Skip to main content

प्रतिक्रिया

ब्लॉग माझा - ३ : विजेत्यांचे अभिनंदन

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 22/11/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी स्टार माझा आयोजीत 'ब्लॉग माझा' ह्या मराठी आंतरजालावर मुक्तपणाने आणि उत्साहाने भरभरुन लिखाण करुन आपल्या मायबोली मराठीच्या सेवेत असलेल्या मराठी जालनिशीकारांची ( मराठीत ब्लॉगर्सची ) स्पर्धा मोठ्ठ्या उत्साहात आणि जोशात पार पडली. नेहमीसारखाच ह्या ही वर्षी स्पर्धेला स्पर्धकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला असेल ह्याची खात्री आहे. लोक लिहीतच असतात, प्रतिसाद मिळाले तरी लिहतात आणि नाही मिळाले तरी जास्तच पेटुन लिहतात.

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.

मुंबैच्या किनारी ओबामा नाचला.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/11/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला.. मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :) इथे पाहा.. जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :) परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे..

मराठी संकेतस्थळे व दिवाळी अंक

लेखक दशानन यांनी शनिवार, 06/11/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी वाचक विविधता असलेल्या लेखाकरता आतुरतेने दिवाळी अंकाची वाट पाहत असे, पण हळूहळू नवनवीन बदल झाले व युनिकोडचा शोध लागला, मायबोलीने एका विदेशी भाषेचे, भरलेल्या, दाटीवाटी असलेल्या जंगलात, एक मराठीचे रोपटं लावलं व हळू हळू मराठी भाषेचे बीज चांगलेच फोफावले. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेला लेखक ह्या युनिकोडचा आधार घेऊन आपली लेखणी पाजळू लागला, व त्यांची ही भुक पुर्ण करण्यासाठी नवनवीन मराठी संकेतस्थळे निर्माण होत गेली, काही रुजली, काही फोफावली तर काही काळाच्या ओघात वाळून बेचिराख झाली, पण जी बेचिराख झाली त्यांनी देखील जाता जाता, नवीन रोपट्यांना खतं म्हणून आपल्या संकल्पना दिल्या.

काही अतरंगी संभाषणे.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 01/11/2010 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी तशा खुप प्रकारच्या लोकांना भेटलो आहे,त्यांच्याबद्दल जास्त काही लिहु ईच्छीत नाही,पण त्यात उच्च पातळीच्या वैज्ञानिकांपासुन ते 'भाई' ह्या श्रेणीत येणारे सर्व येतात.मग मी प्रत्येकाशी बोलताना वापरले जाणारे शब्द,चेह-यावरचे भाव इतकेच काय अंगात घातलेले कपडे ह्यांचाही विचार करतो,हे सर्व 'जैसा देस वैसा भेस' ह्या नियमाचे कटेकोर पालन व्हावं ह्या उद्देशाने केलेले असते. पण संभाषणावेळी कधी कधी काय होतं,पुढची व्यक्ती मी गृहीत धरलेल्या तिच्या प्रतिभेला तडा जाईल असे काही शब्द बोलते,मी चाट पडतो,"अरे हेच बोलले का?". मला जे सांगायचय ते मी काही उदारणांसहीत स्पष्ट करतो. १) मी.नेने,ह्या माणसात तशे खुप गुण,त्यातल

फुल्ल टू दबंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 29/10/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

पुस्तक परीचय: "थ्री कप्स ऑफ टी"

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 22/10/2010 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
हा पुस्तक परिचय आहे. परिक्षण करण्याइतपत अक्कल मला नाही. जे आवडलं ते लोकांना सांगावं हाच फक्त उद्देश. १९९३ मधे, अमेरिकेतल्या मोंटाना राज्यात राहणारा एक धाडसी गिर्यारोहक "ग्रेग मॉर्टेन्सन", के-२ हे जगातलं दुसर्‍या नंबरचं उंच पण अतिशय अवघड असं शिखर सर करण्यात अपयशी ठरतो. पाकिस्तानातल्या (पाक्-व्याप्त काश्मिरमधल्या) ईशान्येला असलेली हिमालयातली काराकोरम पर्वतरांग म्हणजे जगातल्या अत्युच्य अशा साठ पर्वतशिखरांचं माहेरघर, पाकिस्तान व चीन मधे असलेली नैसर्गिक हद्द. शरिराने श्रमलेल्या आणि अयशस्वी चढाईमुळे पूर्णपणे मानसिकरित्या खचलेल्या अवस्थेत ग्रेग मॉर्टेन्सन बेस कॅंपची आणि पर्यायाने बाकिच्या जगाची वाट चुकून कित्येक तास भरकटत एका गावात शिरतो. गावातली लोकं त्याची काळजी घेतात. परतताना मॉर्टेन्सन त्यांना, त्याच्या अवाक्याबाहेरचं, वचन देतो, "मी परत येइन आणि तुमच्या गावात एक शाळा बांधेन". अवक्याबाहेरचं वचन ह्यासाठी की मॉर्टेन्सनकडे त्यावेळी स्वतः राहायला घरही नसतं. अशा उनाड फिरणार्‍या आणि आपल्या गाडीत झोपणार्‍या मॉर्टेन्सनला ह्या प्रंसंगामुळे जगायला नवं कारण मिळतं. जवळ असलेलं नसलेलं सगळं विकून आणि नविन देणगीदारांना गाठून शाळेसाठी पैसे जमा करतो. आणि पुन्हा कोर्फेला परतुन तो आपलं वचन पूर्ण करतो. पण त्याचं कार्य इथेच संपत नाही. उलट इथे त्याच्या कार्याची सुरुवात होते. आज जवळ जवळ एक दशकभर चाललेल्या, तालिबान आणि अल्-कायदा सारखी अत्यंत कट्टरपंथियांचं आश्रयस्थान समजला जाणार्‍या प्रदेशात राहून विशेषतः मुलींसाठी शाळा बांधण्याच्या त्याच्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे. एकिकडे जग दहशतवाद्यांची पाळंमुळं खोदुन काढण्यासाठी युध्द करत आहे.तर हा जगावेगळा शिपाई गरिबी आणि अडाणिपणा ही, दहशतवादामागील मूळ कारणं दूर करतो आहे. मुलं आणि मुलींना एकाच प्रकारे गैर-उग्रवादी (शब्द सुचवा) (nonextremist) शिक्षण देत आहे. हे करताना मॉर्टेन्सन यांना स्वतः अपहरण आणि असंख्य हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं. भडकलेल्या इमाम व मुल्लांनी त्यांच्या विरुद्ध काढलेले फतवे तसंच अमेरिकेविरुद्ध गद्दार ठरवून त्यांना दिलेल्या धमक्या यांची तर गणतीच करायला नको. असं असूनही त्यांनी "सेंट्रल आशिया इन्स्टिट्युटचं" स्वप्न साकार केलं. ह्या अंतर्गत ५५ शाळा ईशान्य पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या दुर्गम आणि गरीब भागात बांधल्या आणि त्या व्यवस्थित चालू राहतील याची व्यवस्था केली. मॉर्टेन्सन यांनी इथल्या हजारो मुला-मुलींना शिक्षणाद्वारे नवी दारं उघडून दिली आहेत. स्वतःच्या अथक परिश्रमांनी आज खरोखरच त्यांनी ह्या मुलांचं जग बदललं आहे.

50 First Dates आणि गोजिरी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 21/10/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही) चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे.