टैम्पास
भर दुपारी उन्हाच्या झळया खात एकाच लाइनीत जवळ्जवळ आम्हि ६ जनी बसलो होतो . गावाला एकतर बसण्याची सोय नसते . रस्त्याच्या कडेला येणार्या जाणार्यांकडे बघत बसावच लागतं . पर्याय नसतो . माझ्या शेजारी माझी वहिनी तिच्या बाजुला काकु आणि तिच्या शेजारी तिचीच मावस बहिन . तिने तर दर दोन मिनिटाला पूढे सरकुन सरकुन पार रस्ता गाठत आणला , तरी आम्हि त्याच जागी . अवघडुन गेलो होतो पार , पण काकु काहि केल्या जागची हलेना , एकाच जागी बसुन ढिगारेच्या ढिगारे बनवले तिने . समोर शाडुची माती होती ना , मग काय बसल्या बसल्या टाइमपासच कि .
आजुबाजुला आतापर्यंत भयाण गर्दी झालेली . उन्हामुळे पोटात कालवाकालव झाली होती .
मिसळपाव