"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)
राम राम मंडळी,
माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत.
मिसळपाव