मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दोन पेग मारुन.................

पियुशा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मानुस च बनला माणसाचा वैरी .. तोंडावर हसू अन पाठीला सूरी ................ अशा नत द्रष्टाना आपण कसे हेरायचे आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या हे किती दिवस लपवायचे ? खाल्ल्या आयुष्यभर खस्ता सावलीसारखे जपले तुम्हाला हवी "स्पेस" त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा भाव आणून किती जणांना फसवायच अस कुठवर चालायचं ...................... एकलव्यान मानल द्रोणास गुरु ... दिला अंगठा म्हणुनी "गुरुदक्षिणा" आजचेच काही "गुरु" प्रायव्हेट ट्युशन घेऊन किती उकळतात "दक्षिणा" भूछत्र उगवतात तसे उगवले शाळा ,कॉलेज ,आणि नरसऱ्या .......... डोनेशन ,अडमिशन ,फी ,आणि फंड पार करत सामान्यांना येतात घेरया............ अशा "ज्ञान" विकणाऱ्या गुरूना.. आपणच किती सोकावतो आहे कॉम्पिटीशन चा जमाना आहे म्हणून आपनच त्यांच्यामागे धावतो आहे दुष्काळी बळीराजा ,वैतागला हळहळला ... कर्जाला टाटा बाय - बाय करून देवाघरी विसावला सरकारी प्यकेज चा फायदा मधल्या च बोक्यानी उचलला अशा बोक्याचं कंबरड देवबाप्पा तू का मोडत नाहीस .......... गरिबाला दिलीस अर्धी भाकरी ती हि तू सोडत नाहीस ........... ऐश्वर्य ,बंगला अन गाड्यांच्चा त्यांच्याकडे चमचमाट................... गरीबाकड १-२ मडकी गाडगी फाटलेली गोधडी अन मोडलेली खाट.............. जो पाप करतो म्हणतात त्याचा घडा इथेच भरतो मरण तर सर्व जीवांना अटळ गरीब हि मरतो अन पापीही मरतो ............. पण (भ्रष्ट बोका )पुरेपूर जगतो अन पुरपूर उप भोगतो बिचारा गरीब चार घासासाठी डोक्यावरच्या छतासाठी रोज मरून जगतो लढत पडत शेवटी कुठतरी जाऊन खपतो कोण गेलेय स्वर्गात अन कोण गेलेय नरकात कोण पाहायला जातो ? ज्याला हि अंदाधुंदी नाही बघवत तो काय करतो ........... एकट्याने काय लढणार ह्या ..... माजलेल्या बोक्यांशी .. म्हणून दोन पेग मारून निवांत झोपतो ..................

वाचने 4149 वाचनखूण प्रतिक्रिया 19

नन्दादीप 24/12/2010 - 16:09
>>>अ-- प्र-- ती-- म . >>> खरोखर अंतर्मुख करायला लावणारी कविता.... स्पा भौ शी एकदम सहमत... +१

स्वैर परी 24/12/2010 - 16:30
अशा नत द्रष्टाना आपण कसे हेरायचे आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या हे किती दिवस लपवायचे ?
पियुषा! जमलय बाकी! मस्त च!

नगरीनिरंजन 24/12/2010 - 17:33
मस्त! सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येणारे विचार अगदी चरचरीत भाषेत परिणामकारकपणे लिहीले आहेत! कविता आवडली.

प्रकाश१११ 24/12/2010 - 17:33
खाल्ल्या आयुष्यभर खस्ता सावलीसारखे जपले तुम्हाला हवी "स्पेस" त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा भाव आणून किती जणांना फसवायच अस कुठवर चालायचं ........... बाईग छान लिहितेस . खूप छान लिही. मस्त .मनापासून . म्हणशील कोण कुठला काय म्हणतोय .चांगलं म्हणतोय . मनापासून की काय देवास ठाऊक ? [असा मनात विचार आणायचा नाही ] लिवले ब्वा चला शुभ दिवस .!!

इंटरनेटस्नेही 25/12/2010 - 01:23
हदयस्पर्शी कविता. बाकी दोन पेग मारुन हे टायटल वाचुन आधी वाटले, तात्यांचा लेख आहे की काय.. ;) - (बार बाऊन्सर) इंट्या.

पिवळा डांबिस 26/12/2010 - 11:18
बिचारा गरीब चार घासासाठी डोक्यावरच्या छतासाठी रोज मरून जगतो लढत पडत शेवटी कुठतरी जाऊन खपतो वा, क्या बात है!!अगदी खरं आहे!! अशा बोक्याचं कंबरड देवबाप्पा तू का मोडत नाहीस .......... गरिबाला दिलीस अर्धी भाकरी ती हि तू सोडत नाहीस ........... म्हणूनच त्या देवबाप्पावरचा आमचा विश्वासही उडत चाललांय!!!! किती जणांना नडावं त्याने!!! तो काय करतो ........... ... ... ... दोन पेग मारून निवांत झोपतो .................. सहमत. तो तरी बिचारा काय करणार!!!! जे चाल्लंय ते बघवतही नाही, आणि काही करताही येत नाही!!! मग पेगांचाच सहारा!!!

विलासराव 26/12/2010 - 11:55
एकट्याने काय लढणार ह्या ..... माजलेल्या बोक्यांशी .. म्हणून दोन पेग मारून निवांत झोपतो ................. सह्हीईईईईईईई!!!!!!!!!!