Skip to main content

प्रतिक्रिया

नागपंचमीच्या निमित्ताने

लेखक बज्जु यांनी शुक्रवार, 13/08/2010 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
नागपंचमी:- प्रतीवर्षी श्रावण शुक्ल ५ ला ही पूजा करायची पध्द्त आहे. नागाची मातीची मूर्ति किंवा घरातील देवपूजेच्या खोलीतील बाहेरच्या भिंतीवर काही भाग गोमयाने-शेणाने सारवून त्यावर पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची आकॄती काढून ही पुजा करतात. त्याचप्रमाणे एखाद्या पाटावर पाच किंवा नऊ फ़ण्यांच्या नागांची आकॄती काढून पुजा करण्याचीही पुष्कळ घराण्यात पद्धत आहे. नवनाग देवता किंवा अनंतादिनागदेवता असे या देवतेचे नाव आहे.

दोन मिनिट... :-)

लेखक मनि२७ यांनी बुधवार, 11/08/2010 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
अमित, मी पंडित काकुंकडे चालली आहे. दोन मिनिटात येत्ये! तेवढ्यात दूध वर आले तर गॅस बंद कर!" असे सांगून आई गप्पा मारायला गेली, तिचा दोन तास झाले तरी पत्ता नाही. आमच्याकडे हे असे नेहमी घडते. आईचे दोन मिनीट कधी संपतच नाहीत. "केवढा वेळ लागला तुला!" ती परत आल्यावर मी नाराजीने म्हणालो. "अरे त्याना लग्नात मिळालेल्या साड्या दाखवत बसल्या त्या. बराच वेळ गेला त्यात". एकूण आपल्या लोकाना वेळेची काही किम्मत नाही. मी व्यथीत झालो. आपला देश कधी सुधारणार? छे! दोन मिनिटे म्हणे! मराठीत "दोन मिनिटे" हे नुसते दोन शब्द नसून तो एक वक्प्रचार आहे. ह्याचा अर्थ "मला कितीही वेळ लागू शकतो" असा समजावा.

पुस्तक परिक्षण: "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" आणि त्या पुस्तकाच्या पुढच्या मालिका..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 04/08/2010 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" चे मराठी भाषांतर विकत घेतले आणि आताच वाचून संपवले. (संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली) हे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत रॉबिन शर्मा. दक्षिण अमेरिकेतील "शर्मा लिडरशीप इंटरनॅशनल " चे चालक, मालक, संस्थापक. त्यांची व्याख्याने जगभर होतात-व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे धडे याबद्दल. आणखी माहिती रॉबिनशर्मा डॉट कॉम वर वर मिळेलच. या लेखाचा मूळ उद्देश्य म्हणजे या पुस्तकाबद्दल मला आलेले अनुभव- बाजारात व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे तसे अनेक पुस्तके येतच असतात.

विरासत

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 03/08/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आज माझी लिहायची पहिलीच वेळ आहे .तरी चू.भू.द्या.घ्या.मी इथे स्पिक मैके(Society for Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) बद्दल लिहितो आहे.स्पिक मैके हि भारतीय कला लोकां पर्यन्त पोहोचवण्या साठी काम करणारी (non pofit)संस्था आहे .या उपक्रमा अंतर्गत आम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली;आणि काही orientation workshop(e.g.

..मैत्र...

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी रविवार, 01/08/2010 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
............ ते कोण आहेत माझे ?............ काय नातं आहे त्यांच्यात आणि माझ्यात?.......रक्ताचं तर नाहीच नाही....पण बाकी?..... काका ....मामा .... खरं सांगू? मला तर आज हे लिहिताना सुद्धा समजत नाहीये कि त्यांना काय नाव देऊ !..... "दीपक भा"..... त्याना ओळखणारे सगळेजण त्यांना याच नावाने ओळखत ....मीही तेच म्हणते.... ..... कधी कधी टिपूर चांदण पडतं ..... रात्रीच्या जेवणा नंतर सहज चांदण्यात थोडसं फिरून यावसं वाटत..... बाहेर पडते .... कोपऱ्यापर्यंत जाता जाता सवयीप्रमाणे आकाशाकडे नजर जाते..... चंद्रकोर अतिशय मोहक दिसत असते... मधेच एखादा हलकासा ढग तिच्यावरून हळूच सरकत सरकत निघून जातो...

जाये तो जाये कहां

लेखक संतोषएकांडे यांनी रविवार, 01/08/2010 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो. पूर्वी दहा बारा वेळा गेलोय, तरी दिल्ली तशी माझ्या साठी नविनच. तिथे असलेल्या गुजराथ भुवन किंवा महाराष्ट्र भुवनच्या स्वस्त आणी मस्त अ‍ॅकोमोडेशनल फॅसीलीटीज मी आधीच यूज केल्या असल्यामूळे अ‍ॅकोमोडेशनची काळजी नव्हती.सकाळी साडेदहाच्या सुमारास स्टेशनावरुन मी सरळ गुजराथ भुवनला पोहोचलो. नव्या नियमा प्रमाणे माझ्या सरकारी आईकार्डाची झॅरोक्स घेवून मी काउंटरवर लाइनीत उभा राहीलो. अर्ध्या तासानी नंबर आला.रीसेप्शनीस्टनी रजीस्टर माझ्यापूढे केले.

ध्वनी - गॅरे कैझर या लेखकाच्या दृष्टीकोनातून

लेखक शुचि यांनी गुरुवार, 08/07/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल फिरायला जाताना मी आणि नवरा इकडच्या तिकडच्या विषयांवरच्या गप्पा मारत होतो. सहज विषय निघाला "कोबेअर रिपोर्ट" शो चा. मध्यंतरी व्हरमाँट चा एक लेखक या शो मधे येऊन गेला. या लेखकाचं नाव "गॅरे कैझर". त्यानी या शो मधे काही नावीन्यपूर्ण विचार मांडले होते - ध्वनी या विषयावर. या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे "द अन्वाँन्टेड साऊंड ऑफ एव्ह्रीथिंग वी वाँट" घरी जाऊन मी मी जालावर त्याचे विचार वाचले आणि पुढील काही रोचक गोष्टी सापडल्या. त्या या लेखाकाच्या शब्दात- "उपासमार, महायुद्ध, पृथ्वीचे सातत्याने वाढणारे तापमान आदि समस्यांशी तुलना केली तर ध्वनी ही अजीबात समस्या वाटत नाही.

ससा, सुसर आणि ससाणा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक मिपाप निती कथा. पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते. हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात. जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी.

||ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल||

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल आधूनिक मिपाप निती कथा एकदा एक ससा रानातील हिरव्या गार गवतावर उड्या मारत खेळत होता. रानफ़ुलांच्या गंधानी थोडे जास्तच मोहित होऊन त्याने एक टुणकन उंच उडी मारली. त्या उडीने नेमके तिथले एक मधमाशांचे मोहोळ उठले. त्यातल्या मधमाशा ह्या बेफ़ाम उडीने दंग होऊन “ सुटल्या ”. त्यातल्या काहींनी सशाच्या कानाभोवती गुणगुणून त्याला गुदगुल्या केल्या. सशाची जरा करमणूक झाली. ते स्मित विरते न विरते तोच सशाला असे वाटले की एखाद-दोन माशांनी त्याला दंश देखील केला की काय. कदाचित खेळात असे अभावितपणे झाले देखील असेल.