचल्या... by अर्धवटराव
.
चिंटुला त्याचे बाबा सगळे असली
In reply to . by दिपक
:)
In reply to चिंटुला त्याचे बाबा सगळे असली by ५० फक्त
व्यंगचित्रांचा / चित्रांचा
In reply to चिंटुला त्याचे बाबा सगळे असली by ५० फक्त
दिपक!... बरोब्बर १२ वर्षांनी
In reply to . by दिपक
काय हे!
त्यांनी स्वतःच असल्या कळ
असेच काहीसे म्हणायला आलो
In reply to त्यांनी स्वतःच असल्या कळ by भडकमकर मास्तर
+१
In reply to त्यांनी स्वतःच असल्या कळ by भडकमकर मास्तर
छान लिहिलंय...
+१००. असेच म्हणतो
In reply to छान लिहिलंय... by योगप्रभू
आज जर खरच पु ल असते ना तर ते
मी काय म्हणतो,
निरागस धाग्याला शोभेसा निरागस
In reply to मी काय म्हणतो, by परिकथेतील राजकुमार
मस्तच जमलं आहे... (चे पु वर
तुमच्या भावना समजल्या. मलाही
छान वाटले वाचून
चालु द्या !! कोदाबाळाची आठवण
yeda साहेब, पुल किंवा अत्रे काय ही सगळी देव माणस.
गुजरा हुआ जमाना...
माझा आवडता ब्लॉग
मुचास ग्रासीयास !!!
In reply to माझा आवडता ब्लॉग by शुचि
शरद
जोडाक्षरे....
In reply to शरद by शकु गोवेकर
डुआयडि
In reply to जोडाक्षरे.... by प्रभाकर पेठकर