Skip to main content

प्रतिभा

कन्नडा हाडु

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 28/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!) आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण. पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे.

हुकलेली संधी

लेखक धोंडोपंत यांनी बुधवार, 28/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
माध्यान्हीची वेळ | जराशी निवांत | लाभतो एकांत | घरामध्ये || झाली सामसूम | आटोपता काम | करिती आराम | सारेजण || खळ्यामध्ये बैल | करिती रवंथ | बसुनी निवांत | झाडाखाली || गडीमाणसेही | खावया भाकरी | गेली त्यांच्या घरी | नुकतीच || दळ्णकांडणी | पडलासे खंड | सारे काही थंड | अंगणात || चिमण्याही गेल्या | आपुल्या खोप्यात | राघू पिंजर्‍यात | विसावला || मंदसा तेवतो | देव्हार्‍यात दीप | म्हातारीचा जप | चालू असे || पाणी द्यावयाचे | करून निमित्त | नार गेली आत | खोलीमध्ये || आयन्यात बाई | पाहे पुन्हा पुन्हा | गालावरी खुणा | रात्रीच्या त्या || आठवता सारे | दूर झाली लाज | चमकली वीज | देहामध्ये || प्रीत
Taxonomy upgrade extras

पांढरपेशी कविता

लेखक ॐकार यांनी रविवार, 25/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

वेड हे रक्तात माझ्या...

लेखक अशोक गोडबोले यांनी मंगळवार, 20/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
वेड हे रक्तात माझ्या वादळाशी झुंजण्याचे जे किनार्‍याचेच प्रेमी वेगळे सगळेच त्यांचे पेटले वणवे विखारी ज्यात मी झोकून देई वाचवाया कातडी ना, कौल मिळती काळजाचे होऊ दे उध्वस्त आयू, होऊ दे जखमी जटायू घ्येयपथि हे घातलेले गालिचे ही कंटकांचे जो लढे लोकार्थ त्याला भुलविती ना शब्दलेणी दार मौनाचे खुणावी आतले हृदयांतरीचे नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

मी!

लेखक अशोक गोडबोले यांनी शनिवार, 17/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
ना शोधितो किनारा ना धुंडितो निवारा मी धुंद वादळाशी अविराम झुंजणारा चुंबावया नभाला झेपावतात लाटा उद्दाम कालियाचे शिर मीच ठेचणारा दर्या अथांग माझी टाकी गिळून नाव तेजाळ रत्नगुंफा तिमिरात शोधणारा आयाळ पिंजणारा झोंबे पिसाट वारा दुर्दम्य निश्चयाचे मी शीड रोवणारा धावून ये घनांची रणधुंद मत्त सेना मी नेत्र शंकराचा अंगार ओकणारा आभाळ फाडुनी ये बिजली कडाडणारी नी निग्रही ध्रुवाशी रणनाळ जोडणारा --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

नमोगत दिवाळी अंक आणि त्या अनुषंगाने...:)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 10/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय पंचायत समिती, सदर लेख हा केवळ माझ्या कल्पनेतला आणि स्वप्नरंजनातला आहे. कुणाही जिवंत वा मृत व्यक्तिशी अथवा संकेतस्थळाशी याचा संबंध नाही आणि तसे कुणाला आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा असे मी जाहीर करतो. त्याचप्रमाणे या लेखात काही कॉमन कोकणी शिव्या आहेत, त्याही पंचायत समितीची हरकत नसल्यास या लेखात राहू द्याव्यात अशी माझी आग्रहवजा विनम्र मागणी आहे!

एजीओजी

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 08/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.