Skip to main content

माझिया प्रियाला प्रीत कळेना

माझिया प्रियाला प्रीत कळेना

Published on 25/06/2011 - 17:03 प्रकाशित मुखपृष्ठ
तुझी नी माझी भेट ही क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे सांगु कशा मी, तुल सख्या रे माझ्या ह्या भावना माझिया प्रियाला प्रीत कळेना! खरं सांगु तर हे गाणं तीने खास त्याच्यासाठीच म्हंटलं असणार. दोन अगदी वेगळ्या स्वभावाची माणसं लग्न होऊन एकत्र आली ना की हेच म्हणावं लागतं ना! आता हेच बघा ना! ती अगदी हळवी, इमोशनल आणि तो एकदम प्रॅक्टिकल आणि रो़खठोक. ती तिच्याच सुंदर स्वप्नवत जगात जगणारी आणि तो मात्र त्याचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणारा. अगदी टिपीकल दाखवण्याचा कार्यक्रम होउन ठरलेले लग्न.पहिल्याच नजरेत तिला तो खूप आवडला. लग्न ठरलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मैत्रिणींचे फोन आले कि ती नेहेमी सांगायची की " आमचं ना, अरेंज्ड कम लव्ह मॅरेज आहे" म्हणून. पण तो मात्र अगदीच नॉर्मल होता. कुणी लग्नाबद्दल विचारलं तर सांगायचा " घरातल्या सगळ्यांनी पसंत केलीये. मलाही आवडली." लग्न ठरवताना दोघं एकमेकांना अनुरूप आहेत की नाहीत ते बघतात. पण दोघांच्या आवडीनिवडी, मतं, सवयी, राहणीमान आणि हो, महत्वाचं म्हण्जे स्वभाव हे जर अगदी भिन्न असतील तर.............. तर हे दोघंही लग्नाआधी एकत्र फिरायला बाहेर जाणार होते. फिरायला कसलं, असंच एखाद्या हॉटेलमधे जाउ असं एकमत (?) झालं. ठरल्याप्रमाणे दोघंही भेटले. तिला वाटलं, हा आता आपल्याला एखाद्या छानशा हॉटेलमधे नेईल. आसपास जास्त वर्दळ नसेल. फक्त तो आणि ती. त्याने हळूच तिचा हात हातात घ्यावा. तिच्या नजरेचा ठाव घ्यावा. "आज खूप छान दिसते आहेस." अशी एक कॉम्प्लीमेंट द्यावी. असं स्वप्नरंजन चालू असताना चालता चालता तिला ठेच लागते. तो : अगं नीट चाल, नीट चाल जरा. लक्षं कुठाय तुझं? ती भानावर येते. दोघंही समोरच्या एका हॉटेलात जातात. हॉटेल पण एकदम साधंसंच. तो समोर बसलेला असतो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो. आता हॉटेलमधे आलोच आहोत तर तु खा काहितरी, असं म्हणतो. तिच्या चेहेर्यावर आश्चर्य, राग, सर्व मिश्र भावना. ती विचारते, " तू काहिच खाणार नाहीस?" तो म्हणतो, " नाही, मी बाहेर जास्त काही खात नाही." मग ती मात्र मागवलेला बिचारा उतप्पा एकटीच खात बसते. मनातली स्वप्नं फक्त स्वप्नंच बनून राहतात. खूप राग येतो तिला स्वतः चा. तिला थेट कॉलेजमधले दिवस आठवतात. सर्व मित्रमैत्रीणीबरोबर हॉटेलमधे जाणे, त्यातल्या कपल्सची चालणारी मस्करी, तेव्हा तिला वाटायचं आपलं लग्न ठरलं की आपल्याही आयुष्यात असे क्षण येतील. तेव्हापासून जपून ठेवलेलं स्वप्न आता तिच्या स्वप्नांचा राजकुमार भेटल्यावरही पूर्ण होत नाही. ऊन्हाने तापलेली जमीन जशी पावसाच्या पहिल्या सरींनी सुगंधित होते, तशी बी. एम. सी. चा नळ फुटल्यावर थोडीच होते? तिला हवा असतो तिच्या मनातलं जाणणारा, तिची साथ देणारा साथीदार, अन त्याला हवी असते गृहकर्तव्यदक्ष, मनमिळावू बायको. लग्नानंतर, एक दिवस जेव्हा तो रात्री कामावरून निघताना तिला फोन करतो. दिवस बुधवारचा. तो: " आज काय मच्छी आहे घरी?" ती पटकन कीचनमधे येते. पॅनमधले मासे बघते. तिला काय ते ओळखता येत नाहीत. ती: " एक मिनीट, आईंना विचारून सांगते." तो : अगं बघ नीट. गोल्ड्फीश असेल, नाहीतर डिस्कस असेल, नाहीतर फायटर फीश असेल. ती खूद्कन हसते. कधीच मासे न खाणारी ती, त्याच्यासारख्या अट्टल मासे खाणार्याबरोबर संसार करेल तर असंच होणार ना! आता मात्र चित्रं थोडंसं बदलेलं आहे. त्या दोघांच्या विश्वात एक कन्यारत्न आलंय. पण वाद मात्र कायम आहे. तो : हिचं नाक एकदम चपटं आहे, अगदि तुझ्यासारखं. ती : असू दे. मी तिला माझ्यासारखंच बनवणार आहे. तो: नाही हं. दिसायला तुझ्यासारखी असली म्हणून काय झालं? तिला मी माझ्यासारखंच बनवणार. म्हणूनच ती नेहेमी म्हणते " माझिया प्रियाला प्रीत कळेना"

याद्या 5189
प्रतिक्रिया 19

मस्तच.बर्‍याच बायकांची हीच बोंब असते. नवरा समजून घेत नाही म्हणून.

In reply to by चिरोटा

बर्‍याच बायकांची हीच बोंब असते. इथे 'बोंब' हा शब्द अंमळ मजेशीर वाटला..... 'सलज्ज कुजबूज' असं तरी म्हणा!! :) बाकी लेख सामान्य (फालतू असं म्हणायचं होतं, पण "नव्या सभासदांना प्रोत्साहन द्या!!!!" असं मालकांचं आवाहन आहे, म्हणून!!!!) वाटला. माझ्या मते जे रोमॅन्टिक वगैरे असतात ते प्रेमासाठी स्वतःचा जोडीदार स्वतः शोधतात, त्यासाठी कोणतंही साहस करण्यास, प्रसंगी धोका पत्करण्यास तयार असतात..... "ठरवून" लग्न करायचं आणि नवरा/बायको रोमॅन्टिक का नाही म्हणून रडायचं यात काही अर्थ नाही..... मुलीने ठरवून लग्न करतांना प्रेम सोडून बाकीच्या गोष्टी पाहिल्या, कदाचित त्याचं शिक्षण, नोकरी/धंदा, उत्पन्न इत्यादि.... ते सगळं असलेल्या त्यानेही मग काही गोष्टी पाहिल्या, कदचित तिचं सौंदर्य, सौष्ठव, स्मार्टनेस इत्यादि.... फिट्टंफाट!!! :) असो.... पुढील लेखनासाठी शुभेच्छा...

In reply to by पिवळा डांबिस

डांबिस काकांशी सहमत. नव्या सदस्याचे स्वागत. (गोष्ट/कथा अगदीच सरळ आणि काहीच न घडणारी वाटली) . . . . . . . काळा खवीस

''उन्हान तापलेली जमिन जशी पावसाच्या पहिल्या सरींनी सुगंधित होते,तशी बि.एम.सी.चा नळ फुटल्यावर थोडीच होते?''.........हाय हाय हाय....+१०००००००......काय कल्पना आहे राव....छ्या, घायाळ झालो आपण....

चिरोटा आणि परागशी सहमत. छान लिहिलेत.पुलेशु.

''"ठरवून" लग्न करायचं आणि नवरा/बायको रोमॅन्टिक का नाही म्हणून रडायचं यात काही अर्थ नाही..... मुलीने ठरवून लग्न करतांना प्रेम सोडून बाकीच्या गोष्टी पाहिल्या, कदाचित त्याचं शिक्षण, नोकरी/धंदा, उत्पन्न इत्यादि.... ते सगळं असलेल्या त्यानेही मग काही गोष्टी पाहिल्या, कदचित तिचं सौंदर्य, सौष्ठव, स्मार्टनेस इत्यादि.... फिट्टंफाट!!!'' + १००० टु पिडां. काहिही करताना काय करत आहोत आणि का करत आहोत याचि प्रामाणिक जाणीव ठेवली ना की असले गैरसमजुतीचे प्रकार घडत नाहीत.

उपरोल्लेखित मालिकेतील मुख्य पात्रांच्या गगनचुंबी अभिनयक्षमतेबद्दल चकार शब्द न लिहिल्यामुळे आपला जाहिर निषेध!!! भारी समर्थ

गेली २ वर्षे मिपाची नियमीत वाचक आहे. मी कथा साधीशीच लिहली होती कारण मला ती कुठेही भडक वाटणारी नको होती. नायिकेने कुठेही तक्रारीचा सूर दाखवलेला नाहीये. लग्नाआधीचा एक प्रसंग, लग्नानंतर्चा एक प्रसंग आणि मुलगी झाल्यानंतरचा एक प्रसंग अशा साध्या वळणाने जाणारी ही कथा आहे. अशातुनही सुखी संसार करणारी नायिका दाखवलेली आहे. बाकी ठरवून लग्न करणारे रोमँटीक नसतात, असे काही प्रतिसादकांना सुचवायचे आहे असे दिसते. चांगल्या, वाईट अशा सगळ्याच प्रतिसादांचे स्वागत!! अवांतर : टारझनचा आयडी ब्लॉक आहे असे वाटते. टारझनच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत, मग तो चांगला, वाईट, मजेशीर कसाही असला तरी. मीच मधुरा

गेली २ वर्षे मिपाची नियमीत वाचक आहे. मी कथा साधीशीच लिहली होती कारण मला ती कुठेही भडक वाटणारी नको होती. नायिकेने कुठेही तक्रारीचा सूर दाखवलेला नाहीये. लग्नाआधीचा एक प्रसंग, लग्नानंतर्चा एक प्रसंग आणि मुलगी झाल्यानंतरचा एक प्रसंग अशा साध्या वळणाने जाणारी ही कथा आहे. अशातुनही सुखी संसार करणारी नायिका दाखवलेली आहे. बाकी ठरवून लग्न करणारे रोमँटीक नसतात, असे काही प्रतिसादकांना सुचवायचे आहे असे दिसते. चांगल्या, वाईट अशा सगळ्याच प्रतिसादांचे स्वागत!! अवांतर : टारझनचा आयडी ब्लॉक आहे असे वाटते. टारझनच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत, मग तो चांगला, वाईट, मजेशीर कसाही असला तरी. मीच मधुरा

In reply to by michmadhura

लेखापेक्षा प्रतिसादासाठी घेतलेले कष्ट जाणवले. दोन वर्ष थांबलाच होतात तर अजुन एखाद वर्ष थांबायला हरकत नव्हती असे वाटून गेले. नीच परुरा

In reply to by परिकथेतील राजकुमार

हीच ती एकमेकांचे पाय खेचण्याची मराठी वॄत्ती. :) नविन आयडींना लिखाणासाठी प्रोत्साहन द्यावे हा दंडक विसरलात काय ?

In reply to by अप्पा जोगळेकर

नविन आयडींना लिखाणासाठी प्रोत्साहन द्यावे हा दंडक विसरलात काय ?
कसे आहे ना जोगळेकर आम्ही जेंडर न बघता आणि माणूस मराठी आहे का नाही हे बघता प्रामाणिक प्रतिक्रिया देतो.

ऊन्हाने तापलेली जमीन जशी पावसाच्या पहिल्या सरींनी सुगंधित होते, तशी बी. एम. सी. चा नळ फुटल्यावर थोडीच होते? ते आवडीनिवडीवर अवलंबुन आहे तसे. बर्‍याचजणींना नळ फुटल्यावर येतो तो सुगंधही आवडतोच की

In reply to by मृत्युन्जय

काही जणांना विहिरीचे पाणी आवडते, हे उल्लेखायला विसरलात का हो ???? किंवा काही गावात/शहरात नळाच्या पाण्याची सोयच नसते, त्यांना आडाचे-पोहर्‍याचे, तलावाचे पाणी प्यावेच लागते की नाही? अवांतर : येथील सर्वांच्या आवडीनिवडी काय आहेत हे जाणुन घ्यायला आवडेल...