Skip to main content

प्रकटन

अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/07/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारचा सत्यमेव जयतेचा भाग अस्पृश्यता ह्या सामाजिक विषयाला वाहिलेला होता. शहरी भागात राहणार्‍या बर्‍याच जणांसाठी त्यात दाखविलेल्या बर्‍याच गोष्टी कदाचित धक्कादायक असू शकतील. ह्या भागानंतर बर्‍याच मराठी संस्थळांवर ह्या अनुषंगाने चर्चा झडल्या. मिपावरही कोणाचा रे तू' ह्या शीर्षकाचा लेख आला आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून एक चर्चासत्र झडले. त्या चर्चेत बहुतकरून सध्याच्या तरुण पिढीतले युवक युवती हिरीरीने सहभाग झाले होते. त्या गदारोळात चर्चा अपरिहार्यपणे 'आरक्षण' ह्या मुद्द्यावर येऊन थडकली.

पॅनिंग...

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 12/07/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फोटुग्राफी संदर्भात वाचन करत असताना...मला पॅनिंग हा प्रकार कळला ! वेगवान विषयावर फोकस ठेवुन त्याच्याच गतीने कॅमेरा फिरवायचा...आणि क्लीक करायचे... मग काय होतं ?

सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.

लेखक गणपा यांनी बुधवार, 11/07/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली. लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला. "टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?" कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.

"कोणाचा रे तू?"

लेखक चिगो यांनी सोमवार, 09/07/2012 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"कोणाचा रे तू...?" गावात बालपण गेलेल्या कुणालाही हा प्रश्न नवीन नसावा. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला मिळणारी वागणूक ठरत असे. वाटलं होतं, की शहरे, उच्च शिक्षण संस्था, उच्च पदस्थ नोकर्‍या इ. मध्ये कुठल्याही व्यक्तीला मिळणारी वागणूक कदाचित त्याच्या/तिच्या बौद्धीक प्रतिभेवर निर्धारीत असेल. पण काल "सत्यमेव जयते" बघितल्यावर कळले, की भारत असो वा इंडीया, अजूनही "कोणाचा रे तू" ह्याच्या उत्तरावर बरंच काही निर्भर आहे.. "सत्यमेव जयते" च्या बर्‍याच आधी, लाबशाराप्र अकादमीमध्ये, "इंडीया अनटच्ड" ही डॉक्युमेंटरी बघितली होती. खरे तर स.ज. पेक्षाही ही फिल्म जास्त सत्यदर्शी आहे.

एका अस्सल मर्दाची कहाणी

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 08/07/2012 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
बोरिस पलेवोय या सोविएत लेखकाच एक सुंदर पुस्तक "स्टोरी ऑफ रीयल मॅन"नुकतच वाचण्यात आल्,एका अस्सल देशभक्ताची ही कहाणी आहे,हि कादंबरी एका खर्‍या व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे.तो व्यक्ती म्हणजे अलेस्केइ मेस्सेरेव्ह जन्म २० मे १९१६,रशियातील एका सामान्य कुटुंबातला.

कवी मेघवेडाची 'उरा'तली सर !

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 07/07/2012 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
'उरा'तली सर ! - http://misalpav.com/node/22159 *** 'नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर' अशी सुरुवात करुन नावातच मेघ आणि त्याचे वेड सामावलेला कवी जेव्हा पावसावर लिहितो तेव्हा पावसाने जशी धरणी तृप्त होते तसे रसिक मन तृप्त होणार याची खात्री असते आणि मग उरतो केवळ कवीच्या लेखणीतून झरझर उतरलेल्या काव्यामृताचे पान करण्याचा एक उपचार. अमृत मिळणार हे आधीच माहित असते आणि तसेच घडते.

मराठी सन्केत स्थळे

लेखक अनिवासि यांनी शुक्रवार, 06/07/2012 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या (७ july) येथील मडळात साहित्तीक गप्पान्चा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात इ सहित्याबद्दल काही बोलणार आहे. मिपा वरील 'एक पत्रकथा' ह्या कथेचा सन्दर्भ गप्पाच्या सम्बधित परिपत्रिकात केलाच आहे व त्यतुन मिपा व इतर स्थळान्ची ओळख करुन देणार आहे. त्यासाठी गूगल वर शोध करताना, मिपा, उपक्रम इ. चर्चा करणारी स्थळे सापडली नाहीत. भारतीय वेळेप्रमाणे उद्या दुपारी १२-१ पर्यन्त कोणी अशा तर्‍हेची सध्या कार्यरत असलेली स्थळे सुचवलि तर त्याचा मला उपयोग होइल. धन्यवाद अनिवासी ( अजुन अनुस्वाराचे तन्त्र जमत नाही- क्षमस्व!)

( मित्रं...)

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 06/07/2012 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा म्हणा किंवा मनातल्या एका कप्प्याला लागलेला धक्का. गविंचे आभार. :) समजून घ्याल अशी मिपाकरांकडून अपेक्षा. ---------------------------------------------------------------------------------------------------------------- मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता मैत्री करत आलो आहे. मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून मी लहानपणी हिंडायचो. आम्ही एकमेकाशी कानात गुलुगुलु बोलत असायचो.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही.