Skip to main content

समीक्षा

चाहूल.... नाटक...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 06/06/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
चाहूल चंद्रलेखा प्रकाशित चिरंतन निर्मित दोन अंकी नाटक... चाहूल.. लेखक : प्रशांत दळवी दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी कलाकार : तुषार दळवी सोनाली कुलकर्णी कथासूत्र : मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय... मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते....

साठेचं काय करायचं?? ... नाटक...

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 05/06/2008 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
साठेचं काय करायचं... लेखक : राजीव नाईक... दिग्दर्शक संदेश कुलकर्णी कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष निर्मिती :समन्वय पुणे... ( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.) हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले.. क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले... मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते..

मजेशीर शब्द

लेखक आर्य यांनी शुक्रवार, 30/05/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे. शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु. मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.

बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 29/05/2008 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.) जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, प

’वि.वा.’ कुसुमाग्रज - एक अवलोकन

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 19/05/2008 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे. महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील.

लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 13/05/2008 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो. तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते....

व्योमक्षेमं वहाम्यहम्

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 08/05/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!

प्रेमाची गोष्ट

लेखक हेरंब यांनी शनिवार, 03/05/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. तर वाचाच त्याबद्दल...... प्रेमाची गोष्ट म्हणजे कॉय ? के.बी. साठे, बी.सी. साठे आणि तात्या पाटील हे तिघे कॉलेजातले जिवलग मित्र. नाटकांत अभिप्रेत असलेल्या काळात, कोणालाच आपल्या जातीची लाज वाटत नसावी, किंवा ते तिघे खिलाडु वृत्तीचे असावेत.

पक्षी निरीक्षण - एक सुन्न अनुभव

लेखक नारदाचार्य यांनी शुक्रवार, 02/05/2008 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांच्या प्रांतामध्ये सांप्रती अनेक नवनव्या आविष्कारांचा वर्षाव होतो आहे. समाजातील जगण्याच्या रीतीमध्ये झालेल्या बदलांचे प्रतिबिंब घेऊन येणाऱ्या या कविता वाचकाला वेगवेगळया पातळ्यांवरचा अनुभव देतच असतात. 'पक्षी निरीक्षण' ही कविता याच मालिकेत जाऊन बसणारी आहे हे निर्विवाद आहे. चेतन या 'नव'कवीची ही कविता कवीने विडंबन म्हणून वाचकांच्या समोर ठेवली असली तरी, तिच्यात मूळ प्रतिभेचे अंकूर पुरेसे दिसतात हे स्पष्ट आहे. मुख्य म्हणजे अनुभवाचा सच्चेपणा आणि ते नेमक्या, मोजक्या शब्दांमध्ये मांडण्याची कवीची हातोटी या गोष्टी याच कवितेच्या नव्हे तर या कवीच्या भावी रचनांचेही बलस्थान ठराव्यात.

बासूदांचे 'अनुभव'

लेखक भोचक यांनी सोमवार, 28/04/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.