5 रायफल्स.. एक १००% हिंदी सिनेमा...
कधी-कधी डोके अगदीच कामातून जाते.कुठलेही काम करावेसे वाटत नाही.अशावेळी मन परत शांत करायला , मी सडाफटिंग असतांना (म्हणजे भारतात रहात नसतांना) काही गोष्टी करतो.तसाही मी १००% डोंबिवलीकर असल्याने चित्रपट,नाटक. वाचन इ, बैठा विरंगुळा मला जास्त आवडतो.चेस खेळणे,ब्रिजचे २-४ डाव खेळणे,मोझार्ट्चे संगीत ऐकत पेपर वाचणे किंवा एखादा मस्त सिनेमा बघणे. माझ्याकडे असलेल्या १०००-१२०० सिनेमांत हा वरील सिनेमा फार वरचे स्थान पटकावून आहे.हा सिनेमा बघितल्यानंतर माझे मन तरी टवटवीत होते.फक्त ते डोके नावाचे प्रकरण बाजूला ठेवा.१००% टाइमपास..ह्या सिनेमांत काय नाही ते सांगा..
प्राणी आहेत.
हरवले सापडले आहे.
राजा-राणी आहेत.
देश-प्रेम आहे.
तलवारी आहेत आणि बंदुका-तोफा पण आहेत.
आणि
पटकन विसराल अशी कथा पण आहे.
ह्या सिनेमाची सुरुवात होते तीच मूळी एका वाक्याने ." की ही एक काल्पनिक कथा आहे." आता काल्पनिक कथा म्हणजे नक्की काय.तर साधी १०-१२ वाक्यातील कथा आहे.
ब्रिटीशकालीन भारतात एक राज्य असते.त्यात एक राजा राज्य करत असतो.त्याच्याकडे एक अमूल्य खजिना असतो.जो पर्यंत तो खजिना त्याच्याकडे असतो तोपर्यंत ब्रिटीश भारतावर राज्य करू शकत नाहीत.तर तो खजिना काय? तर ३ मूर्ती...एक कृष्णाची, एक येशूची आणि एक मुस्लीम प्रतिक... तर ह्या तीन मूर्ती पळवायचे प्रयत्न ब्रिटीश करतात आणि ते प्रयत्न हाणून पाडायचे प्रयत्न इथले देशभक्त लोक करातात.
पण ही कथा आय.एस.जोहर अशी काय गुंतवून ठेवतो की पार त्याचा गुंता होतो.पहिल्या १५-२० मिनिटातच कोण नक्की कुणाचा/कुणाची असले प्रश्न सोडवत न बसता, "तुका म्हणे उगी रहावे,जे जे होईल ते ते पहावे" .. ह्या प्रमाणे "हिंदी सिनेमा, दिग्दर्शक दाखवेल आणि ऐकवेल, ते ते भोगावे" असे समजून बघावे. अगदी उडते स्केटिंग पासून,ते थेट,दोन तुकडे होणारी आणि हेलिकॉप्टरचे पंख वापरून हवेत उडणारी कार आहे.(बाकी तो स्केटिंगचा सीन मस्त हलका-फुलका आहे. एक तर ते आधी स्केटिंग करत आहेत की उडत आहेत तेच समजत नाही आणि त्यावेळी ब्रिटीश मागे लागत असताना पण, हे मस्त गाणे वगैरे म्हणतात.फुल टाइम-पास.)
पात्र परिचय.
१. राजा (हा असहाय्य असला तरी बाणेदार,उदार वगैरे असतो.आधी तो बघू शकत असतो आणि मग तो आंधळा होतो.)
२. राणी (ही हिंदी सिनेमाच्या प्रथे प्रमाणे मुलांना जन्म देणे,एक हरवू देणे,एक पळवू देणे, एकाला असेच कुठेतरी सोडणे असे करून , मग आपली स्मरणशक्ती हरवून, दिग्दर्शक सांगेल तसा अभिनय करणे आणि संवाद म्हणणे इ. कामे करत राहते.)
३. अल्फान मौला नावाचा एक चोर (आय.एस.जोहर) आता हा चोर असला तरी देश-प्रेमी असतो.कुठलीही बेडी अथवा कुलूप, तो तोडू शकत असतो.ह्याची पहिली एन्ट्री पण फारच मजेशीर आहे.ज्या शिताफीने पालांडे पळाला त्याच शिताफीने हा पळून जातो.
४. राज्याच्या मुलांपैकी एक मुलगा.त्याचे नाव अस्लम.(अनिल जोहर).ह्याला ब्रिटीश लहानपणीच पळवून नेतात.हा पुढे वडिलांबरोबर तलवारबाजी वगैरे करून हिंदी सिनेमाची प्रथा पार पाडतो.
५ अ. दोन जुळ्या मुलींपैकी एक राजकुमारी (अंबिका जोहर) ही सरळ न बोलता शेरो-शायरीत बोलते.जसे "मुद्दइ लाख बुरा चाहे...वगैरे वगैरे
५ ब. ही दुसरी चोर असते.(हिंदी सिनेमाची प्रथा.एक श्रीमंत तर दुसरी गरीब. एक सालस तर दुसरी चतुर.)हिचे नाव काही लक्षात रहात नाही. हिचे आपले एकाच पालुपद असते आणि ते म्हणजे "चटणीके" त्यामुळे आपण हिला "चटणीके" ह्याच नावाने संबोधुया.
६. डाकू राका (शाही कपूर.. हा शशी कपूरचा डूप्लीकेट) ह्याचा उद्योग एकच आणि तो म्हणजे ह्या "चटणीके"च्या मागे लागणे.
७. एक छोटा राजकुमार ----- हा बाल कलाकार असल्याने हिंदी सिनेमातील सगळी लहान मुले जी काम करतात ती सगळी करतो.
आता सिनेमाला खांदा द्यायला म्हणून ४ प्राणी आहेत.
एक कुत्रा..कुत्रा आपला इमानदारी हा गुण मस्त दाखवतो.म्हणजे वेळ-प्रसंगी गवताची गंजी तयार करणे, तिला आग लावणे, राजकुमारीची व्हील-चेयर खेचून नेणे,वगैरे.
आणि ३ माकडे (ह्यांची नावे प्रत्यक्ष सिनेमांत ऐका. मी तर पहिल्यांदा ती नावे ऐकूनच प्रचंड हसलो होतो). ही माकडे काय-काय करत नाहीत? गाडी चालवतात,सायकल चालवतात,चोरी करतात आणि इतकेच नाही तर गाणे पण म्हणतात.राजाच्या एका मुलीचा सांभाळ, करू का नको असा प्रश्न, आय्.एस्.जोहरला पडतो.म्हणून तो देवाकडे कौल मागतो. तर देव कौल म्हणून, आकाशातून कोबी टाकतो.हे असले भन्नाट सीन आहेत ह्या सिनेमात.
आता एकूणच हा एव्हढा पात्र-परिचय आणि त्यांची कामे वाचल्या नंतर मला नाही वाटत, की तुम्हाला काही कथानकात रस वगैरे असेल.. (आणि खरे सांगायचे तर मलाच अजून कथा समजलेली नाही आहे..एका पेक्षा एक भारी सीन्स असतांना, मी तरी कथा लक्षात ठेवली नाही )पण तुम्हाला नावात मात्र नकीच रस असेल.. की ह्या असल्या धेड-गुजरी कथेला नाव हे असे कसे काय? तर ह्या कथेत अजून एक पात्र आहे.
त्याचे नाव काय तर राकेश खन्ना( हा राजेश खन्नाचा डूप्लीकेट).हा एकाच वेळी 5 रायफल्स चालवतो आणि म्हणूनच ह्या सिनेमाचे नाव
5 रायफल्स...
याद्या
3504
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
५ रायफल्स
परा ने हा सिनेमा आज
अरे ते " जबसे सरकार ने
हो...
In reply to अरे ते " जबसे सरकार ने by सुहास..
सिझन तुकारामांचा आहे. सो सावकस वाचुया
आयला कुठाल्या मुहुर्तावर
अजिज नाझा
काही दिवस
जोहर
५ रायफल