Skip to main content

सद्भावना

मार्केट १७००० च्यावर

लेखक दशानन यांनी बुधवार, 30/09/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केट १७००० च्यावर गेले.... अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण.. असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली... मज्जा आली ! आता काही प्रश्न ! ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ? ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ? जरा काही झाले की मार्केट पडणार... तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार... तरी मार्केट वर आलेच ना ? भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात... कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे....

दसर्‍याच्या शुभेच्छा!!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 28/09/2009 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपापरिवाराला आमच्या दसर्‍याच्या शुभेच्छा!!! DSC_0261_353 आपट्याचं पान तर रेखीव असतंच पण फुलंसुद्धा अगदी आकर्षक असतात... DSC_0262_354

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 27/09/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपावकरांनो! . ३ ऑक्टोंबर २००९ रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे. त्यानिमित्त सगळयांना हार्दिक शुभेच्छा! . Kojagiri-50

बदल

लेखक प्रभो यांनी रविवार, 27/09/2009 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच घरी आलो दसर्‍यासाठी.

राज यांचे अभिनंदन

लेखक अ-मोल यांनी गुरुवार, 24/09/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम्स नाउ या वाहिनीला मुलाखत देताना आवर्जून मराठीच बोलून निर्भीड विचार मांडल्याबदृल राज ठाकरे यांचे अभिनंदन. मुलाखतीसाठी खालील दुवा पहा - http://www.timesnow.tv/videoshow/4328045.cms

नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 03/09/2009 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वाचक, अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला. अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले. अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत. आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे.

मी पाहिलेले प्रायोगिक नाटक.

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 26/08/2009 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव ‍र्‍होअन तोंड्वळकर... मी नरवीर कोंडाजी शिरुडे विद्यालयात पाचवीत शिकतो. आमच्या शाळेला काहीजण नकोशि शाळा असे म्हणतात. ते खरेही आहे. मला नाटक पहायला फ़ार आवडते. भरत जाधव आणि प्रशांत दामले मला आवडतात. सही रे सही आणि एका लग्नाची गोष्ट मी ४ वेळा पाहिलं आहे. मला अनुभव घ्यायला फ़ार आवडतं. आणि ते लिहून काढायला.... मी एक सामान्य छोटा लेखक आहे हे मला माहित आहे पण कधीतरी तर सुरुवात करायला हवीच ना? माझे निबंध खूप छान होतात, असं सगळे म्हणतात. मी खूप वाचन करतो. सकाळ म.टा. लोकसत्ता पुढारी लोकमत संध्यानंद केसरी तरूण भारत इतके पेपर वाचतो.

आमचे जाधव सर

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 24/08/2009 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
"सर बॉल प्लीज"....... मी त्यांना म्हटलं. सहा फूट उंच, भरभक्कम शरीर, नेव्ही ब्ल्यू रंगाचा ट्रॅक-सूट घातलेल्या त्या चाळिशीच्या व्यक्तीला आधी कधी शाळेत बघितलं नव्हतं. दोन धारदार घारे डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. "सर..... बॉल प्लीज" "इकडे ये". त्यांचं त्या टेनिस चेंडूकडे लक्ष सुद्धा नव्हतं. मी जवळ गेल्यावर त्यांनी मला विचारलं "काय रे हिरो..... व्हॉलिबॉल खेळणार का"? हा प्रश्न अनपेक्षित होता. "व्हॉलिबॉल"? मी विचारलं. तेवढ्यात आमचे पी टी चे लिम्हण सर आले. म्हणाले. "हे जाधव सर आहेत. तुम्हाला व्हॉलिबॉल शिकवणार आहेत. आपल्या शाळेची टीम तयार करायची आहे.