Skip to main content

प्रकटन

उत्सव...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 31/10/2018 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आजही काहीच पत्ता लागला नाही. दोन दिवसांपासून घरात अक्षरश: सुतकी वातावरण होतं. मुलांच्या डोळ्यातील पाण्याला तर खळ नव्हता. धाकट्या मुलीने तर कालपासून काहीही खाल्लेदेखील नव्हते. तोदेखील विषण्ण होऊन घरात बसला होता. एवढा शोध घेऊनही सापडत नसल्याने स्वत:वरच चरफडत होता. भिंतीवरचा त्याचा फोटो पाहून तर त्याला रडूच कोसळले. ... तेवढ्यात फोन वाजला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोन कानाला लावला. ‘हॅलो, मी वृद्धाश्रमातून बोलतोय. तुम्ही दिलेली जाहिरात वाचली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तुमचा कुत्रा इथे आलाय. तुमच्या आईशी खेळतोय. लवकरात लवकर या आणि तुमच्या कुत्र्याला घरी घेऊन जा!’ फोन कट झाला.

फडणवीस बुलेटिन ९

लेखक साहना यांनी मंगळवार, 30/10/2018 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी एक चांगले काम केले आहे. ऑर्डीनन्स काढून APMC नावाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक असा कायदा बंद केला. ह्यामुळे दलाल लोकांचा माज कमी होईल आणि आपले शेतकरी बंधू आणखीन चार दिवस जगतील अशी अशा करण्यास हरकत नाही. आता रेइलायन्स, द मार्ट सारख्या कंपन्या थेट शेतकऱ्याकडून माल खरीदू शकतील. https://indianexpress.com/article/cities/pune/msp-agrarian-crisis-farme…

लुब्री

लेखक गीतांजली टिळक यांनी सोमवार, 29/10/2018 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हो... कुत्रीच होती ती. या घरात आम्ही रहायला आलो. यायच्या आधी मागच्या अंगणाला गेट करुन घेतलं. दिवसा बिल्डींगच्या पार्किंगच्या आवारात इकडून तिकडे पळणारं एक कुत्रं दिसायचं वरचेवर.. भटकं.. रहायला आल्यावर काही दिवसानी नवीन करुन घेतलेल्या गेटला लागून असलेल्या भिंतीवर, नुकत्याच दिलेल्या पांढर्‍या रंगावर मातीचे घासल्यासारखे डाग दिसू लागले. आणि ते वाढायला लागले. कशाने त्या अडचणीच्या जागेत असं होतय काही कळत नव्हतं. मग एके दिवशी दुपारच्या वामकुक्षीच्या शांत वेळी मी काही कारणाने स्वयंपाकघराचे दार उघडून मागे अंगणात गेले.

आई

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 21/10/2018 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची... अशा समाधीस्थितीत बराच वेळ जायचा. सूर्य डोंगराआड कलू लागला की पक्षी भानावर यायचे आणि नाखुशीनेच घरट्याची वाट धरायचे. वाराही मलूल होऊन शांत डुलकी घ्यायचा, आणि कधीतरी हा वादक भानावर यायचा... वाद्य नीट गुंडाळून उठून वाट धरायचा. ...

ब्राह्मणेतरांचे नेते मात्र ब्राह्मण

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 20/10/2018 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या राम आणि रावण यांच्या निमित्ताने निरनिराळे परस्पर विरोधी मुद्दे मांडले जात आहेत. ते ऐकताना सामान्य माणसाचा संभ्रम वाढतो आहे. रावण हा आदिवासींचा राजा होता त्यामुळे तो आमचा राजा आहे असे काही दलित संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रामाने त्याची हत्या केली हे योग्य केले नाही आणि म्हणूनच दरवर्षी रावण दहन हेही त्यांना पटत नाही. मरणान्तानि वैराणि असं स्वतः राम म्हटले असतील तर दरवर्षी हा वाद उकरून काढून रावणाला का जाळायचं.

टॅटू ...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 20/10/2018 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
टॅटू ! आॅपरेशन झालं. अगदी व्यवस्थित पार पडलं. शांत पहुडलेल्या त्या पेशंटकडे समाधानानं पाहात डाॅक्टरांनी मास्क काढला. ग्लव्हज काढून बिनमध्ये टाकले आणि बेसिनवर हात धुवून तोंडावर पाण्याचा सपकारा मारून ते तसेच ओटीमधल्या त्यांच्या आरामखुर्चीत बसले. ती त्यांची सवयच होती. नेहमीच आॅपरेशन पार पडलं की ते इथे बसायचे. तोवर बाकीचा स्टाफ आवराआवर करायचा आणि आरामखुर्चीतून डाॅक्टरांची नजर पेशंटवर खिळलेली असायची. आजची पेशंट वृद्ध असल्याने डाॅक्टरना थोडी काळजी वाटत होती.

सध्याची पत्रकारीता

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 16/10/2018 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी आमच्या एका मित्राने दहावीच्या मुलांसाठी करियर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली. मित्राने माध्यमांशी संपर्क साधला आणि सांगितले की आपण येऊन आमचा कार्यक्रम कव्हर करा. पण टीव्हीवाल्यांनी त्याबाबत उत्साह दाखवला नाही. त्यांचे म्हणणे, अशा कार्यक्रमांमधे कुठलाही व्हिज्युअल कंटेंट मिळत नाही. म्हणजेच कॅमेराने टिपावे अशी कुठली गोष्ट सापडत नाही.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

पराजय नव्हे, विजय!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/10/2018 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा... तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं. लांजा राजापूर संगमेश्वर तालुका विकास मंडळ नावाची एक संस्था गेल्या सुमारे पाव शतकापासून मुंबईत काम करते.