..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चक्र तेथुन उडुन 'उध्दवा'च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले !
.
.
.
अगदी काल परावाची गोष्ट .
ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती नगरीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ...
" हे बघा वत्सांनो , मला तुमची आगतिकता समजते ...पण तुम्हाला अजुन तुमचे नशीब शोधायला बाहेर पडला नाहीत .ते स्वतः येवुन तुम्हाला कसे भेटेल ? असो . मी तुम्हा प्रत्येकाला एक एक मोरपीस देतोय ते घेवुन तुम्ही हिमालयाचा मार्ग आक्रामायला लागा .जिथे हे मोरपीस पडेल तिथे तुम्हाला तुमचे नशीब सापडेल ..."शुभं भवतु" !!"
आणि ते हिमालयाचा मार्ग चालायला लागले .गिरीकंदर वनविभुषित मार्ग क्रमुन आता ते हिमालयाच्या पायथ्याशी आले .गंगेच्या अस्पर्शित शुध्द खळाळ्णार्या पाण्यासारखाच शुभ्र हिमालय साद देत होता .त्याच्या शिखरावर पडलेली ती सोनेरी किरणे जणु काही ह्या पर्वतराजाच्या सुवर्ण मुकुटा प्रमाणे शोभुन दिसत दिसत होती .अलकनंदेच्या किनारी जेव्हा ते पाणी प्यायला थांबले तेव्हा एकाचे मोरपीस तिथे पडले ...त्याला चांदीची खाण सापडली ......
"मित्रांनो हे इतके पुरे आहे आपण इथेच थांबु "
"मित्रा..तुझे अभिनंदन पण हे झाले तुझे नशीब आम्हाला आमचे नशीब शोधले पाहिजे "
पुढे दुसरे मोरपीस पडले .तिथे सोन्याची खाण सापडली ." मित्रांनो हा तर चमत्कारच ...जय गुरुदेव ...आता आपण थांबुया हावरटपणा नको "
उरलेले दोघे त्याच्याकडे बघुन हसले अन त्यांचे नशीब शोधायला पुढे निघाले तितक्यात तिसरे मोरपीस पण पडले अन तिथे त्याला हिर्याची खाण सापडली !
" अहाहा ...गुरुदेव आपल्या कृपेने आम्ही धन्य झालो .आता थांबुया .हिर्यापेक्षा जास्त मौल्यवान काय असणार .अतीहाव करणे चांगले नाही उध्दवा ".
.
पण उध्दव थांबला नाही.जणु काही त्याचे नशीब त्याला बोलावत होते.खेचत होते .तो पुढे चालत राहिला .त्याने मंदाकिनी ओलांडली .रामगंगा ओलांडुनही पुढे गेला .स्वर्गारोहिणीचा प्रवास करताना त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले .
' हाच तो मार्ग जिथुन पांडव ...खरेतर फक्त युधिष्ठीर सदेह स्वर्गात गेला'...
खरेच त्याचे नशीब त्याला बोलावत होते .इतक्यात अचानक एक अनपेक्षित दृष्य त्याच्या निदर्शनास आले .त्याला चांगलाच धक्का बसला .
एक म्हातारा .एकटाच उभा .पाठीत वाकलेला .त्याचे पाय जणु काही अनंत काळापासुन जमीनीत रुतुन बसलेले.त्याच्या डोक्यावर एक रथाचे जाडजुड काटेरी फिरते चाक .डोक्यातुन रक्ताचे वाहते ओघळ .अंगातील अंगरखा धुळीने वाललेल्या रक्ताने माखलेला .अन एक असह्य दुर्गंधीने तो प्रदेश भरुन गेलेला .स्वर्गारोहिणी ओलांडल्यावर हे असे नरकसमान दृष्य डोळ्यास पडल्याने उध्दवाचे कुतुहल जागे झाले .ती दुर्गंधी टाळत .नाक मुठीत धरत तो म्हातारबाबा जवळ गेला अन विचारले ..." हे काय म्हातारबाबा ?"
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चाक तेथुन उडुन "उध्दवा"च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले !!
आता म्हातारबाबाचे जमीनीत रुतलेले पाय बाहेर आले अन उध्दवाचे पाय जमीनीत रुतले गेले ...त्याला हलताच येईना तो पार बावरुन गेला ....." हे काय आहे म्हातार बाबा " त्याने रडवेल्या आवाजात टाहो फोडला ,
.
आता म्हातारबाबाच्या चेहर्यावर हलकेसे हास्य होते ...इतक्यावर्षांनी ह्या अभिशापातुन मुक्त झाल्याचा आनंद होता ...
"शेवटी तु भेटलासच तर मित्रा... मला विश्वास होता मी या जगात एकटा नसणार ...मी ही असाच माझे नशीब शोधत शोधत इथे आलो अन मलाही अगदी आज जसा तुला हा अभिशाप मिळालाय हावरटपणा बद्दल ...तसाच हा अभिशाप मिळाला ...असो किती वर्ष ही वेदना सहन केली माझे मलाच आठवत नाही ...आता हा भोग तुझ्या माथी....बाकी आता फक्त अशाच एखाद्या वेड्याची वाट पहाणे तुझ्या नशीबात...इथे मरणही येत नाही मित्रा !!
... आता थांबणार आहेसच तर थोड्या गप्पा मारु...कित्येक दिवस बोललोच नाहीये ...शिवाय इतक्या वर्षात जे काही ज्ञान मला प्राप्त झाले ...थोडेफार तुला सांगावे म्हणतो ...मी ही असाच गुरुंनी दिलेले ते मोरपीस घेवुन निघालो ....."
म्हातारबाबा त्याची कहाणी कथन करायला लागला
.
किती तरी वेळ तो एकटाच बडबडत होता ... इकडे उध्दवाच्या डोक्यात अन डोक्यावरचेही चक्र शांत पणे फिरु लागले ... ही अपरिहार्य आगतिकता त्याचे मन हळु हळु स्विकारायला लागले ... अन मग त्याच्या मनाने प्रश्नांच्या गुढ डोहात डुबकी मारली ...
" मित्रा , मी एकटाच बोलणार की तु तुला आत्तापासुनच मौनाची सवय लागली ?? " म्हातारबाबाच्या ह्या प्रश्नाने त्याची तंद्री भंग पावली अन त्यांचा संवाद सुरु झाला ......
.
" हे माझ्याशीच...आपल्याशीच का व्हावं म्हातारबाबा ? आपलच नशीब फुटकं का ? तीन मित्रांना चांदी सोन्याच्या हिर्याच्या खाणी लाभल्या ...याही पेक्षा मौल्यवान असे काही तरी सापडेल ह्या आशेने मी आणि आपणही धावत राहिलो अन हातात काय पड्लं ...तर हा शाप ! खरच आपलच नशीब इतकं फुटकं का ??" केविलवाण्या सुरातला उध्दवाचा प्रश्न हिमालयाच्या दरीखोर्यातुन प्रतिध्वनीत होवुन नादत राहिला ....
" गडबड करतो आहेस मित्रा .. जरासा विचार कर सोने चांदी हिर्यांपेक्षा पेक्षा किती तरी पट मौल्यवान दोन गोष्टी तुला लाभल्या आहेत ....ज्ञानप्राप्तीची संधी आणि एकांत ! ज्ञानापेक्षा काही मौल्यवान मलातरी माहीत नाही ...चांदी सोने हिरे काय शेवटी शुध्द दगड मातीच आहे ना ? काल कोणाची तरी होती आज कोणाची तरी उद्या कोणाची तरी ...वारांगनेप्रमाणे ....पण ज्ञानाचे तसे नाही ते अनंत आहे आणि आज कुणाचे उद्या कोणाचे असे त्याचे नाही एकदा प्राप्त झाले की तद्रुपच होवुन जाशील मी बोलतोय ते आत्ता तुला कळणार नाही पण हळु हळु तुझ्या मनावरचा अज्ञानाचा पडदा हटत जाईल अन तुला ज्योतिस्वरुप ज्ञानाची प्राप्ति होईल ...आणि यासाठी आवशकता आहे फक्त एकांताची तो ही आता तुला मिळेल मित्रा...विचार कर किती लोकांना स्वतः बद्दल विचारकरायला असा एकांत मिळतो ..सगळेच घाण्याच्या बैला सारखे संसाराला सदैव जुंपलेले ....तुज्या त्या मित्रांचे काय रे ...त्या धनाचा उपभोग घेतील अन मरुन जातील त्यांना ज्ञान म्हणजे काय कळणार नाही ...मिळणार तर मुळीच नाही ....तु ज्या मौल्यवान गोष्टीची आशा धरुन इथवर आलास ती नकळत तुझ्या हातात पडली आहे ... स्वप्नी जे जे देखिले ते ते अवघेचि मिळाले ! "
" स्वप्न ...हः स्वप्न पाहणं पाप आहे का रे ? मी स्वप्न पाहिले त्याची ही फळं अन जे अल्प स्वल्प गोष्टीत समाधान मानुन राहिले त्यांना ते ऐहिक सुख ! "
" ह्म्म ..अगदी व्यवस्थित विचार करायला लागलास ...ज्ञानसाधनेच्या साठी मिळालेला एकांत त्या ऐहिक सुखापेक्षा किती सुखद आहे तुला हळु हळु उमजेल ....आणि स्वप्न पाहाणं नक्कीच पाप नाही मित्रा उलट तीच तर गोष्ट आपल्याला पुढे ढकलत राहाते "
" मग महत्वाकांक्षी माणसांच्या नशीबी हे भोग का ?"
" समाज ...समाज मित्रा ... समाज नेहमीच समपातळी राखायचा प्रयत्न करणार ....कोणी पुढे जाणार असेल तर त्याला मागे ओढायचे अस मागे पडणार असेल तर त्याला पुढे ओढायचे हा तर नियम आहे समाजाचा ...एकतर असामान्य माणसाला सामान्यांच्या बंधनात अडकवुन हैराण करायचे .....नाहीतर त्याला देव करुन टाकायचे म्हणजे "त्यांना" चालतं ..आपल्याला नाही म्हणायाला" मोकळे ... आजही तुझ्या पाठीमागे तुला तुझे मित्र एकतर मुर्ख म्हणत असतील नाहीतर देव म्हणत असतील ... "
" मग समाजात एकटं पडणं हे असं असामान्य असंण हे पाप आहे का ?"
" नक्कीच नाही ... फक्त मुर्ख ठरवले जाण्याची तयारी हवी अन चुकुन माकुन देव ठरवला गेलासच तर ते देवपण ..तेही सामान्य भक्तांच्या नियमात बांधलेलं सहन करावं लागेल .. तु असामान्य आहेस ही नक्कीच ज्याला आपण देव ठरवुन देवपणाची ...कर्मकांडाची पुटं वर्षानुवर्ष चढवत आलोय त्या "पुरुषाची" इच्छा आहे ..आपण नक्कीच त्याचे लाडके असणार ."
"मग आपल्या सारख्यांनाच हा शाप का ? ह्या शापाचा नक्की उद्देश काय?? ..."
"शोध स्वतःचा ...बस्स बाकी काही नाही .... आणि हा शाप नाही मित्रा ...आशिर्वाद आहे आशीर्वाद ...हळु हळु पटेल तुला ....फार नशीबवानांना ही संधी मिळते बाकीच्यांची आयुष्य पशुवत खाणे पिणे भोग भोगणे यात कशी संपतात त्यांचे त्यांनाही कळत नाही ..."
"जर भोगच घ्यायचा नसेल तर मग ह्या आयुष्याचा अर्थ काय... ध्येय काय " उध्द्वाच्या उद्वेगाचा हा प्रश्न ऐकुन म्हातारबाबाच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर परत आनंद प्रकट झाला
"शाब्बास मित्रा ..तुला हा प्रश्न पडला... तुझी प्रगती होत आहे ... आता ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्यानेच शोधायचे .... तुला नक्की सापडेल ...तुझ्याकडे आता आख्ख्या जगाचा वेळ आहे !"
" तुला काय उत्तर सापडले म्हातारबाबा ? "
.
.
.
" हः ...आयुष्य ... आयुष्य निरर्थक आहे...काहीच ध्येय नाही... गंतव्य नाही मित्रा...बस्स जगत रहाणे ...बस्स ... काहीच अर्थ नाही ... मी बोलतो ...तु ऐकतो निरर्थक ... ऐहिक सुख उपभोगणे ...हा असा शाप भोगणे ...निरर्थक ... ज्ञान प्राप्ती होणे ...न होणे दोन्ही निरर्थक ...ज्ञान आणि अज्ञान काय रे शेवटी... वृत्तीच ना ... दोन्ही समानच .. मुळातच आपल्या अस्तित्वाला कारणच नाही हे समजुन जगणे अन ते तसे न समजता गुराढोरांसारखे आहे त्यात सुख मानुन अज्ञानात जगणे ....दोन्हीही निरर्थक ....असो...एखादी गोष्ट समजुन करणे हे न समजता करण्या पेक्षा श्रेष्ठ असते हे बोलणे ही निरर्थक.....
.
.
.
म्हातारबाबा बोलता बोलता थांबला ...अन एक अर्थहीन शांतता भरुन राहिली .....
----------------------------------------------------------------------------------------------------
"असो . आता तुला सत्याचे ज्ञान व्हायला सुरवात झाली आहे ......
तुझ्या सारखाच दुसरा कोणीतरी महत्वाकांक्षी... स्वप्नाळु... वेडा कधीना कधीतरी येथे येईल ...तेव्हा हे चाक त्याच्या डोक्यावर जाऊन बसेल ..तेव्हा तु या शापातुन मुक्त होशील अन घरी जावु शकशील ....पण तो पर्यंत तुला हा अभिशाप सहन करावाच लागेल ..." असे बोलुन म्हातारबाबाने उध्दवाकडे पाठ फिरवली अन तो मार्गस्थ झाला ....
इतक्या सगळ्या संवादानंतर निराश झालेल्या उध्दवाच्या चेहर्यावर एक कुत्सित हास्याची लहर उमटुन गेली ...
" म्हातार बाबा ...मला इतके ज्ञान दिलेस ...पण बहुतेक इतके वर्षे हे चाक डोक्यावर फिरुन बहुतेक तुझाही मेंदु थोडा झिजलेला दिसतोय...तुला अवंती नगरी कडे जाण्याचा रस्ताही लक्षात राहिलेला दिसत नाहीये ..."
म्हातारबाबा अचानक स्तब्ध झाला ...त्याने मागे वळुन उध्दवाकडे पाहिले ... आता उध्दवाच्या डोक्यावर ते चाक निवांतपणे फिरत होते ...तो त्या ओझ्याने पार वाकुन गेला होता ...रक्ताचे पाच दहा ओघळ त्याच्या चेहर्यावर आले होते ...डोळ्यामधे ती निराशा लपवण्याचा प्रयत्न करणारे ते चेहर्यावरील कुत्सित हास्य त्याच्या रुपाला जास्तच भयाण करत होते ....जणु काही तोच अनंतकाळापासुन तो अभिशाप भोगत होता ...अगदी थोड्याच वेळा पुर्वी इथे आलेला उध्दव तो हाच ..हे कोणाला सांगुनही पटले नसते ...
म्हातारबाबाने वळुन उद्धवाकडे पाहिले अन त्याच्या चेहर्यावर हलकेसे स्मितहास्य उमटले ...डोळ्यात एक वेगळीच चमक आली ...नकळत त्याचा हात त्याच्या फाटलेल्या...रक्ताने ..धुळीने..पसाने..माखलेल्या त्याच्या अंगरख्याच्या खिशात गेला ...त्याने खिशातुन काहीतरी बाहेर काढले अन तो हिमालयशिखराकडे चालायला लागला .
.
.
उध्दवाला म्हातार बाबाच्या त्या वागण्याचा ... त्या स्मितहास्याचा अर्थ लक्षात आला नाही ....
.
फक्त
.
.
त्याची नजर म्हातारबाबाने हातात घट्ट पकडलेल्या "त्या मोरपीसा"वर खिळुन राहीली !
----------------------------------------------------------------------------------------------------------------
(* जालावर इतरत्र पुर्वप्रकाशित)
(** लहानपणी अभ्यासक्रमात असलेल्या " अतिलोभाभिभूतस्य चक्रं भ्रमति मस्तके | " ह्या कथेवर आधारित )
वाचन संख्या
5187
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयुष्य ... आयुष्य निरर्थक आहे
+१
In reply to आयुष्य ... आयुष्य निरर्थक आहे by शुचि
चांगल लिहिताय गिरिजा तुम्ही.
छान लिहीले आहे, आवडले.
छान आहे काकु
छान लिहिलंय
गिरीजा, सुरेख लेखनशैली आणि अप्रतीम कथा
कर्मासाठी कर्म
In reply to गिरीजा, सुरेख लेखनशैली आणि अप्रतीम कथा by संजय क्षीरसागर
गिरीजा,
In reply to कर्मासाठी कर्म by प्रसाद गोडबोले
असो.
In reply to गिरीजा, by संजय क्षीरसागर
छान
प्रतिसाद प्रकशित करण्यापूर्वी वाचत जा हो
In reply to छान by सुदेश
मोरपीस पडेल तिथे तुमचे नशीब
+१ सुंदर अभिप्राय.
In reply to मोरपीस पडेल तिथे तुमचे नशीब by नाना चेंगट
कथा
हीहीही.
In reply to कथा by तिमा
बोधकथा वाचली .
ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर असे निर्विकार होऊन जगणे असेल तर
In reply to बोधकथा वाचली . by मनीषा
धन्यवाद
In reply to बोधकथा वाचली . by मनीषा
अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे
In reply to धन्यवाद by प्रसाद गोडबोले
मस्तच....
वैदिक धर्म म्हणजे नक्की काय?
काही हरकत नाही
In reply to वैदिक धर्म म्हणजे नक्की काय? by प्रसाद गोडबोले
संजय,
In reply to काही हरकत नाही by संजय क्षीरसागर
मोरपीस इच्छेचं प्रतिक आहे आणि वृद्ध पुन्हा हिमालयाकडे निघालाय
In reply to संजय, by स्वानन्द
मोरपीस इच्छेचं प्रतिक आहे
In reply to मोरपीस इच्छेचं प्रतिक आहे आणि वृद्ध पुन्हा हिमालयाकडे निघालाय by संजय क्षीरसागर
कथा आवडली
लेखन आवडले
.
ज्ञान व अज्ञान या केवळ
In reply to . by अग्निकोल्हा
कोइ शक ?
In reply to ज्ञान व अज्ञान या केवळ by कवितानागेश