Skip to main content

विचार

अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 12/02/2017 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
(संदर्भ ग्रथ- अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे, छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर, महात्मा गांधी- धनंजय कीर, अब्राहम लिंकन- फाळणी टाळणारा महापुरुष- वि. ग. कानिटकर, अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन ) कोणतीही लोकशाही शासनव्यवस्था ज्या लोकांचे ती प्रतिनिधित्व करते. त्यांच्या विकासासाठी, त्यांना विकासासाठी समान संधी आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तत्वत: तरी बांधील असते . पण त्याच बरोबर ज्या देशात ती आहे त्या देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व ह्याला हि तितकीच किंवा कांकणभर अधिकच बांधील असते.

द मेन्स्ट्रुअल मॅन

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 10/02/2017 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय. आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे. माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या.

एक अच्छा आदमी

लेखक रवि वाळेकर यांनी बुधवार, 08/02/2017 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतल्या 'टँक्सीवाले-रिक्षावाले' या आदरनीय जमातीचे आणि माझे छान जमते! खरं तर, त्यांच्या रितीरिवाजाला हे धरून नाही, पण माझे झकास जमते हे खऱं! मला माझ्या इप्सित स्थळी सोडण्यास क्वचितच एखाद्या महात्म्याने नकार दिला असावा! एकतरं माझ्या आणि त्यांच्या पर्सनँलिटीत त्यांना काही साम्य सापडत असावे, किंवा मी यांना हात करतो, तेव्हा माझा चेहरा भलताच दिनवाणा, केविलवाणा दिसत असावा! मागच्याच आठवड्यात माझा एक मित्र भल्या संध्याकाळी पार्ल्यात ऊभा राहुन गोरेगावला जाण्यासाठी तासभर प्रत्येक रिक्षावाल्याच्या मिनतवा-या करत होता!

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

लेखक वडापाव यांनी सोमवार, 06/02/2017 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.

काय करावे!!! तिच्याशी नाते जोडावे की नको???

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 05/02/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी या आधीच माझं वय व माझी पार्श्वभुमी आंतरजालावर सांगुन झालेली आहे.मी अविवाहीत आहे.सध्या एका to be or not to be प्रकरणात अडकलो आहे. जास्त फाटे न फोडता विषयाला हात घालतो.माझ्या घराजवळ एक विवाहीत तरुणी राहते.तिचे व माझे कुटुंब एकमेकांना ओळखते.ति साधारणतः माझ्या पुढे तीन चार वर्ष मोठी असेल .आधी कधी तिने माझ्याशी संपर्क ठेवला न्हवता.माझ्याकडे बघतही नसायची.पण अचानक गेल्या काही महीण्यात तिचा नूर बदलला व ति माझ्याकडे हेतुतः बघायला लागली.तशी ती दिसायला खूप सुंदर आहे.

ब्रम्मा

लेखक पराग देशमुख यांनी शनिवार, 28/01/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत.

एक वादळी जीवन: ओशो!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 25/01/2017 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक वादळी जीवन: ओशो! सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल. विसाव्या शतकात भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवरील क्रांतीकारी व्यक्तींमध्ये ओशोंचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. १९३१ ते १९९० ह्या ५९ वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे वादळ निर्माण केलं ते अजूनही सुरू आहे. १९ जानेवारी १९९० रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.

अभी ची तनु

लेखक अभी ची तनु यांनी मंगळवार, 17/01/2017 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ( अभी गावाकडे ) आज सकाळ पासुनच जाधवांच्या घरी धावपळ सुरु होती . कारण जाधवांचा एकुलता एक मुलगा अभिमन्यु उर्फ (अभी) आज घरी येत होता.

महाराष्ट्राचे दुर्गवैभव आणि आपण

लेखक कर्रोफर नमुरा यांनी शुक्रवार, 13/01/2017 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून एक समृद्ध, प्रगतीशील आणि पराक्रमी देश आहे, हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. प्राचीन काळी हा प्रांत ऋषीमुनींचे आणि महारथींचे दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हे येथील राष्ट्रीकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी कला, स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य हे देखील या भूमीला वरदान ठरले आहेत. अजिंठावेरुळचे स्थापत्य तर जगाला भुरळ घालत आहेत. लोणारचे खारयुक्त सरोवर हे खगोलतज्ञ आणि वैज्ञानिक यांचे आवडते ठिकाण. अनेक वैदिक, पौराणिक, मध्ययुगीन आणि अर्वाचीन दाखले याला प्रमाण आहेत.

फुल्ल प्रुफ पिलानः एक हसीन सपना

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 11/01/2017 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
म्येंरें प्यारँ द्येषवाषियों, जनता की खास मांगपर, सतत की डीमांडपर, एटीएमकी रांगपर फुल्लपुरुफ प्ल्यान लाया हूं. बोलो जाहीर करुं के नं करुं.... बोलो करुं के नं करुं.... करुं के नं करुं.... लो कर दिया..... -------------------------------------- नोटाबंदीच करायची असती तर कशी करता आली असती तर ही एक आयडीया. मनोरंजन आहे, फिक्शन म्हणून वाचा. पण आता पर्यंतचे नोटाबंदीबद्दलचे सर्व वाचलेले विसरून वाचावे लागेल. लर्न टू अनलर्न! (पण हे अनलर्न लर्नलेले कसे अनलर्नलायचे??)

मुख्य व एकमेव उद्देशः नोटाबंदीने फक्त काळा पैसा 'नष्ट' करायचा आहे.

थेट नष्ट करायचा.