Skip to main content

समीक्षा

डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल

लेखक nishapari यांनी मंगळवार, 09/07/2019 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
सुपरनॅचरल मध्ये डेमन कसा निर्माण होतो ही कल्पना उत्तम दाखवली आहे .... जे माणसांचे आत्मे वाईट कर्मांमुळे नरकात जातात , त्यांना तिथे वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं ... इतक्या वेदना दिल्या जातात की त्यांचं माणूसपण गळून जातं आणि त्या आत्म्याचं डेमनमध्ये रूपांतर होतं . ज्याला शरीर नसतं फक्त काळ्या धुराच्या स्वरूपात त्याचं अस्तित्व असतं . डेमनमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया फार वेदनादायी असते पण एकदा डेमन झाल्यावर काही शक्ती प्राप्त होतात , अमानवी शक्ती , माणसाच्या शरीरात शिरून ते वापरणं , स्पर्श न करता वस्तू इकडच्या तिकडे करणं आणि आणखी बऱ्याच .... डेमन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ...

आरश्यातल्या आरश्यात : एक आस्वाद

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/06/2019 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आरश्यातल्या आरश्यात वारले बेवारशी... - मनोहर ओक (‘आयत्या कविता’ मधून) मनोहर ओक यांच्या ‘आयत्या कविता’ या कविता संग्रहातील ही पहिली कविता. एका ओळीची. या एका ओळीच्या कवितेतील शेवटचा ‘बेवारशी’ हा शब्द ओळीत पहिला असता तर ते केवळ एक वाक्यश झाले असते: ‘बेवारशी आरश्यातल्या आरश्यात वारले!’ असे ते वाक्य झाले असते. पण ‘बेवारशी’ हा शब्द ओळीच्या शेवटी गेल्याने या वाक्याला एक लय प्राप्त झाली आहे. मात्र केवळ हा शब्द शेवटी गेल्यानेच लय निर्माण झाली असे मात्र नव्हे. तर या एवढ्याश्या ओळीतच नाद लयीचे सुंदर मिश्रण आहे. म्हणून ही एकच एक ओळ संपूर्ण कवितेची अट पूर्ण करते.

चित्रपट परिचय – Gifted

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 29/04/2019 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
२०१७ चा हा चित्रपट हिंदीतून बघावयास मिळाला. सात वर्षाची मुलगी मेरी आणि तिचा मामा फ्रँक यांची ही कथा आहे. तशीच मेरीची आजी (आईची आई) एव्हलीन , आणि मृत आई डायान यांची ही कथा आहे. सात वर्षाची ही गोड मुलगी आपल्या मामासोबत राहते आहे. सुमारे सहा-साडेसहा वर्षापुर्वी डायानने फ्रँककडे सोपवत स्वतःला संपवले होते. मामा , एक बोका आणि शेजारी राहणारी घरमालकीण रोबर्टा हे तिचं विश्व आहे. मेरी तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप वेगळी आहे कारण तिची बुद्धीमत्ता असामान्य आहे. समवयस्क मुले तिला मंद-पकावू वाटतात. त्यामुळे शाळेत जाण्यास ती उत्सुक नाही.

उत्पादन परिचय : झोप येण्याकरिता चहा

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 22/04/2019 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो.. अलीकडेच या अनोख्या चहाशी माझी ओळख झाली. आपल्याकरिता तिचा संक्षिप्त परिचय देवू इच्छितो. sleep tea या चहाचा खरेच उपयोग होतो असे जाणवले. माझ्या पत्नीला गेल्या काही दिवसांपुर्वी झोप न येण्याचा त्रास जडला होता , इतका की तिला डॉक्टरांनी काही दिवसांकरिता झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या.

इंग्रजी मालिका - ब्रॉडचर्च

लेखक nishapari यांनी शनिवार, 20/04/2019 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रॉडचर्च ही मालिका पूर्ण पाहून झाली ... बरीच गंभीर होती .. पण काही हलकेफुलके सीन्सही होते .. 3 सिजन्स मध्ये 3 वेगळ्या केसेस होत्या . पहिल्या एपिसोड मधल्या खुनाच्या गुन्ह्याचा गुन्हेगार आठव्या एपिसोड मधे समजतो ... दुसरा सिजन पूर्ण त्याची कोर्टात केस आणि दुसरी एक सेपरेट इन्वेस्टीगेशन केस .. तिसरा सिजन एक वेगळी केस असं आहे ... आधी पाहिलेल्या सगळ्या सिरिअल्स पेक्षा वेगळी होती .. गुन्ह्यांचा खोलवर शोध हे तर वैशिष्ट्य आहेच पण ते क्राईमच्या अनेक मालिकांमध्ये दिसून येईल कदाचित..... त्यात फार विशेष काही नाही ... अर्थात तेही गुंगवून ठेवणारं होतंच .

अनेक प्रश्न आणि काही सोल्युशन्स ! TCGN अर्थात टेक केअर गुड नाईट !

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 05/04/2019 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
… तुम्ही नेटबॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग वापरता ? तुमची मुले व्हॉट्स ॲप किंवा इतर कुठले नेट चॅटिंग करतात ? तुम्ही फेसबुक सारखे सोशल मीडियावर अपडेटस ठेवता ? तुम्ही तुमच्या ई-मेल अकाऊंटचा पासवर्ड किती दिवसांतून बदलता ? यापैकी काहीही करत असाल तर तुमचा अविनाश नक्कीच होऊ शकतो ! बदलत्या टेक्नोलॉजीच्या या जमान्यात तुम्ही स्वत:चं , स्वत:च्या कुटुंबाचं, स्वत:च्या मालमत्तेचं संरक्षण करण्यास समर्थ आहात अशी खात्री आहे तुमची ? बदलत्या सामाजिक कक्षा, संस्कृती आणि लाइफ स्टाईल याचं संपूर्ण भान आपल्याला आहे असा विश्वास आहे तुमचा ?

केसरी - चित्रपट परीक्षण/रिव्यू - स्पॉईलर अलर्ट

लेखक bhagwatblog यांनी सोमवार, 25/03/2019 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते.

चित्रपट परिचय - जलेबी

लेखक मराठी कथालेखक यांनी रविवार, 24/03/2019 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
२०१६ च्या ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले नसले तरी एका बंगाली चित्रपटाचा हा रिमेक आहे असे विकीपिडीयावर वाचल्याने उत्सुकतेपोटी डाउनलोड करुन मी हा चित्रपट बघितला. चित्रपटाचे शीर्षक जलेबी असले तरी ही गोड-गोड प्रेमकथा नाही. चित्रपटाच्या सुरवातीस नायिका आयेषा मुंबई-दिल्ली ट्रेनच्या प्रवासाला निघते. आधीच निराश आणि वेदनेने व्याकूळ असलेल्या आयेषाला एक समवयस्क अनोळखी स्त्री अनू या प्रवासात भेटते. अखंड बडबड करणार्‍या अनूला आयेषा सुरवातीला काहीशा अनिच्छेनेच उत्तर देत असते. पण हळूहळू आयेषाचा एक समांतर प्रवास सुरु होतो .. आठवणींचा आणि वेदनेचा.