Skip to main content

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नवस - लघुकथा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 04/09/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
होडी तशी बारीकचं होती. नदीसारखीच. पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता. हातात मटणाचा प्रसाद होता. आभाळात घारी सावज शोधण्यात भटकत होत्या. बारकी पोरं त्यांचाकडं बघण्यातच दंग होती. ईवलूशी होडी पण वस्ताद कस लावुन वल्हत होता. संथ संथ होडी काठाला लागली. देवळात भक्तगणांची गर्दी होती. मऊशार वाळुतनं वाट काढत नाना देवळात शिरला. मंदाक्कापण सोबतीला होती. आज नानानं बोकड कापलं होतं. म्हसोबाला. कुणी त्याला खंडोबा पण म्हणायचं. आख्खी वाडी आली होती. दुरदूरची नातीगोतीही जमलेली. दिगंबर सोडून. पोरीचं लगीन जमाव म्हणुन मंदाक्कानं नवस केलता.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

भिंगार्‍या

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 27/08/2015 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारायला आलं होतं. लंगडा भिंगार्‍या वैरण घेउन आला. आण्णा नांगरटीला गेला होता . मंजु भाकर्‍या थापत होती . लंगडा भिंगार्‍यानं वैरण कापून गुरांना टाकली . पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती . वैरण टाकून भिंगार्‍या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला . दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला. मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं. त्यानं ते पडवीत बसून खाल्लं. भिंगार्‍या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.

लोणीभक्ती आणि पराठे

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी मंगळवार, 25/08/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः मातृभक्ती आणि मराठे या देहाची लोणीभक्ती, लोणीप्रेम वादातीत आहे. लोणी देवो चवः, लोणी देवो सवः, पराठे देवो भवः असे म्हणतानाच पराठ्याबरोबरच्या लोण्याच्या चवीचे महत्त्व सुभाषितकाराने सांगीतलेलं आहे. लोण्याचा सुवर्णकाळ, शतके ज्यांनी लोकांच्या पोटावर राज्य केलं असे 'अमुल' त्यांची ती अमुलकन्या सुरभी, आपल्या पराठ्यावर चापुन लोणी लावत असे. लोणीप्रेमावतंस पराठापती *** पराठावाले. ह्यांच्या बालपणापासुनचं प्रत्येक पराठ्यांवर त्यांच्या पाकसम्राज्ञी आईसाहेबांचा प्रभाव आढळतो.

[शतशब्दकथास्पर्धा] भेट भाग २

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 24/08/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
[शतशब्दकथास्पर्धा] भेट चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरतच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती. पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली. ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?” त्यालाही ओळख वाढवायचीच होती.

मटण

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 19/08/2015 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य मावळतीकडं आला होता . ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो . पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले . तेवढ्यात मागून पक्या आला. पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला . रात्री चांदीच. निघालो दोघे . खमंग वासान डोकं चवताळतय. पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय. दम निघना. देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली . मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता .

भाषेरी कुंपण

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 10/08/2015 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
लेख दुसरा... हा एक प्रयोग आहे... माहित नाही किती जणांना कनेक्ट होऊ शकेन... प्रतिक्रियांची वाट पाहत आहे... ........भाषेरी कुंपण......... आता मी हळू हळू लिहायला घेतोय. माझ्या नेहमीच्या टेबलवर -नाही- खुर्चीवर बसून. -बसलोय. पेन वही समोर ठेऊन. -ठेवलीय. आता हळू हळू हे आर्टीकल लिहिता लिहिता मी स्वत:च्या सबकॉन्शियस मधे अलगद$$ प्रवेश करेन. -केलाय. मी आज भाषेशी खुप भारदस्त प्रयोग करणार आहे. -करतोय. माझ्या -'इथल्या!' सबकॉन्शियस मधे वडलांना आणणार आहे. -आनलंयही. अन वडलांच्या 'गावच्या' सबकॉन्शियस मधे मी जाणार आहे. -गेलोयही. (मला भाषा हवी तशी वळवता येईल काय?? 'हा' तो प्रयोग. मी यशस्वी होईल??

पर्वतावरील पुनर्जन्म- “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा अल्पपरिचय

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 09/08/2015 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
“बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा हा अल्पपरिचय: पर्वतावरील पुनर्जन्म पुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या मनीषचंद्र पांडे लिखित आणि पेंग्विन बुक्सतर्फे प्रकाशित मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रभाकर करंदीकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद “फिरुनी नवी जन्मले मी”, नुकताच प्रफुल्लता प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केलेला आहे.