लेखकसमीरसूरयांनी गुरुवार, 06/03/2014 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आजची मराठीतील आघाडीची जोडी! 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका, 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तसे छान हलके-फुलके आणि नर्मविनोदी वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' तर छान निवांत चित्रपट वाटला होता. थोडा संथ होता पण पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावरचे क्रिकेट खेळतांनाचे प्रसंग, सिंहगडावरील प्रसंग, रेल्वे स्टेशनवरील प्रसंग आणि चित्रपटाचा एकूणच निवांतपणा असे सगळे खूप छान वाटले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी खूप छान अभिनय केला होता.
लेखकमाहितगारयांनी शनिवार, 01/03/2014 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
बौद्धिक कृष्णविवर:
लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते.
बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४]
युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात.
लेखकमाहितगारयांनी शुक्रवार, 28/02/2014 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर.
लेखकमाहितगारयांनी मंगळवार, 18/02/2014 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९ फेब्रुवारी हि आपणा सर्वांना प्रीय लोकोत्तर श्री छत्रपती शिवरायांची जयंती आहे. या निमीत्ताने मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून आणि मिपा. धाग्याच्या साहाय्यातून साकार झालेल्या अनुवाद प्रयास (अनुवाद (पर्याय १ला)) आपणा समोर सादर करत आहे.
*मूळ इंग्रजी लेख : IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ??
लेखकमंदार दिलीप जोशीयांनी शनिवार, 15/02/2014 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद
आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे
प्रकाशित करत आहे.
लेखकसुधीर मुतालीकयांनी बुधवार, 12/02/2014 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली.
लेखकसमीरसूरयांनी गुरुवार, 30/01/2014 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
तर आता असं बघा, सलमानचा 'जय हो!' चित्रपटगृहामध्ये झळकलेला आहे. सलमानच्या प्रतिमेला साजेसा चित्रपट असेल या अपेक्षेने जनतेने चित्रपटगृहाकडे पावले वळवली खरी परंतु घात झाला, पावले थिजली, नजरा स्तब्ध जाहल्या, हात शिट्ट्या मारण्यासाठी ओठांकडे न जाता गपगुमान खिशात गेले, पायाच्या बोटांनी शरमेने मान खाली घातली, चेहरे सुकले, हसू मावळलं, हळद रुसली, कु़ंकू हसलं...असे काय बरे जाहले?
चित्रपट सुरु होतो ते एका युवतीच्या अपहरणाच्या प्रसंगाने.