Skip to main content

समीक्षा

ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार

लेखक सुधीर वैद्य यांनी सोमवार, 04/01/2016 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार ठष्ट हे ज्वलंत नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: नाटकाचा विषय चाकोरीबाहेरचा आहे. हा विषय खरेतर समाजाला नवीन नाही. पण उघडपणे बोलण्यावर अलिखित बंदी आहे, ह्या अर्थाने हा विषय चाकोरीबाहेरचा आहे. प्रत्येक माणसासाठी लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. स्त्री साठी हा टप्पा जरा जास्तच महत्वाचा असतो. लग्न न झालेल्या मुलींची बाजू कोणी विचारात घेतच नाही.

Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

लेखक सुधीर वैद्य यांनी रविवार, 03/01/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे Selfie - सेल्फी हे नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: ट्रेन वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे एका रेल्वे स्टेशनच्या महिला वेटिंग रूम मध्ये ५ स्त्रिया अडकून पडतात. वेळ घालवण्यासाठी म्हणून एकमेकींशी ओळख करून घेतात. सहज बोलता बोलता त्या स्वत:चे आयुष्य share करतात. अनेक वेळा मनातील खोल जखम अनोळखी माणसासमोर बोलायला लाज वाटत नाही.

१३०) आनंदवन प्रयोगवन / डॉ विकास आमटे / समकालीन प्रकाशन

लेखक सुधीर वैद्य यांनी शनिवार, 02/01/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
१३०) आनंदवन प्रयोगवन / डॉ विकास आमटे / समकालीन प्रकाशन / २६-१२-२०१४ / पृष्ठे १९२ / रुपये २५०/- हे पुस्तक म्हणजे बाबा आमटेंच्या मानव मुक्तीचे स्वप्न साकारणाऱ्या ध्येय वेड्यांची कहाणी आहे. काही शब्द व्यवहारात एव्हडे सामर्थ्यवान होतात कि त्यांचे अर्थच बदलून जातात. उ हा. आनंदवन. आनंदवन म्हटले कि आठवतात बाब आमटे आणि त्यांनी कुष्ठ रोग्यांची केलेली सेवा. परंतु हे पुस्तक वाचल्यावर आनंदवन म्हणजे आपल्याला असलेली हि फारच कमी ओळख आहे ह्याची जाणीव होते. कुष्ठ रोगी बरा होतो पण त्याचे नातेवाईक - समाज त्याला खुल्या मनाने स्वीकारत नाहीत.

नटसम्राट

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 02/01/2016 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी रंभूमीवर अत्यंत गाजलेल्या "कट्यार काळजात घुसली" चं सुंदर चित्रपट रूपांतर पाहिल्यानंतर उत्सुकता होती ती अर्थातच नाना पाटेकर - महेश मांजरेकर द्वयीच्या येऊ घातलेल्या "नटसम्राट" ची. कुसुमाग्रजांच्या समर्थ लेखणीतून रंगभूमीवर येऊन अजरामर झालेलं ही नाटक म्हणजे नात्यसृष्टीतला एक महत्वपूर्ण मानबिंदू आहेच. अशातच, महेश मांजरेकर बर्याच काळानंतर मराठी चित्रपट बनवणार, त्यात नाना, विक्रम गोखलेंसारखे खरोखरचे नटसम्राट झोकून देऊन काम करणार.. प्रचंड ताणली गेलेली उत्सुकता, आणी उंचावलेल्या अपेक्षांनिशीच चित्रपटग्रुहात प्रवेश केला.. गणपत रामचंद्र बेलवलकर..

डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन

लेखक सुधीर वैद्य यांनी शुक्रवार, 01/01/2016 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन / २०-०६-२०१४ / पृष्ठे १५७ / रुपये १७०/- / कथा संग्रह: स्त्री ची अनेक रूपे असतात. वयानुसार हि रूपे बदलत जातात, तसेच त्या स्त्रीची मानसिकता, जगाकडे बघण्याची दृष्टी सुद्धा आमुलाग्र बदलते. लेखिकेने अश्याच वेगवेगळ्या रूपातील स्त्रीयांचा व त्यांच्या बदललेल्या मनाचा - आयुष्यातील भूमिकेचा मागोवा घेतला आहे. कथा संग्रहात ११ कथा अहेत. ह्या सर्व कथा मासिकात ह्यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत. सर्वच कथा वाचनीय आहेत. परंतु खालील कथा खूप लक्षवेधी आहेत …. डेट, पैलतीरावर, एका मोकळ्या श्वासासाठी.

४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

लेखक सुधीर वैद्य यांनी गुरुवार, 31/12/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे: प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवत असतो. ध्येय निश्चित करताना स्वत:ची कुवत (ability ) लक्षात घेणे जरुरीचे असते. तसेच ध्येय सिद्धीसाठी अपार श्रम आणि जोडीला कमीतकमी नशीब आवश्यक असते. काहीवेळा ध्येय अपेक्षेप्रमाणे साध्य होते. काही वेळा प्रयत्न करून सुद्धा, अपेक्षित यश हुलकावणी देत राहते. यश किंवा अपयश ह्याची गाठ घालणारे नशीब असते. अपयश आले तरी माणूस प्रयत्न सोडत नाही पण यश मिळाले नाही तर मात्र कालांतराने निराश होतो. ध्येय ठरवताना मनात असलेली 'आस ', प्रत्येक अपयशाबरोबर 'ध्यास ' मध्ये रुपांतरीत होत असते.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 31/12/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.

फार्गो सीजन टू

लेखक अज्ञात यांनी रविवार, 27/12/2015 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
फार्गो सीजन टू FARGO फार्गो नावाचा एक इंग्रजी चित्रपट येऊन गेलाय, त्या चित्रपटावरच आधारित एक मालिकाही सुरु झाली, एक सर्वसाधारण माणूस परिस्थिती मुळे कसा अपराधी होतो ह्याची उत्तम मांडणी केली आहे, ब्लॅक कॉमेडी अप्रतिम! असो, त्याच मालिकेचा दुसरा सीजन आलाय ह्या वर्षी, मागच्याच आठवड्यात दहावा आणि शेवटचा एपिसोड पाहिला, कथानक आहे मिनेसोटा ह्या अमेरिकन भागातील दोन माफीयांच्या भांडणाचं, त्या भांडणात खूप व्यक्तीचित्र त्यांची कहाणी अगदी सखोलीने मांडली

बाजीराव-मस्तानी

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 21/12/2015 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
बाजीराव-मस्तानी बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो. बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते हे मान्य पण त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर त्यांचा उल्लेख शूर म्हणून न होता मस्तानी प्रकरणामुळे होतो. मी स्वत: गुजरात मध्ये काही वर्ष काढलेली आहेत आणि हे अनुभवलेलं आहे. त्यांची ब्राह्मण जात आणि मस्तानी या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांच्या शुरत्वावर कडी करतो हे मी बघितलेलं आहे.

धारदार 'कट्यार'

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 21/12/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
'कट्यार काळजात घुसली' चित्रपट प्रदर्शित होऊन दीड दोन महिने झाले असतील, फेसबुक आणि वर्तमानपत्रात खूप वाहवा मिळवली, मुख्य नाटक बद्दल काही विशेष माहिती नव्हती आणि हा चित्रपट पाहायचाय ह्यावर दुमत नसल्यानी मी चित्रपट समीक्षा वाचायचे टाळले, आणि आज तो दिवस आला...संगीत-चित्रपट पहायचा आनंद मिळाला, अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत! तुलनात्मक सांगायचं झालं तर संगीतनाट्या/संगीतनात्या वर आधारित असलेला 'बालगंधर्व' पेक्षा 'कट्यार' जास्त आवडला!सुरुवातीलाच 'कट्यार' आणि 'संगीत' ह्या दोन विभिन्न गोष्टींचा मिलाफ का ह्याचे स्पष्टीकरण असलेला प्रसंग आहे, तिथेच अर्धी बाजी मारली आहे कथानकानी. सचिनची दाढी सोडली तर अख्