Skip to main content

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

चिमणी आणि कारटं (लघुत्तम कथा)

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 14/09/2015 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
भुरभुर चिमणी बाळाच्या हातावर जाऊन बसली. बाळराजे खुश झाले. भुरभुर चिमणीला टकामका बघत राहीले.तान्हुला हात पुढे करून तिला पकडायला लागले. चिमणी भुर्रकन आकाशी ऊडाली. बाळराजे बघतच राहीले.बोबडया बोलांनी च्युव च्युव करत तिला परत बोलवु लागले. चिमणी झाडाच्या फांदीवर बसली. तिथुनच बाळराजेंना न्याहाळु लागली. मधुनच उडायची, वळचणीला फिरायची. बाळराजे दुडुदुडु धावले. चिमणीला पकडायचा पण करून राहिले. चविष्ट अमिषं दाखवुन तिला फशी पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण चिमणी बधली नाही. बाळराजेंच्या कचाट्यात सापडली नाही. बाळराजे उदास झाले. तोंड पाडून गपगार बसले. चविष्ट खाऊकडं बघेनासे झाले.

शिंदळ : आक्रमकांची नवी फळी

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 13/09/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
( १.यल्लम्माच्या आवारातल्या कथा आता 'शिंदळ' याच नावानं टंकत जाईन, प्रत्येक कथा स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न असेल, अर्थात वाचकांना आवडले तरचं, उगाच मिपाची बँडविड्थ खर्ची नको- आभार २. केवळ एक पार्श्वभुमी म्हणुन 'शिंदळ' ही कथा वाचा. www.misalpav.com/node/32762 ) शिंदळ : आक्रमकांची नवी फळी यल्लम्माचं देऊळ गर्द अंधारात उभं होतं. देवळाच्या चहुबाजुंनी प्रदक्षिणेसाठी कठडा होता. देवळासारखाच लहान. त्यावरच दत्ता पहुडला होता. देवीची ओवाळणी लुटणारे इतर लहानगे चोर कधीच घरी परतले होते.

शिंदळ

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 11/09/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
यल्लमाच्या पायऱ्यावर सुनी संध्याकाळपर्यंत बसुन होती. दिवसभर देवळात भक्तांची रेलचेल होती. त्यांनी देवीपुढं ठेवलेले पुरणपोळी, शिकरण, नैवैद्य तिनं एका आडबाजुला साठवले होते. आज दिवसभरं ती तेच खात होती. अंधारायला आल्यावर सगळा प्रसाद फडक्यात बांधुन घराकडे चालु लागली. यलम्माच देऊळ अगदीच लहान, एकाच खोलीचं. पण इथे गुरव नव्हता म्हणुन सुनीनं बस्तानं बसवलेलं. गुरवं सगळी तिकडे मोठ्या देवळाकडं, तिकडं ती कधीच जायची नाही. नैवैद्य चोरणाऱ्या गावातल्या पोराठोरांना गुरवं हुसकावुन लावायची. पण या 'मोठया' देवळाकडं जाणारा प्रत्येक भक्त यल्लम्माकडं यायचाच, एखादातरी नैवैद्य आणि थोडीफार चिल्लर देवीला ओवाळायचा. देवीची ह

हैलो, ह्यलो.....

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 10/09/2015 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
१. "हैलो, रामराम ,काय चाललय?" "रामराम, काय नाय बरायं की" "जेवन झालं का?" "न्हाय अजुन, सैपाक हुतुय" "कदी आला कामावरनं?" "हि काय आत्ताच यीवुन बसलुयं" "काय म्हणतयं पौसपाणी" "चिरचिर हाय चालु, तिकडं कसायं?" "न्हाय काय, पाऊस न्हाय, कीळीचं अवघडायं, बोरचं* पण पानी आटलयं" "व्हय, यील की कुठं जातुयं?, आजुन दोन म्हैन हाईत." "कसला यीतुयन काय....

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

लोकमान्य टिळकांचे अग्रलेख विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 08/09/2015 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिस्रोत प्रकल्पात टिळकांचे केसरीतील लेख भाग ४ संकीर्ण लेख संग्रह (सामाजिक धार्मिक वाङमय विषयक) ग्रंथ उपलब्ध केला आहे. या ग्रंथाची पाने वाचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

सकाळ - त्यांच्या नजरेतुन

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 07/09/2015 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
(थोडा वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न करतोय, गोड मानुन घ्या. चु.भु.द्या.घ्या) ललित- सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली. नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले. किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती. ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती. टक्क जागा झालो. ग्राम्य- रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं. उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं. मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.

"येडाय का तु?"

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/09/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली. हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला. तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला. कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला. कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन. पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या.