Skip to main content

प्रकटन

मुंज

लेखक प्रभो यांनी बुधवार, 21/04/2010 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात एक पत्रिका आली घरी. गुल्ट्या रूमीला मराठी वाचता येत नसल्याने कोणाच्यातरी लग्नाची पत्रिका वाटली त्याला. मी घरी आलो तर बोंबलत विचारलं..'किसका शादी है? इनव्हिटेशन आया है.' त्याच्याकडून पत्रिका घेऊन पाहिली तर ताईने पाठवलेली. राहुलच्या मुंजीची. पत्रिका वाचताना मन हळूच मगे गेलं ...१९९३ मधे. मुलगा आठ वर्षाचा झाला की मुंज करायची असा आमच्या घरचा रिवाज. आजोबा लवकर वारल्याने वडिलांची मुंज खुपच उशिरा झालेली. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की आपल्या मुलाची मुंज एकदम धुमधडाक्यात करायची. माझी तिसरीची परिक्षा संपली आणी सगळ्यांनाच वेध लागले मुंजीचे.

निवेदन...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/04/2010 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मायबापहो, गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्‍याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते. दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो. यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे.

सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........ भागः१

लेखक भानस यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
बस दादरला पोहोचली तसे नेहमीप्रमाणे शमेचे लक्ष खोदादाद सर्कलकडे गेले. ओव्हरब्रीज, प्रचंड वाढलेला...... आवरेनासा झालेला ट्रॅफिक अन त्यात केविलवाणे झालेले, आहे का नाही असा प्रश्नच पडावा असे भासणारे खोदादाद सर्कल. एके काळी काय शान होती, किती मोठे वाटायचे सर्कल आणि आंबेडकर रोड क्रॉस करायचा म्हणजे भीतीच वाटायची. अगदी शाळेपासून मग कॉलेज - पुढे नोकरी..... आणि आपल्या गोड आठवणीही याच्या आसपासच गुंतलेल्या........ पाहता पाहता बसने किंग्जसर्कल गाठले अन त्या चिरपरीचीत फालुदाची तीव्रतेने आठवण आली. न चुकता प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपली की बाबा सगळ्यांना नको नको होईल इतका फालुदा खाऊ घालत.

द नवाब ऑफ नजफ़गढ़!

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 15/04/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
"वीरेंदर सेहवाग सलग दुसर्‍या वर्षी 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा मानकरी!" पेपरात हा मथळा वाचला आणि का कोण जाणे मन तडक मेलबर्नला पोहोचलं. १९५ धावांची केवळ अप्रतिम अशी खेळी खेळून षटकारानं द्विशतक पूर्ण करण्याच्या हौसेपायी सायमन कॅटीच या एका टुकार पार्ट टाईम बॉलरच्या एका अतिटुकार चेंडूवर डीप मिडविकेटला ब्रॅकनच्या हाती एक साधासोपा कॅच देऊन बाद होणारा वीरू आठवला. आपले द्विशतक हुकले याचं खचितही दु:ख नव्हतं महाराजांच्या चेहर्‍यावर. पण आपल्या त्या एका सामान्य फटक्यामुळे भारताने सामना गमावला (आणि कदाचित ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात मालिकाविजयाची सुवर्णसंधीही!) याचं शल्य बोचत होतं त्याला.

लिनक्स उबंटू (ubantu) मिळावा मोफत..

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 15/04/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
https://shipit.ubuntu.com/ ह्या साईट वर आपले नाव, पत्ता आदी details द्यावेत, सुमारे १० आठवड्यांत आपण निवडलेल्या पर्यायानुसार सीडी घरपोच होते. (आपल्या सर्वांच्या माहिती साठी सविनय सादर)

लघुपट महोत्सव

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 15/04/2010 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
लघुपट महोत्सव पुण्यात फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऒफ इंडिया तथा एफ टी आय आय ही एक नावाजलेली संस्था आहे. तिथे १० व ११ एप्रिल २०१० ला मानवी विकास या विषयावरील विविध प्रादेशिक लघुपट दाखवण्यात आले.निमित्त होते ते संस्थेच्या गोल्डन ज्युबिली वर्षाचे. दोन दिवसात त्यांनी २६ लघुपट दाखवले. हे लघुपट संस्थेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेले होते. या महोत्सवाच्या उपक्रमाचे समन्वयक होते मिलिंद दामले. अशा ठिकाणी मराठी नाव असल कि जरा बरच वाटत.लघुपटातुन मानवी विकासाच्या टप्प्यातील वेगवे्ळ्या सामाजिक समस्या व त्याची हाताळणी दाखवलेली गेली.

दीन दयालु रामा : येशुदास व गायत्री

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 14/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
रामाच्या नावासरशी त्याच्याविषयीची अनेक गाणी, अनेक कथा, त्याची अनेक रूपे नजरेसमोर येतात. प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचे निमित्त करून अनेक चित्रपटकारांनी आपल्या चित्रपटाच्या कथानकात अप्रत्यक्षपणे रामाचा आदर्श ठेवून, किंवा त्याला पूजनीय मानून त्याप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करणारे नायक दाखवले. त्या प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचं, कौटुंबिक सौहार्दाचं, केरळच्या नयनरम्य हिरव्यागार निसर्गाचं दर्शन घडवणारं हे अजून एक गाणं..... येशूदास व गायत्री अशोकन् यांनी गायलेलं....रवींद्रन् यांनी स्वरबध्द केलेलं.... मामुट्टी ह्या समर्थ अभिनेत्यावर चित्रित केलेलं......

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.