१२३.४
फ्लाईंग शिकणं हा माझ्या एरव्हीच्या लाईफपेक्षा भलताच जास्त झापडिंग काळ होता..
त्यात मी जाम मजा केली..जाम लोचे केले आणि जाम झगडा केला..भीतीशी, निराशेशी,अभ्यासाशी, आकाशाशी, हवेशी आणि व्हॉट नॉट..!!
हवेत उडताना एका एरियाताली सर्व विमानं एकाच फ्रिक्वेन्सीवर बोलत असतात..तरट फाटल्यागत आवाजात घोगरं घोगरं बोलून पायलट कोणावर स्टाईल मारतात कोण जाणे..
पण त्यामुळे होतं काय की सर्वांचं बोलणं सगळेच ऐकत असतात..आणि एकजण बोलायला लागला की त्याने माईक सोडेपर्यंत बाकी सगळ्यांची बोलती बंद..
म्हणून अत्यंत मुद्द्याचं तथा थोडक्यातच बोलायचं असतं..
मोठ्या विमानात पायलट आणि को-पायलट एकमेकांशी टी.पी.
मिसळपाव
एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे.
तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो.