मराठी चित्रपट - "तू ही रे"
तू हि रे (मराठी)
मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक.
कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.
अभिनय:
मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.
दिग्दर्शन:
संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की.
संगीत आणि गीतकार:
मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे.
मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
याद्या
20015
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
परीक्षण छान छान मला मुळात सई
^^^^^^^^^^^^
चॅनेलवरचा पिच्चर फुकटात पडतो
In reply to ^^^^^^^^^^^^ by समीर_happy go lucky
हे जे वर लिहिलंय "वैयक्तिक मत
In reply to चॅनेलवरचा पिच्चर फुकटात पडतो by तर्राट जोकर
चांगले मराठी चित्रपट टिकतात
In reply to ^^^^^^^^^^^^ by समीर_happy go lucky
सई ताम्हणकरला "बिकिनीवाली
धन्यवाद लगेच धावून आलात ,आता
तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन
In reply to धन्यवाद लगेच धावून आलात ,आता by पियुशा
च्यायला नाव नाव कुठून
In reply to तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
पैसा किंवा प्रचेतस ह्या
In reply to च्यायला नाव नाव कुठून by समीर_happy go lucky
टिकिट परवडेल पॉपकॉर्न आवरा ;
In reply to तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
महाभारतामधे साक्षात
In reply to टिकिट परवडेल पॉपकॉर्न आवरा ; by पियुशा
तू कोण म्हणायचा नक्की पांडव
In reply to महाभारतामधे साक्षात by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा टोमणा नसावा अशी आशा आहे
समीर जी मला राग नै आला ओपन
In reply to हा टोमणा नसावा अशी आशा आहे by समीर_happy go lucky
असंय होय! नावावरून मला
"ट्रान्सजेण्डर" म्हणजे काय??
In reply to असंय होय! नावावरून मला by आदूबाळ
ळॉळ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to असंय होय! नावावरून मला by आदूबाळ
कस आहे ना "आरश्यासमोर" बसून
In reply to ळॉळ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला आडनाव वाटलेलं...
^^^^^^^^^^^^^^"तू" हे नाव
In reply to मला आडनाव वाटलेलं... by प्यारे१
तुकाराम हिरे.
In reply to ^^^^^^^^^^^^^^"तू" हे नाव by समीर_happy go lucky
हा हा हा हा हा हा हा हा हा
In reply to तुकाराम हिरे. by प्यारे१
हा हा हा हा हा हा हा हा हा
In reply to तुकाराम हिरे. by प्यारे१
च्यायला
+१
In reply to च्यायला by प्रसाद गोडबोले
^^^^^^^^^^^^
अगदी गोग्गोड आहे की म्हणजे हा
ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट
In reply to अगदी गोग्गोड आहे की म्हणजे हा by पिशी अबोली
अलका कुबलने ज्या मराठीमधे
In reply to ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट by समीर_happy go lucky
शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी
In reply to अलका कुबलने ज्या मराठीमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
समीर सर ते नाटक जवळपास पाठ
In reply to शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी by समीर_happy go lucky
चुकीची समजूत आहे, मराठी
In reply to समीर सर ते नाटक जवळपास पाठ by कॅप्टन जॅक स्पॅरो
काही कळेना बुवा तुमच्या
In reply to ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट by समीर_happy go lucky
बर...........
In reply to काही कळेना बुवा तुमच्या by पिशी अबोली
आयला, तु ही रे वरून आ ss रे !
विनोद?? काहीही जमला नाही !!!!
In reply to आयला, तु ही रे वरून आ ss रे ! by Sanjay Uwach
स्वप्नील जोशीसारख्या
मी स्वप्नील जोशी किंवा सी
In reply to स्वप्नील जोशीसारख्या by रेवती
अस बघा काहिना काहीही आवाडु
In reply to मी स्वप्नील जोशी किंवा सी by समीर_happy go lucky
बरोबरे पण मला ऑर्कुटची सवय
In reply to अस बघा काहिना काहीही आवाडु by पियुशा
ऑर्कुट म्हटल्यावर मला
In reply to बरोबरे पण मला ऑर्कुटची सवय by समीर_happy go lucky
ब्ट्बट्फिक हे काय होत?
"स्पेसिफिक" इट वास टायपो
In reply to ब्ट्बट्फिक हे काय होत? by पियुशा
बटबटीत + स्पेसिफिक चा
In reply to ब्ट्बट्फिक हे काय होत? by पियुशा
महा लोल =))
In reply to बटबटीत + स्पेसिफिक चा by आदूबाळ
मुळात सई ताम्हणकर आणि
आपण बघत नाही म्हणजे कुणीच
In reply to मुळात सई ताम्हणकर आणि by कविता१९७८
अहो भाउ, हा चिञपट माझ्याकडुन
In reply to आपण बघत नाही म्हणजे कुणीच by समीर_happy go lucky
मग यात खळबळजनक/नवीन/वेगळ अस
In reply to अहो भाउ, हा चिञपट माझ्याकडुन by कविता१९७८
अच्छा
In reply to मग यात खळबळजनक/नवीन/वेगळ अस by समीर_happy go lucky
समीर भौ, आणखी कुठल्या मराठी
फेस्बुक
In reply to समीर भौ, आणखी कुठल्या मराठी by प्यारे१
नवीन मराठी संस्थळ
In reply to फेस्बुक by समीर_happy go lucky
कुंभमेळ्यात बिछड्लेल्या
In reply to नवीन मराठी संस्थळ by प्यारे१
असहमत
चित्रपट मनोरंजनासाठी असतो
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई
बाप-मुलगी एक असंही नातअसते
In reply to स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई by मृत्युन्जय
वाक्य रचना योग्य असणं हेही
In reply to बाप-मुलगी एक असंही नातअसते by समीर_happy go lucky
ते गिरीश ओक आणि तेजस्विनी
In reply to वाक्य रचना योग्य असणं हेही by प्यारे१
काय बोलता. नात्यांची थोडीथोडी
In reply to बाप-मुलगी एक असंही नातअसते by समीर_happy go lucky
पकाऊ परिक्षण, खड्यासारखे
अभ्या शांत हो
In reply to पकाऊ परिक्षण, खड्यासारखे by अभ्या..
असो, वाचल्याबद्दल (बारकाईने)
In reply to पकाऊ परिक्षण, खड्यासारखे by अभ्या..
तू ही रे पाहिला.
केविलवाणा प्रयत्न.
नाही रे भाते, ती ऑर्कुट
In reply to केविलवाणा प्रयत्न. by भाते
एखाद्या प्रतिक्रियेवर आपण सब
In reply to केविलवाणा प्रयत्न. by भाते
आपण फक्त लेख अन त्यावर
In reply to एखाद्या प्रतिक्रियेवर आपण सब by समीर_happy go lucky
तुमच्याच हिंदी चित्रपटाच्या
ओके
In reply to तुमच्याच हिंदी चित्रपटाच्या by मधुरा देशपांडे
कहाणी
"कहाणी:
In reply to कहाणी by अन्या दातार
मराठी चित्रपटात कास्टिंग हि
तो स्वप्निल..
काय सांगता...
दुनियादारी ने कोटिंच्या उड्या
In reply to काय सांगता... by नीलमोहर
दुनियादारी,
In reply to दुनियादारी ने कोटिंच्या उड्या by प्यारे१
मे-हु-ना सारखा 10 वर्षांनी
In reply to दुनियादारी, by नीलमोहर
असहमत, तो एक चांगला अभिनेता
हो पण
In reply to असहमत, तो एक चांगला अभिनेता by समीर_happy go lucky
अअं आय अंआय ओआ ए आअअ
In reply to हो पण by बोका-ए-आझम
मांयया ओय =))
In reply to अअं आय अंआय ओआ ए आअअ by प्यारे१
कॉमेडी एक्सप्रेस नावाच्या ई
In reply to मांयया ओय =)) by टवाळ कार्टा
शेट्टी अण्णाचा गोलमाल परत बघ.
In reply to कॉमेडी एक्सप्रेस नावाच्या ई by प्यारे१
:)
In reply to शेट्टी अण्णाचा गोलमाल परत बघ. by टवाळ कार्टा
हल्ली जे मराठी चित्रपट
चायला तुमी डायरेक धंद्यालाच
In reply to हल्ली जे मराठी चित्रपट by अत्रुप्त आत्मा
धंद्याला-बसतात =]] =]]
In reply to हल्ली जे मराठी चित्रपट by अत्रुप्त आत्मा