Skip to main content

विचार

फॉरेस्ट गंप अन इतर

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 06/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बरंच वैचारीक वादळ घोंघावलं होतं...त्यामुळे हे जरा लाईट कैतरी म्हणुन. आताच नवर्‍याने फॉरेस्ट गंप लावला होता. कितीही वेळा पाहीला तरी नविन काहीतरी आवडत जातं. अगदी निरागस अशा फॉरेस्टच्या आयुष्यात बरंच काय काय होतं...तो त्याला कसा सामोरा जातो. अगदी वेगळा विषय, वेगळी मांडणी अन मुख्य म्हणजे टॉम हॅन्क्सचा अभिनय. तसंच कास्ट अवे सुद्धा. अजुन असे कोणते चित्रपट आहेत जे कितीही वेळा पाहीले तरी आवडतात?

ज्यूलीचे चौघडे

लेखक मन यांनी गुरुवार, 05/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी.

कुत्रं...

लेखक गवि यांनी बुधवार, 04/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि नशापाणी न करता कुत्री आणि मांजरं पाळत आलो आहे. मांजरांची पिल्लं बिल्ल्यांसारखी शर्टावर लटकावून मी लहानपणी हिंडायचो. ती नखांनी शर्टला घट्ट पकडून असायची.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही. लटकता लटकता ती पिल्लं हळूहळू वर चढत जायची..मग खांद्यावर चढून कानाशी कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले की मी परत त्यांना पकडून शर्टाला अडकवायचो. मांजरांना मी सुकी कोळंबी आणून घालायचो. कोळंबीचा पुडा घेऊन घरात शिरलं की जिथ्थे कुठे मांजरं बसली असतील ती हर्षवायूने ओरडत पायात यायची.

गोल साडीची आधुनिकता

लेखक रामदास यांनी मंगळवार, 03/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नऊवारी पातळापासून पाचवारी गोल साडी हा प्रवास हेच मुळी फॅशनच्या दुनियेतील धीट विधान आहे यावर आजच्या काळात फारच थोडी माणसं विश्वास ठेवतील. एकेकाळी मुलगी गोल साडी नेसते या कारणासाठी लग्नं मोडली आहेत. गोल साडी म्हणजे पाचवारी साडी. नऊवारी ते पाचवारी हे सामाजिक स्थित्यंतराचे माप झाले. वाराचे -चाळीस इंचाचे माप-जाऊन पन्नास वर्ष झाली. मोजमाप मीटर-सेंटीमीटरमध्ये सुरू झाले. साडी नव्या मापाने साडेपाच मीटरची झाली.

पं पं पं पं दारोदार......

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 02/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पं पं पं पं दारोदार पं पं पं पं दारोदार बाईचा सोन्याचा संसारं बाईचा सोन्याचा संसारं तिचा पोरगा लई हुश्शारं त्याची मारुती मोटारं................. सत्तरची अखेर आणि ऐंशींची सुरुवात या सुमारास हे सहल गाणं बरच प्रसिद्ध झालं होतं. होळी, कोजागिरी, सहल वगैरे निमित्ताने जमलेली पोरं रंगात आल्यावर हे गाणं व्हायचं खर. सगळे बोल आता लक्षात नाहीत. पण संजय गांधी आणि त्याची मारुती मोटार हे समीकरण मारुती नावाची गाडी प्रत्यक्षात रस्त्यावर यायच्या अनेक वर्षे आधीपासूनच लोकांच्या डोक्यात पक्क बसलं होतं.

"नेकी कर और दर्या में डाल"

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 02/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईने माझ्यावर अजून एक चांगला संस्कार केला. "नेकी कर और दर्या में डाल." कं.त काम करत असतांना पण , मी माझ्या हाताखालच्या माणसांना, मनापासून शिकवायचो.त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो.कधी-कधी परीक्षा पण घेत होतो.कामावर असतांना, वाद-विवाद करायचो आणि त्याचा अंत सूसंवादाकडे कसा होइल ह्याकडे लक्ष द्यायचो.हाताखालून हजारो माणसे गेली तशीच पाठीवर शाबासकीची थाप ठोकून पण शेकडो गेली. सध्यी मी नौकरी बदलायच्या विचारात आहे.जे शिकायचे होते , ते शिकून झाले.

डॉ.अशोक रानडे यांचे स्मरण

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी सोमवार, 02/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राला विचारवंताचे वरदान लाभले आहे. संगीत क्ष्रेत्रात ही परंपरा पं.भातखंडेनी सुरु केली. पुढे दि.ब. देवधर , कुमारजी , पु.ल. असे अश्या अनेकांनी संगीता बरोबर संगीताचे विचार पुढे नेले. डॉ. अशोक रानडे त्याच परंपरेचा विचारवंत होता. हया जुलै महिन्यात त्यांच्या निधनाला एक वर्ष होते आहे. त्यानिमित्त त्यांचे स्मरण. आपल्या जवळजवळ पाउणशे वर्षाच्या आयुष्यात डॉ.६० वर्षे संगीता क्षेत्राशी निगडीत होते. स्वतः गजाननबुवा जोश्यांचे शिष्य होतेच पण त्याही पेक्षा ते संगीतावरचे अधिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांचा व्यासंग “संगीताचा” होता आणि तो भारतीय शास्त्रीय संगीता इतकाच लोकसंगीताचा ही होता.

गेले करायचे राहूनी...

लेखक श्रीरंग_जोशी यांनी शनिवार, 30/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आपल्याला आयुष्यात अनेक बरे वाईट अनुभव येतात, अनेक आव्हाने येतात. आपल्याला जमेल तसा त्यांचा सामना आपण करतो. कधी यश येते तर कधी अपयश. कधी नशीब साथ देते तर कधी दुर्दैव आड येते. कधी आपण आव्हानाचा धीरोदात्तपणे सामना करतो तर कधी माघारही घेतो. पण एक मात्र नक्कीच आपण नेहमी पुढे चालत असतो. अन बऱ्याच यशस्वी माणसांबद्दल बोलले जाते की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. खरंच असे काही शक्य आहे? भरपूर यश मिळालं म्हणून कुणी मागे वळून पाहतच नाही. जे आपले स्वतःचे गत आयुष्य असते त्याकडे खरंच कुणी दुर्लक्ष करू शकते?

याहू मेलची बनवेगिरी

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 27/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी अनेक जण याहू मेल वापरत असतील. याहूचा सध्या एक प्रॉब्लेम झालेला पहायला मिळतो. याहू मेल आय डी वरून अ‍ॅड्रेसबूकमधील सर्वांना जंकमेल किंवा धोकादायक वेबसाइटची लिंक पाठवली जाते. त्या मेलचे शीर्षक 'वर्क फ्रॉम होम', 'करीअर', 'फ्री एज्युकेशन' 'अर्न फ्रोम होम' असे काहीही असते. मेलमधे एक लिंक दिलेली असते. क्लिक केल्यावर कळते की प्रत्यक्षात खरी हायपर लिन्क दुसरीच आहे. सुरुवातीला असे वाटत असे की कुणीतरी मेल हॅक करतो आहे की काय पण आता असा अंदाज आहे की हा उद्योग स्वतः याहूच पैशे घेऊन करीत असावा. तरीही आलेल्या कोणत्याही मेलमधील लिन्कला क्लिक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी.