बोका ए आझम ओंकार पत्कीची एक्झिट
मिसळपाववरच्या श्री गणेश लेखमालेतील लेखाच्या निमित्ताने पहिल्यांना व्यनिमध्ये भेटलास आणि कळलं, आपण एकमेकांपासून एक किलोमीटरहूनही कमी अंतरावर राहतोय. मग काय, आपण दुस-याच दिवशी शिवाजी पार्काजवळच्या गोल्डनमध्ये ऐन गणपती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गप्पा ठोकायला भेटलो. तेव्हाच कळलं की माझे आजोबा तुझ्या आईचे शिक्षक आणि तुझी आई नि माझी आत्या वर्गमैत्रीणी, आपलं मैत्रही तिथेच पक्क जुळलं.
मिसळपाव डाॅट काॅमच्या माध्यमातून जुळलेलं मैत्र पुढे गाढंच होत गेलं. रात्रं रात्रं चालणा-या चर्चा, वाद, गप्पा, तुझ्याकडच्या माहितीच्या खजिन्यामुळे कधीच कंटाळवाण्या झाल्या नाहीत.
मिसळपाव