फलश्रुती
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सतत मिळणार्या प्रोत्साहनामुळे हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिडीया अर्थात टेलीव्हीजन वर झी टि.व्ही. मराठीच्या डब्बा गुल या कार्यक्रमातुन पदार्पण केलं आहे. अद्याप जास्त प्रगती नसली तरी एव्हाना तीन स्किट प्रक्षेपीत झालेली आहेत. त्यांची लिंक देतोय अर्थातच श्रेय तुम्हा आश्रयदात्यांनाच जाते.
http://www.youtube.com/watch?v=AC8bK97iJfE
http://www.youtube.com/watch?v=qCng2uUD_go&feature=relmfu
पुन्हा एकदा धन्यवाद :)
मिसळपाव
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.