कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख
- Read more about कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख
बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल.
पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला.
आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.