Skip to main content

प्रकटन

जय महाराष्ट्र ढाबा बठींडा..

लेखक केदारविदिवेकर यांनी शनिवार, 23/02/2013 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
छान, सुंदर हलका फुलका चित्रपट... "जय महाराष्ट्र ढाबा बठींडा"....... अभिजित खांडेकर, प्रार्थना बेहेरे... ही नवीन जोडगोळी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल. नवीन फ्रेश लुक ही या अवधूत गुप्ते निर्मित चित्रपटाची मेन यु.एस. पी.... चित्रपटाची सुरुवातच आपल्या मराठमोळ्या पद्धतीने नामावलीने होते (नावं इंग्रजीत होती.. ती खटकली). पण त्याचबरोबर मराठमोळी पद्धतीच्या डिशेश दाखवल्यात, हे छान वाटलं. पहिला सीन अभिजित खांडेकरचा फ्रेश लुक पंजाबी स्टाईलमध्ये .... (दाढी ठेवलीये ना थोडी म्हणून..). पंजाब मध्ये मराठी ढाब्याला त्याच्या एक वर्ष झालेलय..

शंका निरसन.

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 22/02/2013 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, तू HIV पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?" भर रस्त्यात चालताना लेकीने आईला विचारले. अनपेक्षीत ठिकाणी, अनपेक्षीत प्रश्न विचारलेला असला तरी लेकीच्या चेहेर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि त्याचच नाही म्हटलं तरी आलेलं हसू दाबत आई म्हणाली "निगेटिव्ह." तिचा जीव काहीसा भांड्यात पडला. मग पुढचा प्रश्न "HIV पॉझिटिव्ह म्हणजे काय?" "HIV.. Human immunodeficiency virus हा एक प्रकारचा व्हायरस आहे.

अध:पतन

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 22/02/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रकांत, माझ्याशी लग्न करशील ? नाही मधू.. आपला फक्त हनीमून होऊ शकतो. असले जोक्स एकमेकांना सांगणे ही हाईट असलेल्या काळातल्या झंपूतात्यांच्या हातात ती आमंत्रणपत्रिका पडताच ते तीनताड उडाले. हल्ली उडण्यात नवलाई अशी राहीलीच नव्हती. परवा रणछोडदास वाण्याच्या अमेरिकेतल्या मुलीने लग्न न करताच तसंच कुणाबरोबर रहायला सुरूवात केल्याची बातमी कानी पडली तेव्हां पण ते असेच उडालेले. रणछोडदास मात्र अरे बाबा त्येला लीव्ह इन रिलेशनशिप म्हणतेत, इटस लीगल असं कसंनुसं हसत सांगत होता. याच सज्जन गृहस्थानं याच पोरीचा देशी मित्र खालच्या जातीचा होता म्हणून त्याला गायब केल्याचं बोललं जात होतं.

यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 22/02/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ... तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...

नूतन - एक सुंदर स्वप्न.

लेखक नानबा यांनी गुरुवार, 21/02/2013 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज २१ फेब्रुवारी, हा ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतनचा स्मृतीदिन. आजच्याच दिवशी १९९१ रोजी नुतनने या जगाचा निरोप घेतला.

कालचा दिवस....

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 20/02/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातला एखादा दिवस अचानक भंकस का जातो,हे एकदा त्या ब्रम्हदेवाला विचारल पाहिजे राव.कालचा दिवसही असाच विचित्र गेला का कुनास ठाउक पण आख्या दिवसभरात एकही काम धडपणे झाले नाही. बर्‍याच दिवसानंतर सकाळच्या ओपीडीत फक्त एकच पेशंट झाला,दुपारी १ वाजताच दवाखाण्यातुन बाहेर पडलो व क्रिकेटची बॅट घ्यायला चंदननगर मधुन बोंबलत एफ सी रोडला गेलो तर दुकान बंद्,तेथुन एक महत्वाचे पुस्तक घ्यायला युनिक अ‍ॅकडमीत गेलो तर पुस्तक बाजारातुन संपलेले,वैतागुन घरी आलो तर पिल्लु सर्दी खोकल्याने जॅम झालेल.

त्रागा धागा... वैताग.....

लेखक मन यांनी मंगळवार, 19/02/2013 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा मी का लिहितोय ? कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड. पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 19/02/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

समुद्रावरील पहिला दिवस-पुढे

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 17/02/2013 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
क्षमा करा- . आज मुलुंड येथील स्वर झंकार चा तिसरा दिवस होता त्यात श्री जय तीर्थ मावुंडी यांचे अप्रतिम गायन आणि पंडित विश्वमोहन भट यांचे मोहन वीणा वादन होते म्हणून पहिला भाग घाईघाईत लिहून अर्धवट सोडल्याबद्दल. असो अवोमिनची गोळी तोंडात धरली होती थोडा वेळ आडवा पडून होतो. थोड्या वेळाने पोटात ढवळणे थांबले परंतु डोके गरगरतच होते. पण थोडेसे धैर्य दाखवून मी उठलो आणि परत जिना चढून ब्रिज वर गेलो. वरून दिसणारे दृश्य भयंकर होते. जहाज पूर्ण तिन्ही मितीत ४५ अंशात डोलत होते समुद्र खवळलेलाच होता. पाणी लाटा आणि फेसामुळे पांढरे दिसत होते. तेवढ्यात तेथील रडार वर काहीतरी दिसले असे त्याचा ऑपरेटर सांगत होता.