Skip to main content

समीक्षा

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 15/07/2014 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258 वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-. हे पुस्तक पुर्वीविविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात.

हमशकल्स - एक मैलाचा दगड

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 15/07/2014 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
हो हो, 'हमशकल्स' हा एक मैलाचा दगडच आहे. 'हमशकल्स'ला नाके मुरडणार्‍या तमाम अभिजनांच्या चित्रपटीय जाणीवांची मला अक्षरशः कीव येते. अहो, असं धाडसच कसं काय करू शकतात ही लोकं? 'हमशकल्स' हा चित्रपट म्हणून उच्च दर्जाचा तर आहेच परंतु माणसाच्या अंतरंगाचा इतका तपशीलात धांडोळा घेणारी, माणसाच्या मनाच्या बहुपेडी जडण-घडणीची नुसतीच दखल घेणारी नव्हे तर इतक्या सुबक पद्धतीने ती जडण-घडण दुनियेसमोर निर्भीडपणे मांडणारी ही कलाकृती अजरामर आहे यात शंकाच नाही. कल्पनाविलास ही संकल्पनाच तोकडी पडेल अशी कल्पनाउड्डाणांची आणि कल्पनाभरारीची विस्मयकारक किमया 'हमशकल्स' या चित्रपटात अनुभवायला मिळते हे कसं विसरू शकतो आपण?

आंधळी कोशिंबीर - एक धमाल करमणूक

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 31/05/2014 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
बापू सदावर्ते (अशोक सराफ) एक निवृत्त विधुर. एका मोठ्या बंगल्यात तो आपल्या रंगा (अनिकेत विश्वासराव) नावाच्या तरूण अविवाहीत मुलाबरोबर राहतो. बापू स्वतः अत्यंत काटकसरी व प्रचंड भांडकुदळ. भांडणात कोणालाही हार जात नाही. शांती चिटणीस (वंदना गुप्ते) आपल्या वयात आलेल्या पण अत्यंत पोरकट असलेल्या राधिका (मृण्मयी देशपांडे) नावाच्या मुलीबरोबर एकटीच राहणारी विधवा. ती सुद्धा प्रचंड भांडकुदळ. राधिका जराशी पोरकट, काहीशी अर्धवट. तिच्या शेजारी दुष्यंत मारणे (आनंद इंगळे) हा अविवाहीत वकील आहे. त्याचा शांतीवर क्रश आहे.

आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 23/05/2014 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.

प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

लेखक पेट थेरपी यांनी रविवार, 20/04/2014 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली.

शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये...

लेखक फारएन्ड यांनी रविवार, 06/04/2014 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
लॉस एंजेलिस च्या जवळ समुद्रात वादळ होते व टोर्नेडोज तयार होतात. पाण्यातील मासे त्याबरोबर उचलले जातात व एलए वर शार्क्सचा पाऊस पडतो. शब्दशः खुदा जब देता है स्टाईल ने छप्पर फाडके मासे पडतात. मग आपले हीरो, त्याचे जवळचे लोक व इतर मिळून ते टोर्नेडोज व मासे यांना कसे हरवतात ही स्टोरी. आता हे मासे म्युटेटेड वगैरे नाहीत. माशांसारखे मासे, फक्त वादळामुळे आकाशात उडून परत खाली पडतात. या ब्याकग्राउंड वर हा चित्रपट पाहावा.

क्विन...

लेखक पिलीयन रायडर यांनी मंगळवार, 01/04/2014 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे..

लग्न पाहावे करून

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 23/03/2014 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची) शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi ) तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?